Mumbai Goa Highway

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना कोठे काय काय खरेदी कराल ?

#इंदापूर •
गावठी पोहे, तांदूळ, वेलवांगी.

#पेण •
गावामध्ये झिंगा (कोळंबी) भाकरी, कलिंगड, पांढऱ्या कांद्याच्या माळा, पोहे मिरगुंड, पापड.

#महाड •
वटवाघूळ तेल (वातनाशक)

#चिपळूण •
जेवण (अभिषेक हॉटेल)

#परशुराम घाट •
जेवण (हॉटेल ओमेगा)

#निवळी घाट •
जेवण (ग्रीन पार्क हॉटेल)

#संगमेश्वर
मोहनथाळ (संगमेश्वरी खाजा)

#हातखंबा •
HP पंपावर गद्रे यांची बेस्ट फ्रोझन फिश प्रॉडक्टस व मॉलमध्ये शॉपींग.

#लांजा •
व्हेज नॉनव्हेज जेवण, सरसचे शेंगदाणा लाडू व इतर उत्पादने.

#राजापूर •
ठाकूर बेकर्सची स्पेशल नान-कटाई व इतर बेकरी प्रॉडक्टस.

#म्हापसा •
म्हापशाच्या बाजारात
मडक्यात मिळणारी हुर्राक, फेणी, काजूगर,

#सावंतवाडी •
माशांचे जेवण, ताजा मालवणी खाजा, शोभेची फळे. सकाळी सुरंगीचे गजरे, स्थानिक भाजी, आबोलीचे वळेसर, नारळ.

#कणकवली •
सकाळी ताजे मासे, ब्रेकफास्ट, मालवणी खाजा व खडके लाडू.

अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा.

📸_____ Mumbai Goa Highway 

रत्नागिरीकर

*रत्नागिरीत* राहण्यासारखे दुसरे-तिसरे सुख नाही!! 
उशिरा उठायचं स्वत:ची गाडी काढायची कामावर जायचं आणि वेळेत घरी यायचं. ना लाईनमध्ये उभे राहणे, ना बसची वाट पाहण्याची गरज. सुट्टीच्या दिवशी *आस्वाद* ची किंवा *मंदार* ची *मिसळ* आणी *सलगर* च्या *चहा* ची चव घ्यायची, स्टँड समोरच्या *गणेश हॉटेल* ची *कुर्मापुरी* खायची, दुपारी *मांडवीत मसाला किचन* हॉटेल मध्ये *पापलेट* वर ताव मारायचा.
संध्याकाळी *छाया हॉटेल* च्या *पॅटीसची* व *टॉकीजवरील शिवलकर यांच्या वडापाव* ची चवच न्यारी.
पावसामुळे उशीर होईल का? घरी परत कधी पोहचू? याची चिंता सोडाच...
प्रत्येक सणाला प्रत्येक छोटया मोठया कार्यक्रमांना हजेरी तसेच गावातल्या घराघरांत भेट देणे.

कधी *गणपतीपूळेचा* बीच
कधी *भाट्ये* बीच
तर कधी *आरे वारे* बीच
कधी *मिऱ्या बंदर* 
तर कधी *पावस चे स्वरूपानंद मंदिर*
कधी *मार्लेश्वर चे प्रसिद्ध स्वयंभू शिवमंदिर व निसर्गरम्य धबधबा* तर *हातीस चे*पीर बाबरशेख मंदिर*
कधी *देवी जखदेवी मंदिर*
 *कसब्याचे कर्णेश्वर मंदिर*
व *छत्रपती संभाजी स्मारक* कधी *राजवाडी व आरवली* येथील *गरम पाण्याची कुंडे* पावसाळ्यात *सप्तेश्वर* ला भेट देण्याची मजा काही औरच तसेच आजुबाजूस ऐतिहासिक प्राप्ती लाभलेले *प्रचितगड, भवानगड व रत्नदुर्ग* आहेतच
पावसाळी सर्व हिरवगार     
हिवाळयात गुलाबी थंडी
पावसाळ्यात खूप पाऊस
उन्हाळ्यात सौम्य उन्हाळा सारंच न्यार.....

*"रत्नागिरीकर"* होण्यात जी मजा आहे, ती दुस-या कशात खरच नाही!

माहिती साभार ✍🏻 ___
#कोकणचीमाणसंसंधीभोळी 
#कोकणसुख 
#villagelife 
#villagelifestyle 
#villagefood 

ओल्या_काजूगराची_भाजी

🍲🥗#ओल्या_काजूगराची_भाजी 😋👌
      हापूस आंब्याप्रमाणेच अगदी वर्षभर ज्याची वाट पाहतो ते म्हणजे #ओले_काजूगर.......हे ओले काजू साधारणपणे उन्हाळ्याची चाहूल लागताच तसेच मार्चच्या सुरुवातीला जागोजागी दिसायला सुरवात होते. आमच्याकडे ओले काजू म्हणजे अगदी जीव की प्राण.....काजीच्या चिकाने हाताची सालं निघाली तरी......

