🐓 *कोंबडीचा रस्सा,*
🍖 *मटणाची साथ,*
🐟 *मच्छीची आमटी,*
                      *नी*
🍚 *बिरयानिचा भात,*
🍤 *बोंबलाची कढी,*
🍛 *भारलेल ताट,*

*खाउन घ्या सगळ*
              *"श्रावण"*

*महिना यायच्या आत.*

😂😂😂😂😋😋😋😄😄😄

वेगळं राहायचं सुख ।
ऊन ऊन खिचडी, साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई- मामंजी,नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणे रावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळ राहायचं भारीच सुख!
सगळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटलं तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर ढलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते ?
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अतंरच खुप,
वेगळं राहायचं भारीच सुख !
दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं .
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील सा-या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळ राहायचं भारीच सुख. !
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांचं काही कळतंच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतंच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची त-हाचच नवी,
घोटभर पाणी द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडलं तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचंही नाही.
स्वयंपाक करायला मीच,
बाळ रडलं तरी घ्यायचं मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं रहायचं कळायला लागलं सुख. !
सासुबाई रागवायच्या पण ब-याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची,
नणंद बिचारी ऊर नि पुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी!
थंडगार खिचडी, संपलंय तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलंय सुख.!!!

*पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या*

थोडा बियरचा गंध घ्या
थोडा चकन्याचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा बियर बार उसळतोय
वारा दारु घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
*आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या*

संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली, की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही..

ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे,
पण ती तुमच्या  विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे.

टाल वाजे , मृदंग वाजे ,
वाजे हरीचा वीणा ,
माउली निघाले पंढरपुरा ......
मुखाने विट्ठल विट्ठल म्हणा.....
।।आषाढ़ी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा।।..

*_आजची वस्तुस्थिती_*
*_घरं मोठी पण कुटुंबं छोटी_*
*_भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब_*
*_दर्जेदार औषधं पण आरोग्य ढासळलेलं_*
*_चंद्रावर पोहोचले पण शेजाऱ्याशी ओळख नाही_*
*_प्रचंड पैसा पण मन:शांती नाही_*
*_उच्च बुद्ध्यांक पण भावनांक खालावलेला_*
*_माहिती खूप पण शहाणपण नाही_*
*_आणि सरतेशेवटी_*
*_माणसं भरपूर पण माणूसकीच नाही!_*

परमेश्वराने नात्याचा सुंदर कोमल गजरा गुंफिला आहे!

   कोणी हातात बांधला..

तर कोणी केसात माळला आहे!

कोणी त्यातील फुले अजूनही पुस्तकात
ठेवली आहेत!

पण राहिला तो सदैव त्याच्या जवळ ज्यांनी,
त्याचा सुगंध मनात जपला आहे! 👌👌

🌺झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठ होत चाललोय.
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… . "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… . "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… . कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
   

🌸सदाफुली सांगते रुसुन रुसुन रहायच नसत हसून हसून जगायच असत.
🍁रातराणी सांगते अंधाराला घाबरायच नसत काळोखात ही फुलायच असत.
🌹गुलाब सांगतो येता जाता रडायच नसत काट्यात सुद्धा हसायच असत.
🌼बकुळी म्हणते सावळ्या रंगाने हिरमुसायच नसत गुणाच्या गंधाने जिंकायच असत.
🌷कमळ म्हणते संकटाच्या चिखलात बुडायच नसत संकटाना बुडवून फुलायच असत.

» रिमझिम धून, आभाळ भरून...
------------------------------------------

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून

समर्थ रामदास स्वामी

जन्म : एप्रिल १६०८
मृत्यू : २ फेबुवारी १६८१
रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी आरती.
समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय.
दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या (आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखात समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला.

