Showing posts with label काहीतरी महत्त्वाचे (IMP). Show all posts
Showing posts with label काहीतरी महत्त्वाचे (IMP). Show all posts

५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...

५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...
मळताना मजा येते ...पण नंतर आपल्याच 4-५ लाखाचा जो चुना लागतो ....त्याचे काय ? शिवाय त्याच बरोबर येणारे अन्य रोग जे शरीरावर आपल्या जे प्रेंम करतात मग ते आपल्याल्या सोडतही नाही . प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेनचा एक मार्मिक विनोद. तो म्हणाला, ‘सिगारेट सोडणं खूप सोपं आहे. कारण यापूर्वी कित्येकदा मी ती सोडली आहे!’
आज काल निकोटिन हे एवढे व्यसनासक्त करणारे द्रव्य आहे की, धूम्रपान थांबविणे फार कठीण असते. जगभरातील देशांतून शेकडो वर्षांपासून तंबाखू वापरात आहे. आणि यांपैकी प्रत्येक देशातील लोकंना निकोटिनचे व्यसन लागलेले आहे. जेव्हा धूम्रपान करणारे, ते सोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पुन्हा सुरू होण्याचे प्रमाण फार असते,
अनेकजण निरस जीवनात आनंद शोधण्यासाठी, न पेलवणारा ताण सैल करण्यासाठी तंबाखूसारख्या गोष्टींकडे वळतात आणि त्याचे गुलाम होतात. खरं तर आपल्या जीवनशैलीतच आनंद, निवांतपणा, विरंगुळा असावा, ताण असल्यास त्याचा निचरा व्हावा म्हणजे अशा गोष्टींकडे वळण्याची अपरिहार्यता निदान कमी होईल. निकोटिन सोडविणे सुखद नसते. ते सोडणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्याची उणीव जाणवत राहते आणि धूम्रपानाची तीव्र ओढ असते.
सिगारेटची पाकीटं आणि एकूणच तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरची किती टक्के जागा ‘धोक्याचा इशारा’ छापण्यासाठी वापरावी याची चर्चा चालू आहे. तंबाखूच्या व्यसनाविरोधातल्या मोहिमांसमोर खरं आव्हान आहे आपल्याच महाराष्ट्रातले दोन नेते. आर. आर. आबा पाटील आणि शरद पवार...आर. आर. पाटील यांनी मृत्युशय्येवरूनही अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं सांगितलं, ‘‘गुटखा आणि तंबाखूचं व्यसन मी सोडू शकलो नाही. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कृपा करून या व्यसनाला बळी पडू नका.’दहा वर्षापूर्वी अजित पवारांनी आबांना तंबाखू खाण्याबद्दल जाहीरपणो फटकारलं होतं. त्यांनीही तंबाखू सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली, पण आर. आर. पाटील हे व्यसन सोडू शकले नाहीत आणि महाराष्ट्र एका चांगल्या आणि गुणी नेत्याला मुकला.
दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच, पहिल्यांदाच जाहीरपणो सांगितलं, गुटख्याच्या सवयीमुळेच मला तोंडाचा कॅन्सर झाला, माङो सगळे दात काढून टाकावे लागले.महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही’ असा मुद्दा कोणी उपस्थित करू नये.तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस तसेच स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. एवढंच नव्हे, हृदयरोग, लकवा, दमा, टीबीचं प्रमाण खूपच मोठय़ा प्रमाणावर वाढतं. भारतात दरवर्षी तब्बल आठ लक्ष मृत्यू एकटय़ा तंबाखूमुळे होतात.
तंबाखू लॉबीनं अशा प्रकारच्या प्रतिमा जगभर निर्माण केल्या आणि लोकांमधलं सिगारेटच्या वापराचं प्रमाण वाढवलं.स्त्रियांच्या धूम्रपानाचं आणि स्त्रियांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचं तेव्हापासून वाढलेलं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही. तरुण वयात जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं, आपण भारी, आकर्षक दिसावं, मर्द, तगडा, डॅशिंग म्हणून आपल्याला इतरांनी ओळखावं, स्त्रियांना आपलं आकर्षण वाटावं. सिंहाला जशी आयाळ असते तसं धूम्रवलय म्हणजे जणू काही तेजोवलय आपल्याभोवती लहरत असावं..जाणीवपूर्वक तयार केलेल्या अशा प्रतिमांचा विशेषत: किशोरांवर, तरुणांवर मोठा परिणाम होतो. नंतर हळूहळू समाजजीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनून जातो.
तंबाखूमधलं निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन आहे. हेरॉइनपेक्षाही घातक आहे. सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं. म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते! संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं.
व्यक्तिगत स्तरावर या व्यसनापासून दूर राहणं अगर त्याच्या तावडीतून सुटणं हे दोन्हीही टोकाच्या आत्मसंयमनाची आणि दृढ निश्चयाची मागणी करणारं आहे. या व्यसनाच्या उच्चाटनासाठी, निदान त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक धोरणात्मक निर्णयाची आणि कार्यवाहीची गरज आहे, ती म्हणूनच!
मित्रानो जीवन हे सुंदर आहे ........खूप अशा गोष्टी आहेत त्यात आपण आपले मन वळवू शकतो ....त्या साठी तंबाखु .मळयाची काहीच गरज नाही.
शेवटी निणर्य आपला आहे ........

