Shrungarpur

#श्रुंगारपुर
  1995 साली बाबांची बदली #देवरुखला होऊन  माझा श्रुंगारपुरशी संपर्क जरी तुटला असला तरी त्या गावाशी नाते गेली 25-30 वर्षे अजुन #टीकुन आहे.
आयुष्याची सुरुवात,माझे बालपण,पहिले पाऊल,पहिला शब्द,पहिली शाळा,पहिला मित्र,पहिला खेळ,मासे पकडण्याची कला,भजनाची आवड, गावची ओढ आणि माणुस जोडण्याचे #संस्कार माझ्यावर याच #गावात झाले ते ही खोलवर.
       वयाची 6 वर्षे पुर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश मिळतो पण मी अडीच वर्षाचा असल्यापासुनच शाळेत जावुन बसत असे,त्यानंतर पहीली आणि दुसरी ला तर मी कधीच #चालत घरी नाही गेलो वरच्या वर्गातील मुले मला कांदे-बटाटे (म्हणजेच पाठीवर उचलुन)घ्यायचे एकाकडे बॅग तर एकाकडे चप्पल असायची, गुरुजींचा मुलगा म्हणुन माझा थाट वेगळाच असायचा.सातवीतल्या मुलांसोबत पाण्यातुन #पार्लेजी खायची मज्जा,त्यांच्या डब्यातला #फोडणीचा_भात मी आयुष्यात विसरु शकणार नाही.
        बामन नदीला लागुन 10-15 फुटावर आमचं घर पावसाळ्यातुन  पुराच्या वेळेला येणारे #दगडांचे आवाज आजही कधी-कधी कानात वाजतात.
      बाबा कामानिमित्त बाहेर गेले की मी दिवसभर नदीत मासे पकडत बसायचो,त्यात काठीला गांडुळ बांधुन शिट्टी वाजवत #मासे_पकडायचो,पोहायला लवकर शिकायला यावे म्हणुन कोणाच्यातरी सांगण्यावरून जीवंत #रतवा (छोटा मासा)पण बर्याच वेळेला खाल्ल्या आहेत.
             नदीशी संबंधित माझी गोड आठवण म्हणजे नदी आटली की कातळाजवळ एक डोह होता त्याच्या वरच्या बाजुला शेतीच्या मळ्या होत्या त्या ठीकाणी आम्ही थोडीशी  #कोथींबीर रूजवायचो आणि ज्या दिवशी ती तयार होईल त्या दिवशी नदीच्या त्या डोहातील संपुर्ण पाणी ताटलीने उपसुन त्यातील #मासे पकडायचो आणि त्या कोथिंबीर सोबत शिजवुन त्या शेतातच पार्टी करायचो.काय सुख होतं त्यात,एकदम भारी.
          खेळ पण त्यावेळी खुप मजेदार होते #लगोरी आणि #विटीदांडु  हे त्यात माझे खुप आवडीचे ,नदिपलिकडे खेळत असलेल्या त्या विटीदांडुच्या कावडीतील "कुत्ती कवाडी" मी एकटा असलो की आजही म्हणतो पण त्या शब्दाचा अर्थ आजपर्यंत काही मला कळलेला नाही.
        शेजारील #बारक्या जो  माझ्यापेक्षा  10 वर्षांनी मोठा होता तो आमचा त्यावेळचा ग्रुप लिडर होता त्या सोबत च्या आठवणी म्हणजे आमच्या #पार्टी असायच्या त्याही कसल्या..?? चहा बटर,चहा बिस्कीट स्पाँन्सर नेहमी बारक्याच असायचा. गुढीपाडव्याला आमच्या जाधव वाडीतील प्रत्येक घराची गुढी आम्ही उतरवायचो मग प्रत्येक घरातुन 2-3 रुपये मिळायचे मग आम्ही त्याचा रवा आणायचो आणि #शिरा करुन जंगी पार्टी करायचो.
         मी 5-6 वर्षाचा होतो असेन तेंव्हा बारक्या आणि आम्ही बिझनेस पण करायचो #निकमांच्या दुकानावरून गुळाच्या चिक्क्या,चणे,शेंगदाणे,दगडीगोळी विकत आणायचो आणि बारक्याच्या एका ओपन खिडकीत #दुकान मांडायचो आणि आणलेल्या कीमतीतच ते आम्हीच विकत घ्यायचो😂😂
पण देवदिवाळीच्या जत्रेत आमची उलाढाल मोठी असायची बारक्याच दुकान असायच त्यात तो पपनीसच्या शेडी,ताक आणि त्याच्या घरी लागलेली म्हैस-केळी विकायचा मी त्याच्या सोबतच असायचो या सगळ्यात मला एक वेगळीच #मज्जा यायची जी मी आजही miss करतो.
       सणाला सुट्टी पडायची आणि आम्ही गावाला यायचो पण सुट्टी संपुन परत श्रुंगारपुरला कधी जातोय असच नेहमी व्हायचं.
     श्रुंगारपुरचे सण ही त्यावेळी दिमाखात व्हायचे मग तो शिमगा असो,दहीहंडी असो की #देवदिवाळी .त्यात शिमगा म्हणजे वेगळीच मज्जा आमच्या जाधव वाडीची छोटी होळी उभी रहायची मग शेवर तोडुन आणणे ,ती उभी करणे यात मी सहभागी असायचो  आमचा #नाना मग माझ्यासाठी रात्री वाजविण्यासाठी #आमट्या घेवुन यायचा,आणि मग आठ दिवस खेळणे आणि फाक पाडणे यात नुसती धम्माल यायची.
      आमचे दादा-वहीनी म्हणजेच सख्खे आजी-आजोबाही मागे पडतील असे प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत माझी एक नाळ या गावाशी बांधुन राहीली.मला ते घर आजही माझं दुसरं मुळ घर किंवा दुसरं आजोळ वाटतं त्यांची मुलं नाना,रवी दादा, वंदुताई आजही मला #भावंडासारखीच वाटतात आणि आहेत कारण तेवढं प्रेम आम्हाला त्या घरातुन मिळालं आणि अशी खुप घरं या श्रुंगारपुरात आहेत जी आपलीशी वाटतात,मग ते #सुभेदारांचे घर असो,#आनंद दादाचे असो.
कोणीतरी #रक्ताची नातीच तिथे आहेत असेच सतत भासत असते...
       गाव #सोडतांनाचा तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे  जवळ-जवळ  संपुर्ण गावच आम्हाला निरोप देण्यासाठी स्टॉपवरती आला होता,त्यानंतर मला आजही आठवतंय जवळ-जवळ चार महिने नवीन शाळेत मी गेलोच नव्हतो,गावातुन #शहरात तर आलो होतो पण जे #सुख_समाधान श्रुंगारपुरने दिले ते कुठेच मिळाले नाही.
         आजही माझं #क्लिनीक ज्या #मारळ #बामणोली गावात आहे ती गावे निवडण्याचं श्रेयंच श्रुंगारपुरला जातं कारण या तिन्ही गावांची #ठेवण एकसमान  गावच्या मधोमध नदी,चारही बाजुन #सह्याद्री आणि तीच माणसांची ठेवण त्यामुळे मी अजुनही श्रुंगारपुरात असल्याचे बर्याच वेळा भासते.
    लहानपणी शाळेत असतांना आम्ही गावावरती निबंध लिहायचो-
      चारही बाजुंनी निसर्ग सौंदर्याने श्रुंगारलेले असे माझे श्रुंगारपुर😘😘😘