रघुनाथ अनंत माशेलकर





साधारणपणे १९५० ते १९६० या दशकातली घटना! मुंबईच्या युनियन हायस्कूल या शाळेत घडलेली. शाळा तशी गरीब परिस्थितीतली, पण तिथले शिक्षक मात्र श्रीमंत! धनाने नव्हे बरं ज्ञानाने. तिथेच भावे सर पदार्थविज्ञान शिकवायचे. प्रयोग करुन, विद्यार्थ्यांना अनुभव देऊन शिकवण्यावर त्यांचा विश्र्वास होता. साबण कसा करायचा, हे पाठ करुन परीक्षेत लिहिलं तर पूर्ण गुण मिळतात हे माहिती असून त्यांनी मुलांना, शिवडीला हिंदुस्तान लिव्हरचा साबणाचा कारखाना बघायला नेलं होतं. एकदा बहिर्गोल भिंगाविषयी शिकवतांना, त्यांनी सर्व मुलांना शाळेबाहेर उन्हात नेलं. भिंग खालीवर करुन, कागदावर एक प्रखर बिंदू मिळवला. त्यावर सूर्यकिरण एकवटले गेले होते.कागद जळू लागला. त्या क्षणी भावे सरांनी, आपल्या एका बुद्धिमान विद्यार्थ्याला हाक मारली, 'माशेलकर, तूही जर या भिंगाप्रमाणे, तुझ्यातल्या सर्व शक्ती एकवटल्यास तर जगात काहीही मिळवू शकशील.' या घटनेने, जीवनात यशस्वी होण्याची गुरुकिल्ली माशेलकरांच्या ओंजळीत पडली आणि माशेलकरांसारखा एक प्रतिभावंत वैज्ञानिक भारताच्या ओंजळीत! सूर्यकिरणं समांतर जाऊ दिली तर त्यांच्यात प्रचंड शक्ती असूनही त्याचा वापर होत नाही. ही शक्ती एकवटली तर मात्र किमया घडवू शकते, हे तत्वज्ञान, छोटया रघुनाथच्या मनात खोलवर रुजलं. पुढे हेच रघुनाथ माशेलकर, सी. एस. आय. आर. चे प्रमुख झाले. प्रमुखपदाची सूत्रं हातात घेतली, तेव्हाही त्यांच्या मनात हीच भिंगाची घटना घुटमळत होती. त्या वेळी सी. एस. आय. आर. मध्ये २८,००० लोक कार्यरत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचं समातंर चालणं थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ठ पद्धतीने बांधलं आणि मग त्यातून निर्माण झालं, भारतीय वैज्ञानिक संशोधनाचं एक अचाट पर्व! एका सृजनशील शिक्षकाने, एका विध्यार्थ्याला दिलेल्या गुरुमंत्राने, भारताच्या प्रगतीच्या इतिहासात मोलाची कामगिरी घडवली.

मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान!

रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान! शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ठ घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.


आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय ठरला.डॉ. माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचंच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सवानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं. बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले.

आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्‍या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्‍यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंध बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं.


त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंटं डॉ. माशेलकरांनी मिळवले. बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर, डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.

भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, 'भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल. आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. 'मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो' असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत! पण हा आहे फक्त ट्रेलर, संपूर्ण चित्रपट ज्याला ज्याला शक्य होईल त्याने जरुर पहावा!

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला महाराष्ट्रीय

साने गुरुजी


साने गुरुजी - [Sane Guruji-Pandurang Sadashiv Sane] पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी जन्म : २४ डिसेंबर १८९९ - मृत्यू ११ जून १९५०.

१९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो.
पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई’ या पुस्तकातून केले आहे. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो ’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला.

#साने गुरुजी #sane Guruji # history of India

कुसुमाग्रज | वि.वा. शिरवाडकर

एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.
जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


















लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - [Lokmanya Bal Gangadhar Tilak] मातीतले कोहिनूर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.

टिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सुर्याचे पिल्लू’ म्हणायचे.
 
