ओल्या_काजूगराची_भाजी

🍲🥗#ओल्या_काजूगराची_भाजी 😋👌
      हापूस आंब्याप्रमाणेच अगदी वर्षभर ज्याची वाट पाहतो ते म्हणजे #ओले_काजूगर.......हे ओले काजू साधारणपणे उन्हाळ्याची चाहूल लागताच तसेच मार्चच्या सुरुवातीला जागोजागी दिसायला सुरवात होते. आमच्याकडे ओले काजू म्हणजे अगदी जीव की प्राण.....काजीच्या चिकाने हाताची सालं निघाली तरी......

खरं तर या ओल्या काजुगराची भाजी करणं ज्या आद्य कोकणी रानधपिणीला सुचलं असेल तिला सलामच ठोकला पाहिजे. ती आज नुसत्या भारतातली नाही तर जगातली#मिशेलन_स्टारची (Michelin star chef) मानकरी ठरली असती यात नवल नाही. कारण काजूचे उत्पादन हे जगभर होत असले तरी भाजी ही फक्त भारतात आणि विशेषतः कोकणपट्ट्यातच बनते.

ओल्या बियातून तयार झालेले आणि तरीही कोणके नसलेले हे ओले गर काढणे हे मुळात जिकिरीचं काम. प्रत्येक बी दाबून ती किती घट्ट लागतेय ते ओळखून बिया तोडणं. त्या दुष्ट चिकपासून सोडवून बियांमधून गर काढून सोलुन घेणं बिल्कुल सोपं नाही. तरीही ते करून त्यात वेगवेगळे मसाले घालून ती भाजी सिद्ध करणं हेही कठीण काम. ही सिद्ध झालेली भाजी ताटात आल्यावर चवीने खाणं मात्र अगदीच सोप आणि अगदी नशीबवान लोकांना जमणारी गोष्ट..

No comments:

Post a Comment