५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...

५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...
मळताना मजा येते ...पण नंतर आपल्याच 4-५ लाखाचा जो चुना लागतो ....त्याचे काय ? शिवाय त्याच बरोबर येणारे अन्य रोग जे शरीरावर आपल्या जे प्रेंम करतात मग ते आपल्याल्या सोडतही नाही . प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेनचा एक मार्मिक विनोद. तो म्हणाला, ‘सिगारेट सोडणं खूप सोपं आहे. कारण यापूर्वी कित्येकदा मी ती सोडली आहे!’
आज काल निकोटिन हे एवढे व्यसनासक्त करणारे द्रव्य आहे की, धूम्रपान थांबविणे फार कठीण असते. जगभरातील देशांतून शेकडो वर्षांपासून तंबाखू वापरात आहे. आणि यांपैकी प्रत्येक देशातील लोकंना निकोटिनचे व्यसन लागलेले आहे. जेव्हा धूम्रपान करणारे, ते सोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पुन्हा सुरू होण्याचे प्रमाण फार असते,
अनेकजण निरस जीवनात आनंद शोधण्यासाठी, न पेलवणारा ताण सैल करण्यासाठी तंबाखूसारख्या गोष्टींकडे वळतात आणि त्याचे गुलाम होतात. खरं तर आपल्या जीवनशैलीतच आनंद, निवांतपणा, विरंगुळा असावा, ताण असल्यास त्याचा निचरा व्हावा म्हणजे अशा गोष्टींकडे वळण्याची अपरिहार्यता निदान कमी होईल. निकोटिन सोडविणे सुखद नसते. ते सोडणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्याची उणीव जाणवत राहते आणि धूम्रपानाची तीव्र ओढ असते.
सिगारेटची पाकीटं आणि एकूणच तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरची किती टक्के जागा ‘धोक्याचा इशारा’ छापण्यासाठी वापरावी याची चर्चा चालू आहे. तंबाखूच्या व्यसनाविरोधातल्या मोहिमांसमोर खरं आव्हान आहे आपल्याच महाराष्ट्रातले दोन नेते. आर. आर. आबा पाटील आणि शरद पवार...आर. आर. पाटील यांनी मृत्युशय्येवरूनही अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं सांगितलं, ‘‘गुटखा आणि तंबाखूचं व्यसन मी सोडू शकलो नाही. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कृपा करून या व्यसनाला बळी पडू नका.’दहा वर्षापूर्वी अजित पवारांनी आबांना तंबाखू खाण्याबद्दल जाहीरपणो फटकारलं होतं. त्यांनीही तंबाखू सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली, पण आर. आर. पाटील हे व्यसन सोडू शकले नाहीत आणि महाराष्ट्र एका चांगल्या आणि गुणी नेत्याला मुकला.
दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच, पहिल्यांदाच जाहीरपणो सांगितलं, गुटख्याच्या सवयीमुळेच मला तोंडाचा कॅन्सर झाला, माङो सगळे दात काढून टाकावे लागले.महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही’ असा मुद्दा कोणी उपस्थित करू नये.तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस तसेच स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. एवढंच नव्हे, हृदयरोग, लकवा, दमा, टीबीचं प्रमाण खूपच मोठय़ा प्रमाणावर वाढतं. भारतात दरवर्षी तब्बल आठ लक्ष मृत्यू एकटय़ा तंबाखूमुळे होतात.
तंबाखू लॉबीनं अशा प्रकारच्या प्रतिमा जगभर निर्माण केल्या आणि लोकांमधलं सिगारेटच्या वापराचं प्रमाण वाढवलं.स्त्रियांच्या धूम्रपानाचं आणि स्त्रियांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचं तेव्हापासून वाढलेलं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही. तरुण वयात जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं, आपण भारी, आकर्षक दिसावं, मर्द, तगडा, डॅशिंग म्हणून आपल्याला इतरांनी ओळखावं, स्त्रियांना आपलं आकर्षण वाटावं. सिंहाला जशी आयाळ असते तसं धूम्रवलय म्हणजे जणू काही तेजोवलय आपल्याभोवती लहरत असावं..जाणीवपूर्वक तयार केलेल्या अशा प्रतिमांचा विशेषत: किशोरांवर, तरुणांवर मोठा परिणाम होतो. नंतर हळूहळू समाजजीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनून जातो.
तंबाखूमधलं निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन आहे. हेरॉइनपेक्षाही घातक आहे. सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं. म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते! संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं.
व्यक्तिगत स्तरावर या व्यसनापासून दूर राहणं अगर त्याच्या तावडीतून सुटणं हे दोन्हीही टोकाच्या आत्मसंयमनाची आणि दृढ निश्चयाची मागणी करणारं आहे. या व्यसनाच्या उच्चाटनासाठी, निदान त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक धोरणात्मक निर्णयाची आणि कार्यवाहीची गरज आहे, ती म्हणूनच!
मित्रानो जीवन हे सुंदर आहे ........खूप अशा गोष्टी आहेत त्यात आपण आपले मन वळवू शकतो ....त्या साठी तंबाखु .मळयाची काहीच गरज नाही.
शेवटी निणर्य आपला आहे ........

No comments:

Post a Comment