" भडकवणारे " आणि " भडकणारे "

व्हाट्सअपवर आलेला एक अतिशय अर्थपूर्ण मेसेज ईथे सामायिक करतोय,  कुणी लिहीलंय माहीत नाही पण सुंदर आहे

खरोखर वेळ काढुन वाचा
Very Important

  " भडकवणारे "
     आणि
" भडकणारे "
----------------------

तो एक तरूण...
अत्यंत हुशार...
सर्वांचा लाडका...

हा मुलगा एकदा
पोलिसांनी पकडला,
गाड्या फोडताना...

गेला तुरूंगात,
लागली केस,
वारी सुरू झाली कोर्टाची....

करिअर गेलं,
वर्षे वाया गेलं,
जामीन पण नाही,
जवळ पैसे नाहीत,
आयुष्यातुन उठला.....

का.....?????

का तर याला
कोणीतरी
कुणाच्या तरी
विरोधात
भडकवले...

आणि...

हे घडले....

हे एक प्रातिनिधीक
उदाहरण आहे.
पण लक्षात ठेवा...

आज जगात
दोन प्रकारचे
लोक आहेत...

दुसऱ्याला भडकवणारे
आणि भडकणारे .....

भडकवणारे
दारू विक्रेत्याप्रमाणे
द्वेष विकतात...

आणि...

भडकणारे
दारूप्रमाणे
द्वेष पितात...

दारूची नशा
लगेच उतरते,

पण, द्वेशाची नशा
चढत राहते...

आणि...
एक दिवस
ज्याप्रमाणे
दारू विकणारा
बंगले बांधतो...

आणि...

दारू पिणारा
भिकारी होतो...

तसे भडकवणारे
मोठे होतात आणि...

भडकलेले,
बरबाद होतात...

आज आपला
तंबाखू सारखा
वापर करून
घेतला जातोय...

यासाठी...
शिवाजी महाराजांचे,
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे
नांव घेतले जाते...

त्यांच्या नावाने
भडकावले जाते...

ज्याने भडकावले,
त्याचा मुलगा
स्टडीरूममधे...

आणि...

जे भडकले ते
कस्टडी रूममधे...

ज्यांनी भडकवले
त्याचा मुलगा
अभ्यास करतोय...

आणि...

जे भडकले ते
खडी फोडायचा
अभ्यास करतेय...

ज्यानी भडकवले
त्याचा पोरगा परदेशात
शिकायला जातो...

आणि...

जे भडकले ते
देशी प्यायला शिकतेय...

भडकवणाऱ्यांचा मुलगा
फाड-फाड ईग्लिश बोलतो,

आणि...
भडकणारा,

बघून घेतो,
तंगडंच काढतो,
नादाला लागू नको,

वावर गेलं तरी
पावर नाय गेली पाहिजे,
असं बोलतोय...

भडकवणारे परदेशातून
विमानाने भारतात येतात...

आणि....

भडकणारे...
शिवाजीनगर-
१० रूपये...१० रूपये

संभाजीनगर -
५रूपरे... ५रूपये...
बसा ना...

ह्या बाजूला ...
त्या बाजूला ...
गाडी भरली, की
लगेच निघणार ...
१० रूपये ... ५ रूपये ...

भडकवणारे
विमानतळावर
उतरतात...

भडकणारे गर्दीत
घोषणा देतात...

