गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज वर्षाचा शेवटचा  एक  दिवस राहिलाय .....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल,अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,॥
पन तितकीची जवळ आली,खूप काही सोसल,
खूपकाही अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद मित्रांनो देतअसलेल्या साथीबद्दल......
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो......
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीने, भरभ­राठीचे "राहो"...
 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।                         
चला उभारू पुन्हा आता,
पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे,
पोचवू हा संदेश घरोघरी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”...
नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
स्वातंत्रपूर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे,
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे..
ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजू दे
आणि हिन्दू नव वर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे.
म्हणूनच 1 दिवस अगोदरच
              सांगतोय
मराठी आहोत मराठीच राहणार,
नव वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
                     मी नाही दिला...
        पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
              ते येत्या गुढी पाडव्याला
                 तुमच्या घरी येतील.
                 त्यांची नावं आहेत...
                            सुख,
                           शांती,
                        समृद्धी...!!!
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू आहोत, गर्व असलाच पाहीजे ,

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका ...

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका ...

कारण उत्तम दिवस आठवणी देतात.....

चांगले दिवस आनंद देतात,..

वाईट दिवस अनुभव देतात...

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात....

Happy new year gudi Padwa Sms

आज वर्षाचा शेवटचा एक   दिवस राहिला.....
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,
खूप
काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल......
धन्यवाद
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा......
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,समृद्धीने,भरभ­राठीचे जाओ....

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻

Good morning Sms

🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
🍀     आपुलकी असेल,    🍀
          तर आयुष्य सुंदर..
       💐 फुले  असतील, 💐
              तर बाग सुंदर...
          गालातल्या गालात
       एक छोटस हसु असेल,
        😊 तर चेहरा सुंदर...
                    आणि....
      नाती मनापासून जपली,
        तर आठवणी सुंदर...!
       

🌺🌼 शुभ सकाळ 🌼🌺
         🙏🙏🙏🙏

Good morning Sms

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला
धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर
सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला

नक्की वाचा खुप छान बोध….

नक्की वाचा खुप छान बोध….
एकदा एका ठीकाणी दशक्रिया विधी चालु
असतो . लोक अजुबाजुला बसलेली असतात .घरचे लोक
रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात .
शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो
एका पत्रावली वर चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात.
आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम
मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो
आणी भटजी कडे विनवणी करतो की
मला खुप भुक लागली आहे .दोन दिवस झाले
पोटात अन्नाचा कण नाही माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातिल एक गोळा मला द्या .हे
ऐकुन भटजी संतापतो.भटजीच बोलण ऐकुन लोक ही
त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी
मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन
त्याला हाकलून देतात. तरी पण तो माणुस परत विनवणी करतो.
आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला.त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा
तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा
दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे.
म्हातारा तरी ऐकेना ..म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे.
त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात.
मग म्हातारा म्हणतो स्वर्ग कुठ आहे.
भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे
जण त्या म्हातार्याला हाकलून देतात.
(दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा
नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी
असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील
पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो.
सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ
झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात
ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का
काय तुला ? हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो “बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला पाणी नाही म्हणून पाणी देतोय. ..
लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी म्हातारा म्हणतो
अमरावतीला
लोक म्हणतात कुठ आहे अमरावती?
म्हातारा म्हणतो
खुप लांब आहे अमरावती
लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात
“आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय
आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल . यावर म्हातारा म्हणतो
इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा
भटजी पोचवत असेल तर
मी टाकलेल पाणी माझ्या शेताला का मिळणार नाही?
हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या
म्हातार्याच्या पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन
अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी झिगंराजी जानोरकर
एकही दिवस शाळेत न गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा
हा होता .वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच
अस नाही तर आपल्या डोक्यातील
मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो.

ज्याने रचना केली त्याला सलाम

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?

प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही

घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?

हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?

कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा

राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?

कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे

कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत

मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही

घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग

काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?

निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई

फक्त हिमतीने लढ

काही घरगुती उपचार

 जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.
 जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.
 जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.
 घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.
 रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.
 हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...
 दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या , तिलाही उतरायला सोप्प होईल अन् तुम्हालाही !
 हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा...

Funny pizza 🍕 order

पक्या : वर्तकनगर डॉमिनोज का?

डॉमिनोज : होय सर, बोला आपली

पिझ्झाची काय ऑर्डर आहे?

