Showing posts with label Bodhkatha. Show all posts
Showing posts with label Bodhkatha. Show all posts

स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
सुंदर बोधकथा ....

सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)

काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .

ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.

पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी  आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.

एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये. 

थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट  केली.

सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.

अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.

अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.

एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं  : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? 

मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?

ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं:  हो खूपच सुंदर आहे.

त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?

" खूपच रूचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".

मग काही दिवस ती गायब झाली.

अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं "मी जळगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का? 

मी म्हणालो  : जरूर भेटेन की.

"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.

मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.

म्हणाली  : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.

मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.

ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा. 

मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.

शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.  

ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.

मी बायकोला विचारलं:  आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?

बायको म्हणाली:  प्रिया जोशी येतेय. 

काय?

ती तिला कुठं भेटली?  तू तिला कसं ओळखतेस?

"जरा धीर धरा साहेब,  ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात.  यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.

-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .  

😃😂😜

(मेन विल बी मेन)

प्रारब्धाचा हिशेब  :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......
👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.......
जिवन खुप सुदंर आहे आनंदाने जगा ....

उपकार

💐खुप छानआहे नक्कीवाचा💐   

            *बोधकथा*

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

*"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*
👏👏👏👏👏👏
_

नातं म्हणजे काय ?
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.

साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!

नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली.

घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा."

ब्राह्मण "हो" म्हणाला

ब्राम्हणाचे पोटभर जेवण झाले ब्राम्हणाने ताक मागीतले.

*भोजनांते तक्रं पिबेत* अस म्हणतात.

नेमकं म्हातारीच्या घरात त्या दिवशी ताक नव्हते.

ती म्हणाली, "थांबा महाराज मी आत्ता शेजारणी कडून ताक घेवुन येते."

तिने शेजारणीला ताक मागीतले , शेजारणीने भांडभर ताक दिले,

आजीने ब्राम्हणाच्या भातावर ताक घातले , ब्राम्हणाने भुरका मारला तो शेवटचाच.
ब्राह्मण तडकाफडकी मेला.

चित्रगुप्त आणि यमधर्माला प्रश्न पडला की, या कर्माचा भागीदार कोण?

कारण ब्राम्हणाने आत्महत्या केली नव्हती.

म्हातारीने अतिथीधर्म पाळला होता तिने ब्राम्हणाला मारले नव्हते,दारात आलेल्या अतिथ्याला पोटभर जेवण दिले होते.

शेजारणीने शेजारधर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते. आणि ताक पिवुन ब्राह्मण मेला होता कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून ताकात पडले होते.

यमधर्माने नागाला जाब विचारला, नाग म्हणाला यात माझा काय दोष ? घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती,माझे तोंड खाली झाले होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरळ त्या ताकात पडली म्हणून ब्राह्मण मेला.

यमाने घारीला जाब विचारला , घार म्हणाली यात माझा काय दोष ? सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे.

प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता कर्माचा भागीदार कोण ? कोणाच्या माथी मारायचे हे कर्म ?

चित्रगुप्त यमाला म्हणाला, "चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो."

दोघेही गुप्तरूपाने ब्राम्हण मरून पडला होता तिथे आले.

हा!हा! म्हणता संपूर्ण गावात बातमी पसरली की, म्हातारीच्या घरी ब्राह्मण जेवता जेवता मेला.

हळुहळु आळीतल्या बायका तिथं जमल्या.

शांताबाई उज्वला ताईना म्हणाल्या, "काय हो उज्वलाताई ब्राम्हण कसा मेला कळले का हो ?"

उज्वलाताई म्हणाल्या, "नाही हो"

तेंव्हा शांताबाई म्हणाल्या, "आहो कसं सांगु s s s तुम्हाला , या ब्राम्हणाकडे भरपूर द्रव्य होते , म्हातारीने भोजनात विष घालून त्याला ठार मारले व त्याचे द्रव्य हडप केले."

चित्रगुप्त यमाला म्हणाला पहिल्या क्रमांकावर हिचे नाव लिहा.

आणि तिथे जे जे या घटनेबद्दल बोलत होते त्यांची नावे रजिस्टर मधे लिहुन त्यांच्या माथी मारले गेले.

थोडक्यात कर्माचा इतका सूक्ष्म विचार केला आहे. एखाद्या घटने बद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा पाप आहे.

म्हणून आजचा सुबोध दिला आहे.
प्रत्येकाच्या कानात आणि डोळ्यात देवाने चार बोटाचे अंतर ठेवले आहे.

त्याचे कारण *जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही तो पर्यंत कोणाच्या तरी तोंडून निघालेली बातमी कानाने ऐकून तुमच्या तोंडाने बोलू नका हे सुद्धा एक प्रकारचे पापच आहे.*
*माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो*
*मी* का बोलू ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
असे बरेच सारे *"मी"* आहेत
जे आयुष्यात विष कालवतात.
*म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.*
=================
*" आयुष्य खुप सुंदर आहे "

रागावर नियंत्रण करण्याचे
एक सुंदर उदाहरण --

*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -

"नेहमीप्रमाणे बसलो होतो.
एक पक्षकार आले.
हातात कागदाची पिशवी.
रापलेला चेहरा.
वाढलेली दाढी.
मळलेली कपडे.
म्हणाले..,
" सगळ्या च जमीनीवर स्टे
लावायचा आहे. आणखी काय
कागदं पाहीजेत?
किती खर्च येईल? "

मी त्यांना बसायला सांगितलं.
ते खुर्चीवर बसले.
त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.
त्यांच्या कडून माहीती घेतली.
अर्धा पाउण तास गेला.
मी त्यांना सांगितलं. ,
" मी अजून कागदपत्रे पाहतो.
तुमच्या केसचा विचार करूया.
तुंम्ही असं करा
४ दिवसांनी परत या. "

४ दिवसांनी ते पक्षकार
पुन्हा आले.
तसाच अवतार.
भावा बद्दलचा राग अजूनही
कमी झाला नव्हता.
मी त्यांना बसायची खूण केली.
ते बसले.