डॉ सुशील भालेकर

स्वर्ग आणि नरक

एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.

त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.

“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.

त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.

त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.

एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.

टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.

त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.

पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.

त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.

कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
चमचा तोंडा पर्यंत पोहचतच नव्हता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.

भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.

“हा नरक आहे...”देव म्हणाला.

“चल आता स्वर्ग पाहू.

”ते दुस-या दारातून आत आले.

ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.

तेच टेबल तेच खिरीचं भांडं.

भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.

पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.

आपापसात हसत आनंदाने राहत होती.

“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??

“सोपं आहे...”देव म्हणाला
" लांब दांड्याच्या चमच्याने स्वतः खाता आले नाही तरी दुसऱ्याला भरवता येते
या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत "

हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”

जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील...
सुंदर बोधकथा ....

Marathi Attitude Sms

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.

"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!😉

चांगल्या लोकांची सोबत

लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.

आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.

कुणी लिहिले माहित नाही पण छान लिहिले एकदा अवश्य वाचुन पहा

"शब्द" बदलला की "अर्थ"
 बदलतो...😂

गरिब माणुस *दारु* पितो.
मध्यमवर्गीय *मद्यपान* करतो..
तर, श्रीमंत लोक *Drink's* घेतात...

काम केल्यावर गरिबाला *मजुरी* मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीयाला *पगार* मिळतो..तर, काम केल्यावर आॅफिसरला *Salary* मिळते...

गरिब करतो ते *लफडं*.
मध्यमवर्गीय करतो ते *प्रेम*..
तर, श्रीमंत करतो ते *Affair*...

