असेच होते एक गाव


 
 
 
 
 
 
II असेच होते एक गाव II

 
 
 
 
 
 असेच होते एक गाव मी पाहिलेले..
घर होते मातीचे शेणाने लिपलेले..
अंगणात तुलसी वृंदावन मांगल्य वसलेले..
अमृताची बोली माणुसकी जपलेले..!!

 
चहुबाजूला गर्द झाडीने नटलेले ..
पशु पक्षी, गो धन विपुल बहरलेले..
पाखरांनी किलबिल दुकान थाटलेले..
स्वयंसिद्ध सुख समृद्धिने डवरलेले..!!

कोंबड्याच्या बांगेवर जागे झालेले..
भल्या पहाटे शेतात राबलेले ..
मातीच्या कुशीत सोन पिकलेले..
संयमी समाधानात सुख लाभलेले..!!

कुणा दृष्टाच्या नजरेत भरले..
डोंगर माथे क्षणात झुकले..
निर्जीव नद्या, जलस्त्रोत आटले.
वणव्यात कुणी गाव फुंकले..!!

शहरी वारे कसे गावात शिरले..
जंगल तोडीचे पेव फुटले..
हव्यासी विद्रूप बकाल झाले..
पैश्याला आता पाय फुटले..!!

स्वार्थ मतलबाने पुरते घेरले..
विष बिज हे कुणी पेरले..
स्वप्नातले गाव माझे हरवले..
आता कवन मात्र उरले..!!
 
# Marathi Khichadi 

No comments:

Post a Comment