पक्या : नाही.. ते तुमच्या शेजारच डिम्पल वाईन्स उघडल आहे का?

          जरा बघून सांगना!!!!!!

😂😂😂😂😂😂😂😂

Funny women's

आज बायकोची एक सुंदर मैत्रीण घरी आली होती...
आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो......
बायकोने कुक्कर लावले होते. १०-१२ शिट्ट्या झाल्या तरी ऊठायचे नाव घेत नव्हती....

शेवटी मी म्हटल ... अगं ती डाळ जळेल....😁

ती फटकन् म्हणाली...  जळू देत जळली तर... पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही ... 😳😁😜😂😂😂

Desh Droh...

महाकवी नामदेव ढसाळांची खालील कविता जरूर वाचा. मगच माझ्या कविता आणि भाषेला नाव ठेवा.
॰॰॥देशद्रोह॥॰॰
०
'माणूसकीच्या रक्ताचा अभिषेक
घेणा-या शेंड्या ऊपटणे', असेल देशद्रोह...
तर हो!
मी केलाय देशद्रोह!!
०
हो, मीच मारल्यात ढेराळलेल्या
भटशाहीच्या ढुंगनावर लाता
अन् मारत राहिन तिच्या
माकड हाडाचे मणके गळेपर्यंत...
०
आम्ही मागितला न्याय ,
तो देशद्रोह?
आम्ही म्हणालो 'समता-बंधुता',
तो देशद्रोह?
आम्हाला तुमचा धर्म नको
नकारतो तुमचे नपुसक देव,
देशद्रोह?
आम्ही म्हणतो 'चला एक होऊ, जाती तोडू'
तोहि देशद्रोह?
०
तुमच्याकडे नेहमीच असते 'हाफ चड्डी'
झाकायला तूमच्या कंडाळ संस्कृतिची लाज
तूमच्या मार्मिक भाषेला असतो
'धेड - लांडे' शब्दांचा साज...
०
तूमच्या छिनाल भेजातून
प्रसवणारा प्रत्येक विचार तूमची देशभक्ती असते?
तुम्ही मारता 'सत्यधर्माचे' पहारेकरी,
देशभक्ती?
तुम्ही काडता नथुरामी गेंड्यांचे जुलुस,
देशभक्ती?
तुम्ही जाळता 'विजयी विश्व तिरंगा प्यारा' ,
देशभक्ती?
०
आमच्याकढे बोट दाखविणा-या
मनुवादी दलदलीतील गांडुळांनों!
जरा डोकावून पहा
तुमच्याच बोच्यातुन सुटते
देशद्रोहाची दुर्गंधी...!!
० नामदेव ढसाळ

"बिल गेट" चे भारतीय लोकांविषयी मत...

"बिल गेट" चे भारतीय लोकांविषयी मत...
तो म्हणतो,
"भारत हा जगात
सगळ्यात श्रीमंत देश आहे.
या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी "भारत हा महासत्ता होऊ शकतो,
परंतु ,
मजेची गोष्ट ही आहे कि, या देश्यातील
लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून,
शेतकरी देवाला
दोष देत आत्महत्या करतो...।
कारण ,
त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण
आहे हेच त्याला कळत नाही ...।

या देश्यातील गरीब जनतेला कळत
नाही कि तुमच्या गरिबीला कोण जबाबदार आहे ?
इथल्या तरुणाला
कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे...?
भयाण वास्तव...
१) इथल्या तरुणाला गुलामी कळू नये
म्हणून, क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदीरे, यांची अफूची गोळी दिलेली असते तो त्यामध्येच गुंग झालेला असतो...
तसेच,
पायी, वारी, सण, उत्सव यांच्या नादी
लावले जाते....।
मग, ताण (Tension) आला कि दारूची दुकान जवळ असते....
करतो जीवन बरबाद...,
मग, स्वतःला दोष देतो ...
२) इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून...
भांडणे लावणाऱ्या मालिका,
तसेच उपास- तापास, व्रत-वैकल्ये....
यांमध्ये त्या गुंग
असतात ...
मग त्यांचे कुटुंब आणि
त्या...
त्यांना मग कोण सहन होत नाही ...(सासू, सासरे)
३) इथला नौकरी असणारे पुरुष असतात...
ते घाण्याला लावलेल्या
बैलासारखे राब-राब राबत असतात...
बँकेने दिलेले हफ्ते फेडण्यासाठी....
त्यालाच कळत नसते तो काय करतो ...
कारण, पगार जरी एक
लाख असला तरी ८०,००० हफ्ते
फेडण्यासाठी घालवत असतो ....।
एक बँकेचे कर्ज फेडले कि मग, बायको दुसरे (मोठे घर) कर्ज
काढायला सांगते...
काम एवढे असते
कि तो डोके वर काढू शकत नाही...
4) जेष्ट नागरिक ...
नोकरी करून शेवटी कुणीही त्याचे ऐकत नाही ...।
आश्रमाची वाट बघत असतो...
आणि,
जे लोकं जागरूक आहेत त्यांना...
अंधश्रद्धा निर्मुलन समिती, भ्रष्टाचार निर्मुलन समिती..
अनेक NGo मार्फत ..
वेगवेगळ्या पक्ष्याद्वारे गुंतून ठेवले जाते ...
मग कसा बदल होणार...?
कोण करणार...?
आता बाकी आहेत
त्यांनी विचार करावा...