शब्दाबरोबर शब्द मांडला की *कविता* होते
शब्दाने शब्द वाढला की *भांडण* होते..
शब्दाने शब्द वाढत गेला की लेखकाची *Royalty* वाढते...

पैशाने गरिब असलात तरी चालेल पण , मनाने श्रीमंत रहा कारण गरिबाच्या घरावर लिहीलेलं असतं *" सुस्वागतम् " !*
आणि, श्रीमंताच्या घराबाहेर लिहीलेलं असतं *" कुत्र्यापासून सावधान " !!*

आयुष्य आईसक्रीम सारखं आहे, *"Test"* केलं तरी वितळतं आणि, *"West"* केलं तरी वितळतं..

*काही राहिलं तर नाही ना !!!*

🌀*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...*
*"काही राहिलं तर नाही ना?”*

🌀*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते*
*"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*

🌀*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला*
*"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*

🌀*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते*
*“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*

🌀*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* 
*"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”* 

🌀*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो*
*“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.* 
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*

🌀*एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. .....  

👏👏👏

चिमणी आणि कावळा

. 👇 *लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*👇
*(खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)*

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

👉 *गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -* 

      चिमणीचे सगळे काम आटोपले
ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

'गेला असेल कुठेतरी... येईल परत' 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... 

अनेक दिवस उलटले ...

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... 

तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा? 

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का?

 आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का?

 म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

*- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.*

चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

- म्हणजे ?

- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानिच नसतं अगं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात...

*त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही*

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

*…'थांब मला जरा करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

आपण फार एकटे झालेले असतो.... !!

- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

🌸मला कोणाचीच गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 🌸

- वेळीच *'टकटक'* ऐकायला शिका.
वेळ प्रत्येकाची येते।।.

छत्रपती शिवाजी महाराज - सर्व पुस्तके

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जिंजीरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

छत्रपती शिवाजी महाराज Status

"जर  शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
                -- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
                   -- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 -- स्वामी विवेकानंद.

"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
              -- बराक ओबामा, अमेरिका.

"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  -- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
               -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               -- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳⛳⛳ 

अभिमान असेल तरच शेअर करा.......

पाच मूर्ख 😂

*बिरबलाने शोधलेले*
*पाच मूर्ख*

अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."

"हां खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."

एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात आला.

बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ मूर्ख आणायला सांगितले होते."

बिरबल म्हणाला "खाविंद, एकेक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी."

बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला.

"महाराज, हा माणूस बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"

"आणि महाराज, हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."

बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव."

"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख."

"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव."

"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का? म्हणून चवथा नंबर आपला!"

"असूदे असूदे. आता लवकर पाचवा कोण ते सांग

"महाराज, पाचवा  आपल्यासारख्या  मूर्खाच्या कोड्याचं उत्तर  जाणून घेण्यासाठी,  दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून  हातात मोबाईल घेऊन चिकटून बसलेत ते

"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवे कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"
😅😂😝😜😊😀😍😂😅
📲📲📲

सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा.)

काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .

ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.

पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी  आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.

एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये. 

थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट  केली.

सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली.

अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.

अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.

एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं  : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? 

मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ?

ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं:  हो खूपच सुंदर आहे.

त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?

" खूपच रूचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".

मग काही दिवस ती गायब झाली.

अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं "मी जळगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का? 

मी म्हणालो  : जरूर भेटेन की.

"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.

मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.

म्हणाली  : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या.

मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.

ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा. 

मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.

शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.  

ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती.

मी बायकोला विचारलं:  आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?

बायको म्हणाली:  प्रिया जोशी येतेय. 

काय?

ती तिला कुठं भेटली?  तू तिला कसं ओळखतेस?

"जरा धीर धरा साहेब,  ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात.  यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.

-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .  

😃😂😜

(मेन विल बी मेन)

प्रारब्धाचा हिशेब  :

एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही,,,, असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.

''खूप सुंदर नाते आहे माझ्यात व देवामध्ये ....''
''जास्त मी मागत नाही आणि कमी देव देत नाही .......
👍👌👌
यालाच प्रारब्ध म्हणतात.......
जिवन खुप सुदंर आहे आनंदाने जगा ....

एका मुलाची आई... मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल...

चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फिरायला गेले, असताना वडीलांनी सहज प्रश्न केला....

👨🏻वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत👩🏻 आणी नविन आईत🙎🏻 काही फरक वाटतो का..?

👦🏻मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीश्चन्द्राची नातेवाईक...

वडीलांना नवल वाटल...🤔 त्यानी विचारल

👨🏻वडील: कस...काय !                             