...आमके तमके आगे बढो...
    हम तुम्हारे साथ है...

बजाव.....
वन्सं मोर...
ढिंगच्यांग ढिच्यांग....

भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात
ऐटीत बसतो...

आणि...

भडकणारे तिथं
वेटर असतात...

कुठे गेली लाज...
कुठे गेला आत्मसन्मान...

छञपती शिवाजी महाराजांचे
नांव घेता..

डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे
नांव घेता..

पण स्वाभिमान माञ
गहाण टाकलाय...
लाजाही वाटत नाही ...

अरे किती दिवस ...
किती पिढ्यां....

आपल्या तरूणांना
वाटत नाही कां...?

स्वतः काही तरी
स्वाभिमान
निर्माण करावा..

दुसऱ्याचे
पाय चाटण्यापेक्षा
स्वतःमधे आत्मविश्वास
निर्माण करावा...

दुसऱ्याला मोठं
करण्यापेक्षा
स्वतः मोठं व्हावे...

दुसऱ्याच्या झाडाला
पाणी घालण्यापेक्षा,
स्वतः चे रोपटे लावले तर
ते मोठं झाड होतं...

कधी कळणार
आम्हाला हे...???

आज आमच्या पोरांचा
केवळ वापर करून
घेतला जातोय...

कुणाच्या तरी विरोधात..
भांडण करण्यासाठी ...
मारामारी करण्यासाठी...

कसा होणार आमचा
भारत देश महासत्ता....

२१व्या शतकात आहोत.
पण आमची पोरं
काय करतायेत....

वाद घालणे,
भांडण करणे,
मारामारी करणे...

हीच गोष्ट मनाला
खटकत होती....
वाईट वाटत होते...
तळमळ वाटत होती...

पण सांगणार कुणाला...???

एकमेकांशी वाद लावतोय,
वापर करून घेतोय,
स्वतःच्या पक्ष,
संघटना वाढवतोय....

भावांनो,
वाद घालण्यापेक्षा
स्वतःशी जर
संवाद साधला तर
यश मिळाल्याशिवाय
राहणार नाही...

आपल्याला
भडकावणाऱ्यांनी
कधी स्वतःच्या
मुलाला, भावाला,
गाड्या फोडायला,
मारामारी करायला
लावले का ?

का नाही लावत...???

अरे, विचार करा...

आणि...

तरीही जर तुम्ही
भडकवणाऱ्या लोकांचं
ऐकत असाल तर
तुमचं भविष्य
अंधारात आहे...

विचार करा...

कुणाच ऐकून
का बरबाद होता...???

या लोकांचं
ऐकण्यापेक्षा
स्वतःच्या नोकरी,
व्यावसाय, धंदा,
शिक्षण, घर,
संसार इ. कडे
लक्ष द्या...

कोणी जर
कुणा विरोधात
भडकवले
तर त्याला सांगा...

अगोदर स्वतःच्या
मुलाला सांग...

त्याला गाड्या
फोडायला लाव...

म्हणजे...

काम करायाला आम्ही
आरामाला तुम्ही ...

बनवायला आम्ही
खायला तुम्ही ....

रस्त्यावर आम्ही
पेपरात तुम्ही ...

तुरूंगात आम्ही
tv वर तुम्ही...

हे आता
थांबले पाहीजे....

तरूणांनो
जागे व्हा....

दुसऱ्याला
गुलाम म्हणणारे
विचार करा...

आपण कुणाचे
गुलाम नाही ना....???

आपला कुणी
वापर करत नाही ना...???
विचार करा.

विचार पटले तर
मिञांना पाठवा.....!!!

पाण्याचे दिवे

समाजात काही तरी करायची इच्छा असणाऱ्‍याने 2 मिनिटं वेळ काढुन नक्की वाचा.

फिलीपाईन्स देशाच्या अदिवासी पाड्यात जिथे विज पोचत नाही तिथेले लोक पाण्याचे दिवे वापरतात. कसे? (हे तुम्ही घरी पण करु शकता आणि आसपासच्या पाड्यात विजेचा पर्याय म्हणुन पोचवु शकता) एक प्लास्टिकची बाटली घ्या त्यात ९०% पाणी भरा आणि त्यात ब्लिचिँग पावडर मिसळा. आता ही बाटली सुर्यप्रकाशात ५ तास घराच्या छतावर ठेवा जसा अंधार होईल तसा या पाण्याने शोषलेले सुर्यकिरणांचे परावर्तन होईल आणि ब्लबसारखा उजेड होईल आणि याचा उजेड ५५ वँट ब्लब एवढा असतो आणि हे पाणी किमान ८ ते १० तास निरंतर उजेड निर्मान करते. हे पाणी पुन्हा पुन्हा वापरता येते. शेयर करायला विसरु नका...