Maitriche Nate Sms

बंधना पलीकडे एक नाते असावे ,
शब्दांचे बंधन त्याला  नसावे,
भावनांचा आधार असावा , दुख्खाला तिथे थारा नसावा ,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा

Do your work

अभ्यास करत राहा
नापास व्हायला घाबरु नका😜
.
लाइन मारत राहा
सैंडल खायला घाबरु नका
😜.
प्रपोज करत राहा
नकाराला घाबरु नका
😜.
.
.
कारण गीते मध्ये सांगितले
आहे...
कर्म करत राहा.…
फळाची चिंता करू नका
😀😀😀😒😒😒😒😜

गाय छाप

माझा मित्र पावसाळ्यात लहानपणी शाळेत जाताना वह्या-पुस्तकांना जपत नव्हता......

पण आता पावसाळ्यात न  विसरता..... गायछाप प्लास्टिकच्या पिशवीत नेतो........ हे बघून डोळे भरून येतात खरंच...

😂😂😂😂😂

AFJL

शिक्षक- मुलानो ABCD म्हणा .....
,
विद्यार्थी- BCDEGHIKMNOPQRSTUVWXYZ
,
शिक्षक- #AFJL कुठे आहे???
,
विद्यार्थी- फाडला की शिवरायानी ....
परत जेवढे निघतील तेवढ्याना पन फाडून टाकू ....

🚩🚩
मास्तर आज पहिल्यांदा खुश😝😝😝😄😄

God faith

"किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही"
"एखाद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"
..
..
..
..
..
..

"आपल्या देवावर नेहमी
नि:संकोच विश्वास ठेवा"
"योग्य वेळी तो इतकं देतो की
मागायला काहीच उरत नाही"

Aanand ani Dukhhha

आनंद हा एक भास आहे,
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा 'स्वत:वर पूर्ण विश्वास' आहे.

Dosti Maitri prem

👵🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
👨🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
👩🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
👧🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेल ते
.
👦🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो...
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
👱🏻😊प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी👫 नसते
प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ
असत
नेहमी
पण समजायला थोडा उशीर होतो
आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये
आसवांचा ओलावा ——
हे आयुष्य दिले आई-बाबानीं
हे आयुष्य घडवले शिक्षकांनी
पण हे आयुष्य
- सजवले
- रंगवले
- बहरवले
- फुलवले
फक्त आणि फक्त तुमच्या 👉सारख्या "मित्रांनी"
माझ्या आयुष्यातील
सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला,
माझा......... 👇
           !!मानाचा मुजरा !!
👫👬👫👬💝👬👫👬👫

Happy Gudi Padwa

अरे ३१ फस्टला आदीच १५ दिवस बोंबलत होता हँपी न्यु इयर हँपी न्यु इयर..........💥
आता आपलं मराठी वर्ष चालू व्हायला 6  दीवस राहीलेत तरी सगळे गप्प........😳😳😳
मराठी असाल तर आज पासुनच नाही तर आता पासुनच बोला.....
🙏नविन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा🙏

👏👏👏👏👏👏👏
 

स्वातंत्र्यपूर्व काळातील उमेद पुन्हा एकदा जागु दे,
इंग्रजीच्या ३१ ला पुन्हा एकदा लाजू दे..
ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजू दे
आणि हिंदू नव वर्षाचे स्वागत त्रिखंडात गाजू दे.

म्हणूनच सहा  दिवस अगोदरच
              सांगतोय

मराठी आहोत मराठीच राहणार,
नव वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार.😊😊

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