👦🏻मुलगा:  माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फिरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची.....🍪🍲☺

"पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही...😔

हे सर्व ऐकुन वडीलांच्या डोळ्यात पाणी आल😢

👬*** मित्रांनो...***👭

👩🏻आई तेव्हा ही रडायची....😢 जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच...👶🏻

आई तेव्हा ही रडायची... जेव्हा तिच बाळ खाली पडायचा...

आणी...!

आई आज ही रडते.... कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून.

माणुस मोठा होतो👨🏻 पैसा कमवतो...💶 पण थकुन घरी आला की....!😒

वडील विचारतात... किती कमवलस...?👨🏻

बायको विचारते...कीती वाचविलेत...?👸🏻

मुलगा विचारतो... काय आणल...?👱🏻

आणी आई विचारते...👩🏻
'सकाळ पासुन काही खाल्लस...?'🤔

आता मी सांगणार नाही की पोस्ट शेयर करा... अस

"माझे सर्व मित्र👬👭 आईवर प्रेम करतात...👩🏻😘 सांगायची गरज काय....?
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

           I Love U Mom
                 😘😘😘

1. गाई-म्हशी विकत घेणे –
प्रकल्प खर्च - ६ लाख - १० जनावरे
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )

2. शेळीपालन –
प्रकल्प खर्च ४.५ लाख - ५० शेळ्या २ बोकड
(शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

3. कुक्कुटपालन –
प्रकल्प खर्च - ८ लाख -५००० पक्षी
(शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सी –एस टी)

4. शेडनेट हाऊस –
प्रकल्प खर्च - ३.५ लाख – १० गुंठे
(शासकीय योजना - ५० % )

5. पॉलीहाउस -
प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
(शासकीय योजना - ५० % )

6. मिनी डाळ मिल –
  प्रकल्प खर्च -१.८८ लाख
  (शासकीय योजना - ५० % )

7. मिनी ओईल मिल –
  प्रकल्प खर्च -५ लाख
(शासकीय योजना - ५० % )

8. पॅकिंग व ग्रेडिंग सेटर-
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार ९*८ मी.

9. ट्रॅक्टर व अवजारे –
प्रकार १- (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये १ लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५  % -इतर लाभधारकांसाठी )

10. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या कमी
प्रकार १- (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

11. पॉवर टिलर -८ बीएचपी च्या जास्त 
प्रकार १- (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )

12. काढणी व बांधणी यंत्र –
शासकीय योजना –रुपये १.२५ लाख ( ५० % )

13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
२० बीएचपी वरील चलित
प्रकार १- (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी
प्रकार २-(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी

15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान २ ते ४ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर

16. छोट्या रोपवाटिका साठी -–( १ हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान – ५०  भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर

17. गोडाऊन(वेअर हाउस)-
  प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन
  (शासकीय योजना-२५ %)

18. शीत गृह –५००० मेट्रिक टन साठी
(शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार १ साठी
३५०० प्रती मे .टन प्रकार २ साठी.

19. गांडूळ खत प्रकल्प –
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती
(शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प

20. उसाच गुऱ्हाळ -
प्रकल्प खर्च- १४ लाख
(शासकीय योजना- ५० %)

21. फळ प्रक्रिया उद्योग -
प्रकल्प खर्च- २४ लाख
(शासकीय योजना - ४० %)

22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
  प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर
  (शासकीय योजना- ४० %)

23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
   प्रकल्प खर्च- ४.५ लाख
    (शासकीय योजना - ५० % )

24. भाजीपाला सुकवणे-
   प्रकल्प खर्च-२४ लाख
   (शासकीय योजना-४० %)

25. कृषि सल्ला व सेवा केंद्र –
   प्रकल्प खर्च-५ लाख
   (शासकीय योजना-४०%)

26. सोयाबीन मिल्क व उत्पादने-
     प्रकल्प खर्च- ८ लाख
     (शासकीय योजना- ४० %)

27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)-  प्रकल्प खर्च-१० लाख

वरील माहिती थोडक्यात दिली असून या आणि यासारख्या किमान २०० पेक्षा अधिक योजना दर वर्षी राबविल्या जातात या बाबत अधिक माहिती तुम्हाला या लिंक वर
http://goo.gl/s0q2cS वर मिळेल.
Or www.startupfriend.in

जर ही पोस्ट तुमच्या उपयोगी नसेल तरी आपल्या किमान १० शेतकरी बांधवाना जरूर पाठवा.
🌱🌿🍂🍃🌿🍃🌴🌳
🙏धन्यवाद.