मग मीच बोलायला सुरूवात
केली.
" मी तुमची कागदपत्रे पाहीली.
तुम्ही दोघे भाऊ.
एक बहीण.
आई वडील लहानपणीच गेले.
तुमच शिक्षण ९ वी पास.
धाकला भाऊ M.A.B.ed.
तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी
शाळा सोडली.
रानात लंगोटी वर राबला.
नेवरा दाजी च्या विहीरीवर
दगड फोडली.
सदाबापू च्या उसात
च-या पाडल्या.
पण भावाच्या शिक्षणाला पैसा
कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं
चारत होती.
तुमचा भाऊ शाळेतून आला होता.
कसा तो म्हशीच्या आडवा गेला
आणि त्याला  शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.
तुंम्ही खांद्या वरून त्याला
बोरगावला नेलं.
खरं म्हणजे त्यावेळी तुमचं
पण कळतं वय नव्हतं....

फक्त कळती माया होती..

आई बापाच्या मागं यांचा मीच
आई बाप ही भावना होती...
तुमचा भाऊ B.A ला गेला.
उर भरून आला.
तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट
उपसायला लागला.
पण अचानक त्याला किडनीचा
त्रास सुरू झाला.
दवाखानं केल..
बाहेरचं केलं..
पण गुण आला नाही..
शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला
सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
ऑफिसर झाल्यावर खुप
फिरायच आहे..
नोकरी करायची आहे..
तुला आमच्या पेक्षा लय त्रास..

आंम्ही रानातली माणसं.
आंम्हाला एक किडनी असली
तरी चालतय.
तुम्ही बायकोच सुध्दा न
ऐकता किडनी दिली.

भाऊ M.A ला गेला.
होस्टेल वर रहायला गेला.
गावात मटण पडलं..
डबा नेवून द्यावा.
शेतात कणसं आली..
कणस नेवून द्यावी.
कुठला सण आला..
पोळ्यांचा डबा द्यावा..
घरा पासून हॉस्टेल च अंतर
२५ की.मी.
पण तुंम्ही सायकलने गेला.
घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली..
तुंम्ही गावात साखर वाटली..

३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..
झालं म्हणजे त्यानंच केलं.
तुंम्ही फक्त हजर होता. पण
तरी अभिमान होता..

भावाला नोकरी लागली.
भावाच लग्न झालं..
आता तुम्हाला आणि बायका पोरांना
सुख लागणार होतं;
पण झाल उलटंच....
लग्न झाल्या पासुन भाऊ घरी
येत नाही..
बोलावलं तर म्हणतो;
मी बायकोला शब्द दिलाय..
घरी पैसा देत नाही..
विचारलं तर म्हणतो अंगावर
कर्ज आहे..
गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट
घेतला.
विचारल तर म्हणतो कर्ज
काढून घेतलाय..!! "

सगळं सांगून झाल्यावर मी
थोडा वेळ थांबलो.

नंतर म्हणालो ...
" आता तुमचं म्हणणं आहे की
त्याने घेतलेल्या मिळकती वर
स्टे लावायचा ?

तो पटकन म्हणाला;
हो बरोबर...

मी म्हणलं;
स्टे लावता येईल.
भावाने खरेदी केलेल्या मिळकती
मधला हिस्सा पण मिळेल.
पण......

पण तुंम्ही दिलेली कीडनी परत
मिळणार नाही.
तुम्ही भावासाठी आटवलेलं
रक्त परत मिळणार नाही.
तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं
आयुष्य पण परत मिळणार नाही..
आणि मला वाटतयं या
गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची
किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली.
तो त्याच्या वाटंनं गेला.
तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.
तो भिकारी निघाला..
तुंम्ही दिलदार होता..
दिलदारच रहा..
तुम्हाला काहीएक कमी
पडणार नाही.. !!
उलट मी म्हणेन वडीलो पार्जित
मिळकती मधला तुमचा हिस्सा
तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक
राहु द्या..
कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना
शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ
बिघडला ;
म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! "

त्यान १० मिनीटं विचार केला..
सगळी कागद पिशवीत कोंबली..
डोळं पुसत म्हणाला;
"  चलतो सायेब... !! "

या गोष्टीला ५ वषॅ झाली.
परवा तो पक्षकार अचानक
ऑफीस ला आला.
बरोबर गोरागोमटा पोरगा.
हातात कसली तरी पिशवी.
मी म्हटले बसा..
तो म्हणाला ,
'' बसायला न्हाय आलो सायेब,
पेढं द्यायला आलोय ''.

हा माझा पोरगा.
न्युझिलॅंन्डला असतो.
काल आलाय.
आता गावात ३ मजली घर हाय.
८-९ एकर शेत घेतलय.
तुंम्ही म्हणाला होता कोर्ट
कचेरी च्या वाटला लागु नका.

मी पोरांच्या शिक्षणा ची
वाट धरली.. !! "

मला भरुन आलं...

हातातला पेढा हातातच राहीला..

.    ..  ."

रागाला योग्य दिशा दिली तर
पुन्हा रागवायची वेळ
येणार नाही...

*कितीही कमवा*
            *पण कधी गर्व करू नका*
    *कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर*
                  *ऱाजा आणि शिपाई*
     *शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*
            *आयुष्य खूप सुंदर आहे*
    *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*
🙏🏻  🙏🏻 *हाक तुमची साथ आमची*🙏🏻🙏🏻