आवाहन

सर्व ग्रुप मेंबरना आवाहन

धरणातील पाणी कमी झाले आहे. उन्हाळा सुरु होत आहे
जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:-
1. रोज गाड्या धुवू नका.
2. अंगणात पाणी मारू नका.
3. सतत नळ चालू ठेऊ नका.
4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया.
५) घरातील गळके नळ रिपेअर करा
६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा
या संकटाचा एकत्र सामना करूया

वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही पण  नक्की चांगली बातमी ... पसरवीली चे समाधान मिळेल 🙏🙏🌿☔🌊🌈

VAHAN space Vehical no

कोणत्याही वाहनाची माहीती व्हावी..त्या वाहनाचे मालक व इतर पत्ता सहज कळण्यासाठी..
sms..VAHAN space क्रमांक लिहुन 7738299899 या क्रमांक ला पाठवा व एका सेकंदात पूर्ण माहीती मिळवा...
"VAHAN space Vehical no"

देवेन्द्र फडणवीस सरकार चा सुंदर उपक्रम 🌷🙏🏻

Facebook Number

तुम्ही तुमचा मोबाइल क्रमांक
फेसबुक प्रोफाइलला अॅड
केलाय का ?

केलाच असेल तर तो तत्काळ
काढून टाका कारण हाच मोबाइल
क्रमांक तुम्हाला संकटात टाकू
शकतो..

फेसबुक सर्च बार मध्ये हा
क्रमांक टाकल्यास तुमची सर्व
माहिती सर्च करणाऱ्या
व्यक्तीच्या हाती लागेल..

त्यात तुमची प्रायव्हसी सेटिंग
ही असेल या माहितीचा जर
चुकीचा वापर झाला तर,

तुमच्या अडचणीं मध्ये आणखी
वाढ होऊ शकते..

'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध
झालेल्या वृत्तानुसार सॉल्ट
एजन्सीचे टेक्निकल डायरेक्टर
रेजा मोइनुद्दीन यांनी एका कोडिंग
स्क्रिप्ट द्वारे ब्रिटन, यूएस आणि
कॅनडा या देशांतील संभाव्य
मोबाइल क्रमांकांचे कॉम्बिनेशन
तयार केले ।

हे मोबाइल क्रमांक फेसबुकच्या
अॅप-बिल्डिंग प्रोग्राम (API) वर
पाठवल्या नंतर लाखो फेसबुक
युझर्सचे प्रोफाइल हाती लागले..

फेसबुकच्या सुरक्षे संदर्भातील
एवढी मोठी त्रुटी सामान्य
युझर ला माहित नसल्यामुळे
त्याची सर्व वैयक्तिक माहिती
कुणाच्या ही हाती पडण्याचा
धोका असल्याचे मोइनुद्दीन
यांनी सांगितले..

या त्रुटीचा गैरफायदा घेऊन
सामान्य फेसबुक युझरची
वैयक्तिक माहिती कुणाला ही
विकण्याची भीती तर आहेच;

शिवाय या माहितीचा गैरवापर
ही होऊ शकतो असे त्यांनी
सांगितले..

याबाबत फेसबुकला एप्रिल
मध्येच सांगण्यात आले असून,

अॅप बिल्डिंग प्रोग्रामला प्री-
एन्क्रिप्ट करण्यास सांगितले आहे..



मात्र, अद्याप काहीही कार्यवाही
झालेली नाही या साइटवरील
जवळपास १४ लाख युझर्सचे
अकाऊंट हॅकर्सच्या हाती लागू
शकतात,

SSC AND HSC MARKSHEET ONLINE

🙏🏽महत्वाचे🙏

दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .

PDF File स्वरूपात DOWNLOAD पण करता येईल .

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.

आपणास  कोठेही केंव्हाही उपयोगी येईल .

www.boardmarksheet.maharashtra.gov.in

सन १९९० पासुनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे .

Download Hsc and ssc MARKSHEET online at anytime, anywhere in PDF File