Showing posts with label Marathi Ukhane. Show all posts
Showing posts with label Marathi Ukhane. Show all posts

😜😜👉 उखाणे..😂

श्रावणात बरसती रिमझिम धारा
मी पिते कॉफी हे घालतात वारा

****😂😄😜
एका हातात पिशवी, एका हातात रुमाल
नवरा बरोबर असताना हवा कशाला हमाल?

******😜
बशीत बशी ... बशीत बशी
माझी बायको उर्वशी, बाकी सगळ्या म्हशी ....

******😜

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय
----- अजुन आले नाहीत, पिऊन पडले की काय?
😄

खोक्यात खोका टि.व्ही.चा खोका
मी तुझी मांजर तु माझा बोका

*****😜
विड्याच्या पानावर पाव शेर कात
गणपतरावांच्या कमरेत घातली गाढवाने लाथ..

*****😄

गुलाबाचं फूल वार्‍याने हळूहळू उकललं
---- गेले कचरा टाकायला, त्यांना डुकराने ढकलल...😛😄😜😂

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू..
सुन :- भाजीत भाजी........
सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की....
.
.
.
.
.
.
सुन :-
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...."
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं....
नामदेव रावांच नाव घेते,
बोल थेरडे,प्रिन्स दादानं
आर्ची आन्
परश्याला का मारलं

😋उखाणा..आर्ची स्पेशल😆
ऐका......
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू...
हे माझे सखाराम
मी त्यांची रंगू.
.
.
.
मराठी कळतय का नाय
का english मधे सांगू 😝😝😝

Awesome Ukhana

नवरी ने घेतलेला awesome उखाणा

नवरी आली नवर्याच्या गावा,

नवरी आली नवर्याच्या गावा,
.
.
.
.
.
.
.
मनात मात्र माहेरचा छावा..!
😂😂😂😂😂

T20 World Cup 2016 Ukhana by Anushka Sharma

BreakUp उखाणा By Anushka
.
अनुष्का : नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
नवरात्रीत खेळत होते विराट बरोबर दांड्या...
.
विराट ला सोडते आता माझा Lover पांडया...

कटप्पा नं बाहुबलीला का मारलं - Funny Ukhana

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू..
सुन :- भाजीत भाजी........
सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की....
.
.
.
.
.
.
सुन :-
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...."
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं....
नामदेव रावांच नाव घेते,
बोल थेरडे,
कटप्पा नं बाहुबलीला का मारलं..!"
😛😛😀

कटप्पानं बाहुबलीला का मारलं..!"

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाले आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू..
सुन :- भाजीत भाजी........
सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की....
.
.
.
.
.
.
सुन :-
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...."
"कडु कडु कारलं सासुबाईला चारलं....
नामदेव रावांच नाव घेते,
बोल थेरडे,
कटप्पानं बाहुबलीला का मारलं..!"


बहुतेक नया है वोह

मला पाहताच होकार दिला
कारण त्यांना आवरला नाही माझा मोह
____ राव होते भलतेच घाईत
बहुतेक नया है वोह

होऊ दे तोटा

____ रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा … होऊ दे तोटा

मिरची असते तिखट

साखर असते गोड । मिरची असते तिखट
… रावांचे नाव घेते आडनावा सकट

मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण

मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
… रावांचे नाव घेते । ह्या घराची मी आहे सुगरण

Modi Sarkar ukhane

नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
......बाई लक्षात ठेवा,
अब कि बार मोदी सरकार.....!!!

लग्न झाले …. रावांशी .

आलीय भोगासी …
लग्न झाले …. रावांशी .

वट पौर्णीमा चा दिन

आज आहे वट पौर्णीमा चा दिन
वडा च्या झाडाला फेरे घालते सात
____ रावांची लाभो मला
जन्मो जन्मांची साथ

दूध आणि साखर

नागा ला पाजत होते दूध आणि साखर
… रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर

Bollywood Ukhane

टीप टीप बरसा पानी
पानी ने आग लगायी
____ रावांशी लग्न करण्याची
लागली आहे भलतीच घाई

Politics Ukhane

आघाडीत बिघाडी
युतीत चाललये कुस्ती
…. रावांची कायमस्वरूपी
माझ्या हृदयात आहे वस्ती

Divorce

Divorce कोर्टात घेतलेला उखाणा smile emoticon
जशी आघाडी बिघडली
आणि युती हि तुटली
तशीच …. रावांशी नाते तोडते
divorce मिळण्याच्या दिवशी

लवेरिया

डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
…. रावांना पहिल्यांदा बघताच
झाला मला लवेरिया

साची आणि इंद्र

देशालाला मिळाला नरेंद्र
राज्याला मिळाला देवेंद्र
…. रावांबरोबर जुळले नाते
जणू साची आणि इंद्र