Showing posts with label Nice Thoughts. Show all posts
Showing posts with label Nice Thoughts. Show all posts

🚶🏾हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

🚶🏾👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

🚶🏾👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा...✍

🚶🏾👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी.....✍

🚶🏾👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही.....✍

🚶🏾👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी...✍

🚶🏾👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

🚶🏾👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....✍

🚶🏾👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय.......✍

🚶🏾👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा.......✍

🚶🏾👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे.....✍

🚶🏾👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात.....✍

🚶🏾👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते......✍

🚶🏾👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहापणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत....✍

🚶🏾👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

🚶🏾👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

🚶🏾👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

🚶🏾👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

🚶🏾👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

🚶🏾👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

🚶🏾👌सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका,वेळ वाया जाईल....
हि दुनिया मतलबी झाली आहे,त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा,चांगली वेळ येईल....✍

🚶🏾👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

🚶🏾👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

🚶🏾👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

🚶🏾👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

🚶🏾👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

🚶🏾👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

🚶🏾👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

🚶🏾👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

🚶🏾👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

🚶🏾👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही।

पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत...........
*अन्नाचा कण*
आणि
*आनंदाचा क्षण*
नेहमी हसत रहा..😊☺☺☺
💞💞  💞💞
आयुष्यात 🏡 🚕 💵 *संपत्ति* कमी मिळाली तरी चालेल...
पण  *नाती* 👫 अशी मिळवा की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही.........           *                      🌺🌺Good  mrning 🌺🌺*

✊ झाकलेल्या मुठीतून वाळूचा⌛कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि 👉आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय...

❤प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
😔 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
�विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
      😴शुभ रात्री😴

*धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की*:,
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल*...!!
🍁🌾🌷🌸🌹

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read

ज्या माणसामध्ये दुसऱ्याला मोठे होताना बघायचे सामर्थ्य आणि
दुसऱ्यालामोठे करायची उर्मी असते तीच माणसे खऱ्या अर्थाने
खुप मोठ्या उंचीवर जाऊन यशाचे शिखर सर करतात.
🍃 शुभ रात्री 🍃

हृदयाला स्पर्श करणारी चार्ली चॅप्लिन ची तीन वाक्ये........
🍃🌹१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.
🍃🌹२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.
🍃🌹३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस.

"कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी
खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे
सांगता येत नाही."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...!"  
Duryodhan & Rahul Gandhi - both without talent. but yet wanted to be rulers on the principle of birth-right.

♻Bhishma & Advani -  Never crowned. got respect & yet became helpless at the end of their lives.

♻Arjun & Narendra - Both talented. reached the highest position due to being on the side of dharma. but realise how difficult it is to follow and practice.

♻Karna & Manmohan Singh - Both intelligent. but never reached anywhere being on the side of adharma.

♻Shakuni & Kejriwal - Both never fought a war, just played dirty tricks.

♻Dhritrashtra & Sonia - Both were blind for love of their sons.

♻And Last - Krishna And Abdul Kalam - We celebrate both of them but do not follow what they taught and preached.

That is Mahabharat & This is Bharat.

सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…

कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..

रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..

☆→शुभ प्रभात←☆

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

मला सर्वात आवडलेल विधान....
  माझं भांडण सर्वांशी आहे पण शत्रुत्व कुणाशीचं नाही....
  खर आहे..मलाही असंच वाटतंय मतभेद जरुर असावेत पण मनभेद असता कामा नयेत...
    एखाद्याशी वाद घालावा पण त्याला जखम होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.....
   विनाकारण अहंकार बाळगुन जगू नये....शेवटी आठ मण लाकडे किंवा चार गज जमीन हाच या जीवनाचा शेवट आहे हे कायम लक्षात ठेवावे....
   म्रुत्यु हे सुंदर आणि शाश्वत वास्तव आहे याचे कायम भान राखावे..म्हणून कुनीतरी लिहलय...
आयेगा खाली जायेगा खाली...
कभी न भरेगी ये तेरी झोली...
काम ना आयेगी बंगला-गाडी और हवेली..
इसी हवेलीसे निकल जायेगी एक दिन तेरी डोली....
चला सर्वांसाठी जगुया....माणूस बनुया आणि माणुसकी जपुया...

💐💐💐🏻शुभ सकाळ💐💐💐

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
        अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
        पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!

प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे ,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका
आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा कारण समर्थ सांगून गेलेत......!    
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!

         🌹शुभ सकाळ🌹

" नदी मध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाहि ,
जीव तेंव्हाच जातो जेंव्हा पोहता येत नाहि ......
.
परिस्थिती कधीच समस्या बनत नाहि ,
समस्या तेंव्हाच बनते , जेव्हा आपल्याला ती परिस्थिती हताळता येत नाहि"........
        💐💐 शुभ सकाळ💐💐

हारण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकन्याचा मोह ही केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयत्न करने मी सोडणार नाही..
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण..
एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू
शकत नाही..
  आणि ती असते..
      "आपलं आयुष्य"..
म्हणूनच..
मनसोक्त जगा !!!

🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃
जीवनात जे काही कराल,
              ते पूर्ण समर्पण करून करा,
भक्ति असावी हनुमंतासारखी
             प्रतिक्षा असावी शबरी सारखी,
प्रेम असावं मिराबाई सारखं,
             शिष्य असावं अर्जुनासारखं,
आणि मित्र असावं तर,
        प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णासारखं.
🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃🌺🍃🍃

       🌹शुभ प्रभात. शुभ दिवस.🌹

*भगवान बुद्धाचे अतिशय महत्त्वाचे वाक्ये:-*
🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची
जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा
कर्तृत्ववान होय.
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही.
🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु
आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची
अपेक्षा करू नका.
🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा
आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म
करण्याची वेळ आली आहे.
🌝 इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक
कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही
तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार
नाही.
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात.
🌝 काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा
ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता
.त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
🌝 स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक
बाबिंचेच चिंतन सतत केले पाहिजे.
🌝 घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत
नाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयन्त
केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.
🌝आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
🌝 चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू
शकत नाही.
🌝 जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं
अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे
काहीच केले नाही अस काही तरी करण्याची
तयारी ठेवा.
🌝बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ
शकत नाही आणि ज्यांना स्वत:च मन
बदलवता येत नाही ते कशातच बदल घडवू
शकत नाही. 🌹 🌹

अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न -

केशवा जर मृत्यू सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.?

जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.

श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल-

पार्था,

मांजर जेव्हा उंदराला पकडते
तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना
खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त
परीणाम वेगवेगळे आहेत.

तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,
तर दुसरा ८४  फेर्‍यामध्ये अडकेल..

विष  काय आहे ..?
भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते...
मग ती ताकत असो
गर्व असो.
पैसा असो.
भूक असो.

शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
पण कोणाकडून दबली जात नाही...🍃

माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!
जगण्यासाठी लागतात फक्त
"प्रेमाची माणसं"
🙏🙏

Positive SMS in Marathi

"जगाला काय आवडतं ते करु  नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उद्या, तुमच वाटणं जगाची
"आवड" बनेल. .!!!

जे लोक गोड बोलतात, ते सर्वच आपले हितचिंतक
नसतात.
लक्षात ठेवा ,
गोडवा हा मधात असतो, मधमाशीत नसतो.
    🌅शुभ सकाळ🌅

तडजोड

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड"....
कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं  मनापासून स्वीकारता येत नाही...!!!