Out of box Things

एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात.

चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते, प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता,
नीट सायकल चालवता येत नाही का ?
सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे....

त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले,
"आरडाओरड करुन काही होणार नाही, लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल.. मित्रांनो आपण याला मदत करुया, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये"
सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले आणि प्रत्येकाने १०- २०रुपये त्या मुलाला दिले.

मुलगा एकदम खुशाच झाला कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते.

गर्दीतल्या एकाने सहज विचारले,-
"अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ?
मालकाला काय सांगितले असते ?"

मुलगा हसून म्हणाला :-
"अरे तोच तर मालक होता"!
.
तात्पर्य :- व्यापार्याचा नादच खुळा...
Out of box things करनेवाले हि  business कर सकते है।

No comments:

Post a Comment