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.
यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
टिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी’ व ‘जहालमतवादी’ असे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९१६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अ‍ॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.
इंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’? असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.
लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी ‘गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.
लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.
लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. सन १९२० जुलैत त्यांना हिवतापानं घेरलं. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरु होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेची येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.
१ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारतमातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. हां हां म्हणता ही घटना सर्व मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते.
ज्या ठिकाणी मुंबईतील हजारो लोक रोज सकाळ संध्याका्ळ चौपाटीवर फेरफटका मारायला जातात, त्याच ठिकाणी सरकारी परवानगींने लोकमान्य टिळकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व लोकांना चौपाटीवर आल्यानंतर नित्यशः कै. लो. टिळकांचे दर्शन रोज मिळत असतं. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढारीही होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यादिवशी पं. जवाहरलाल नेहरू ही मुंबईत होते. त्यांनाही ही दुःखद घटना कळल्यावर अतिशय दुःख झालं. ते म्हणाले “भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला. यापुढे देशाची सर्वांनाच चिंता वाटणार आहे, तरीसुद्धा जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकलेले नाही. आपण सर्वांनी हे दुःख विसरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडत रहाणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल”.


#लोकमान्य बाळ गंगाधर टिळक #lokamanya Tilak #Bal Gangadhar Tilak #History of India

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले - [Jyotirao Phule, Mahatma Jyotirao Govindrao Phule] जोतीराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा जोतिबा फुले , जन्म : ११ एप्रिल १८२७ - मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०









इ.स. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
 महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

👤 मराठी माणसाला काय येते?

👤 मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.

👤 मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.

👤 मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.

👤 मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.

👤 मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करता येते.

👤 मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.

👤 मराठी माणसाला  क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.

👤 मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.

👤 मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी  बनता येतं.

👤 मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.

👤 मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.

👤 मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.

👤 मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा 'मराठी' असल्याचा.
🚩 🚩 🚩
😎 😎 😎

का 'मी मराठी' ?
- मी 'मराठी' आहे कारण...
- घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,
वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.

- मी 'मराठी' आहे कारण...
- ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,
घरात 'पाडवा' साजरा करतोच.

- मी 'मराठी' आहे कारण...
- जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,
चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.

- मी 'मराठी' आहे कारण...
- रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,
ठेच लागल्यावर 'आई गं' हेच शब्द तोंडात येतात.

- मी 'मराठी' आहे कारण...
- हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,
मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.

- मी 'मराठी' आहे कारण...
- 'छत्रपती शिवाजी महाराज की'
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून आपसूक 'जय' आल्याशिवाय राहत नाही.

- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'HIGH LIVING' असलो तरी,
हात जोडून 'नमस्कार' बोलल्याशिवाय माझी 'ओळख' होत नाही.

- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'BRANDED PERFUMES' वापरले तरी,
'उटण्या'शिवाय माझी 'दिवाळी' साजरी होत नाही.

- मी 'मराठी' आहे कारण...
- गाडीतून जाताना 'मंदिर' दिसलं
कि,
आपोआप 'हात' जोडल्याशिवाय मी राहत नाही.

माझ्यातले 'मराठी'पण जोपासण्याची मला गरज नाही.
ते माझ्या 'रक्तात' भिनलंय.

आणि...

या 'मराठी'पणाचा मला खूप खूप 'गर्वच' नाही तर 'माज' आहे.
🚩जय हिंद ! जय महाराष्ट्र !!!🚩

एक चांगला मराठी  मानुस  असाल तर नक्की हजार मराठीनां    पाठवा.

बस गच्च भरली होती. आता ती सुरु होणार तोच ड्रायव्हरम्हणाला,“गाडीचाटायर पंक्चर आहे.....”

ताबडतोब कंडक्टर उतरला.....त्याच्या मागोमाग गण्या उतरला...

दोघांनी मिळून गाडीचा टायर बदलला....
बस सुरुहोण्यासाठी सज्ज झाली.

कंडक्टर गण्याला म्हणाला, “मी तुम्ही केलेल्या मदती बद्दली तुमचा आभारी आहे. आजकाल लोक एस.टी.वाल्यांना अजिबात मदत करीत नाहीत, पण साहेब तुम्ही स्वतः गाडीखाली जाऊन टायर चढवला. हातपाय , कपडे खराब करून घेतलेत. मी खरच खूप आभारी आहे.