खरं तर या ओल्या काजुगराची भाजी करणं ज्या आद्य कोकणी रानधपिणीला सुचलं असेल तिला सलामच ठोकला पाहिजे. ती आज नुसत्या भारतातली नाही तर जगातली#मिशेलन_स्टारची (Michelin star chef) मानकरी ठरली असती यात नवल नाही. कारण काजूचे उत्पादन हे जगभर होत असले तरी भाजी ही फक्त भारतात आणि विशेषतः कोकणपट्ट्यातच बनते.

ओल्या बियातून तयार झालेले आणि तरीही कोणके नसलेले हे ओले गर काढणे हे मुळात जिकिरीचं काम. प्रत्येक बी दाबून ती किती घट्ट लागतेय ते ओळखून बिया तोडणं. त्या दुष्ट चिकपासून सोडवून बियांमधून गर काढून सोलुन घेणं बिल्कुल सोपं नाही. तरीही ते करून त्यात वेगवेगळे मसाले घालून ती भाजी सिद्ध करणं हेही कठीण काम. ही सिद्ध झालेली भाजी ताटात आल्यावर चवीने खाणं मात्र अगदीच सोप आणि अगदी नशीबवान लोकांना जमणारी गोष्ट..

Village

अश्या घरात राहायचं सुख काही वेगळाच असतं ना आणि ते अनुभवण्यासाठी आपली घरे,गावे जमिनी ह्या जपून ठेवायलाच पाहिजेत.
(शहरीकरणाचा वेग कोकणातही झपाट्याने वाढतोय)

#savekokan 
#villagelifestyle 
#villagelife 
#village

मतदार

एके दिवशी हिटलर एक कोंबडं घेऊन मंत्रीमंडळाच्या बैठकीत आला. कोंबड्याचं मुंडकं हिटलरने आपल्या बगलेत दाबून धरले होते. आणि तो चालत चालत त्या कोंबड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. कोंबडा जीवाच्या आकांताने ओरडत होता. तो हिटलरच्या बगलेतून सुटका करू पाहत होता. पण हिटलर त्याला न सोडता त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता पंख उपसत होता. मत्रीमंडळातील सदस्य हिटलरला म्हणत होते, "त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका. सोडा त्याला." पण हिटलर कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. आणि खिशातून काही दाणे काढून, तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा हिटलरच्या हाताकडे बघू लागला. 
हिटलर देखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला. आणि थोड्या वेळाने ते थोडे फार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा हिटलर जवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा हिटलर पासून सुटका करून घेत होता, तोच कोंबडा चार दाण्यासाठी हिटलर च्या पुन्हा जवळ बसला. मंत्रीमंडळातील सर्व लोक त्याला म्हणाले की, "हा काय प्रकार आहे ?" त्यावर हिटलर म्हणाला, "मतदार हे असेच असतात. साडेचार वर्ष आपण त्यांचे पंख उपसायचे असतात. आणि शेवटी सहा महिन्यांत त्यांना चार दाणे टाकायचे असतात. या चार दाण्याच्या नादात हे मतदार, साडेचार वर्षांत आपण केलेले सर्व अन्याय विसरून जातात. आणि आपल्यालाच मतदान करतात."

मधु दंडवते कोकण

मधु दंडवते कोकण - राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते.  
कोकण रेल्वे त्यांनीच सुरु केली.

#मधु_दंडवते #आणि #कोकण_कन्या... 🚆
ज्यांच्या अथक प्रयत्नाने काेकण रेल्वे धावू लागली त्या माजी संसद सदस्य मधू दंडवते यांच्या स्मृतीस सादर प्रणाम (जन्म-२१ जाने.१९२४)
     १०१११ कोकणकन्या एक्सप्रेस पुढील 
थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत आहे  
प्रत्येक कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद 
आणणारी ही ...... अनौन्समेंट !!!!!

पहिली ऐकू आली ती २० जानेवारी १९९७ रोजी ...
आज आमच्या ह्या लाडक्या राणीच्या 
सेवेला २९ वर्ष पूर्ण होत आहेत.

आमच्यासाठी ही ट्रेन नव्हे ....... गावाशी जुळलेली नाळ आहे .......

खरंच खूप अभिमान आहे ह्या गाडीचा .....
कोकण रेल्वेचे खूप खूप आभार .......
आणि अभिनंदन सुद्धा ....

 "कोकण रेल्वेचे शिल्पकार" प्रा. श्री .मधु दंडवते यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!🙏💐
--२१ जानेवारी.

#kokandiaries #KonkanRailway