तरीही एकत्र

आणि तरिही ....एकत्र??

ती खूप रोमँटिक...
तो ज़रा प्रैक्टिकल !
तो अगदी रोकठोक..
ती... सेंटीमेंटल

तो वागायला जरा सैल...
ती मतांशी घट्ट
तिची निवडक मित्रमंडळी
त्याचं सगळ्यांशीच पटतं...

दोघांचं combination...
आहे जरा.. विचित्र
and still....
ते..दोघे...एकत्र !!

तिला प्रिय महाबळेश्वर
त्याला मुंबई सुद्धा चालते....
तिला पावसात हवी बाइक....
त्याला कायमच कार लागते !!

ती म्हणते .."ए चल नं
कैफ़े कॉफी डे ला जाऊ!"
तो म्हणतो... "छे छे !!...
फक्कड चहाच घेऊ !!"

दोघांच्या आवडीचं त्रांगडं
आहेच जरासं विचित्र
and  still ...
ते...दोघे....एकत्र !!

ती चालताना घेणार हात हातात
ते.. त्याला.. बालिश वाटतं
त्याचं चारचौघात बबड्या म्हणणं
तिला ...असभ्य वाटतं.....

कधी तर....
ती noodles  खाते हातानी
तो डोसाहि काटेचमच्यानी खातो
तिला सिरिअल्स प्रिय कायम..
तो क्रिकेट वर दिवस घालवतो

त्यांच्या वागण्याचं combination
आहेच जरा....विचित्र
and still....
ते ...दोघे......एकत्र !!

तिला यश चोपरांचे pictures
त्याला इंग्लीश मूवीज आवडतात
तिला कँडल लाइट डिनर्स
त्याला जागा मिळेल तिथे आवडतात

ती बुकिंग करायला सांगते
तो म्हणतो, "सहज मिळाल तरच पाहू्."
ती म्हणते "दिवाळी पहाट बघायचं?"
तो म्हणतो "सिंहगडावर जाऊ."

त्याचं हे combination
आहे खरंच विचित्र
and still....
ते ..दोघे ..एकत्र !!

तिला यायला उशिर झाला
की हा फोन करत सुटतो
तो ट्रॅफिक जॅम मधे अडकला
तर ..तिचाही जीव तूटतो

तिला 'माहेरी जा' म्हणतो
पण स्वारी दुसऱ्याच दिवशी न्यायला
तो टूर वरुन येणार म्हणून
ती ....थेट.. विमानतळावर घ्यायला...!

एकमेकांशिवायचं हे न करमणं
आहे नं जरा विचित्र?
and thats why....
they both are...एकत्र !!!!

*******

No comments:

Post a Comment