तेवढ्यात गण्या म्हणाला, ” मित्रा, आभार मानण्याचे काहीच कारण नाही..... माझी बायको १० वर्षा नंतर माहेरी जातेय, ती याच बस मध्ये आहे...
टायर पंक्चर झाल्या मुळे माहेरी जाण तीचरद्द होऊ नये म्हणून केली हि सगळी खटपट....

एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते..
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि .
तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल...
.
.
मुलगी- offcourse कोंबडी
.
.
.
ऑफिसर - तुम्ही fail झालात घरी जा..
.
.
( ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते ,परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपरत तेच उत्तर देते, तिल परत नापास व्हावे लगते,
.
.
7/8वेळा झाल्यावर).
.
.
.
ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोरएक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल?
.
.
.
मुलगी- offcourse "म्हातारा"
.
.
.
ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा..
.
(मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी .
.
तुम्ही मला नापसच करता...
.
.
तुम्ही सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक...
.
आन म्हणे बोर्डात 95% मिळाले*
😜😂😜😂😜😂😜😂
जा घरी आता..

काही घरगुती उपचार

👉 जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.

👉 जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.

👉 जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.

👉 घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.

👉 रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.

👉 हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...

👉 दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या , तिलाही उतरायला सोप्प होईल अन् तुम्हालाही !

👆 हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा...🙏
😆😆😆😆😆😆😆😆😆
.

POST आवडली तर FRIEND REQUEST पाठवा....

एक छोटीशी ह्रदयस्पर्शी......प्रेमकथा"
राधा...!
नावाप्रमाणेच ती राधा होती...
म्हणजे दिसायला खुप सुंदर होती...
ती रोज सकाळी पार्क मध्ये "joging" ला जायची...
तीच्या हातात मोबाईल आणि कानात नेहमी कॉड
लावलेला असायचा...
कृष्ण पण तिथेच यायचा "joging" ला...
राधा आणि कृष्ण एकमेकांच्या समोरच बसायचे आणि दोघे
ही एकमेकांके पाहुन स्मित हास्य करायचे...
असे 2-3 दिवस असेच चालायचे ...
जस जसे दिवस सरायचे तस तसे ते एकमेकांच्या हळुहळु,
जवळ येऊन बसु लागले...
मग एक दिवस तीने त्याला हाताने खुणा करुन "What's aap" no...
दिला....
मग ते "What's aap" वर "chating" करु लागले...
"Hi...!, Hello...!"
वरुन त्यांची "chating" सुरु झाली...
असे बरेच दिवस चालु होते...
"chating" करते वेळी ते एकमेकांकडे पहायचे आणि स्मित,हास्य करायचे....
असे दररोज चालायचे,
जवळ बसुन देखील ते
एकमेकांशी कधीच बोले नाही...
एक दिवस राधा मोबाइल हातात घेऊन कानाला कॉड लाऊन,
"music" ऐकत असलेले पाहुन,

कृष्ण "मलाही "music" ऐकायचे" असे बोलतो. ..
तेव्हा ती लगेच आपल्या कानातील कॉड काढुन,
त्याच्या कानाला लावते...
तर त्यात "music" नसलेले पाहुन तो तिच्याकडे आचर्याने,
पाहतो....
तेव्हा ती त्याला हाताने खुणा करुन सांगते की,
"मला ऐकायला आणि बोलायला येत नाही...!"
कृष्ण काही काळ जागीच स्तब्ध होतो आणि तिथुन निघुन
जातो.....
राधा तो आपल्याला सोडुन गेल्यामुळे खाली मान घालुन रडु
लागते.......
पण काही वेळा नंतर कृष्ण तिच्या समोर हातात गुलाबाचे फुल
घेऊन उभा राहतो...
तो त्याच्या हातातील गुलाब तिच्या हातात देतो. ....
आणि " I Love You....!"
असे म्हणुन तिला आपल्या मिठीत घेतो....
Happy Ending.....!!!!
love forever ..............................

*ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे* *पण ती तुमच्या  विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे*

*जशी सकाळची  शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज  दुपारी शाळा सुटतांना कानाला  मंजुळ वाटतो*

🙏😊🍁 *सुप्रभात* 🍁😊🙏

🍃 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍃