"पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त
म्हणतात...
वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन
म्हणतात...
आणि
'हिंदवी स्वराज्याची स्थापना'
करणाऱ्या वाघाला 'छत्रपती शिवाजी महाराज
म्हणतात....."
जय भवानी...
जय शिवराय...
जय शंभूराजे....
मेंढरांसमोर उभे राहून धाक दाखवायला तर
लांडग्यालाही जमत...
पण
लांडग्यांच्या घोळक्यापुढे थांबुन
डरकाळी फोडायला
काळीज
... अन रगत वाघाचच लागत..
हर हर महादेव
!! जय भवानी !!
राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे,यांना शहाणे समजू नका,
हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी,
तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो,
आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी?
आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला,
ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,

राजे, चला
मी तुम्हाला
तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

*** शब्दांचा खेळ ***

गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात !

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते !

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर !

शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते,
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!!!!

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!

स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शोधायचं,

डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जोपासून सुसंस्कृत व्हायचे,

आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा.

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!

What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं.,

जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच,

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!

तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.

मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे.

जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!!!!!!!!!!!!!!!!

वक्रतुण्ड महाकाय सुर्य कोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ll
*गणपती बाप्पा मोरया *
*मंगलमुर्ती मोरया *
“शुभ-प्रभात” “शुभ-दिन”.

एका लग्नात DJ
वाला नवरदेवाला विचारतो:-
"DJ किती वेळ वाजवायचा आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर
आपले
मित्र
जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात."

आज
सकाळी अॅडमीन बिल्डिगमध्ये
लिफ्टमधुन जात
असताना एक सुंदर
मुलगी फोनवर बोलत
लिफ्टमध्ये आली ..
आणि अॅडमीन कडे पाहुन
हसली .
लगेच फोनवर बोलली .
" चल ग फोन ठेवते , एक
HAndsam आणि dashing
मुलगा लिफ्टमध्येआलाय .
बघते काही जमते का?

बाय ..
.
.
.
. .
.
.
.
. .
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अॅडमीन काही बोलणार
इतक्यात ती बोलली .

" Sorry kaka , मला ना फोन
ठेवायचा होता म्हणुन
असे बोलले .
.........
.....
.
.
.
.
.

....

आईशपथ्थ...
एवढा Insult कधीच
झाला नव्हता......

पोलिस:काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा:प्रवचन ऐकायला!
पोलिस: कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा:दारूपासून होणारे दुष्परिणाम,
पोलिस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा : माझी बायको !!

'मराठी' म्हणजे आई
'मराठी' म्हणजे गोडवा
'मराठी' म्हणजे प्रेम
'मराठी' म्हणजे संस्कार
'मराठी' म्हणजे आपुलकी
'मराठी' म्हणजे महाराष्ट्र
'मराठी' म्हणजे शान
जागतिक 'मराठी भाषा ' दिनाच्या तमाम
महाराष्ट्राला शुभेच्छा .... जय महाराष्ट्र ....!!!!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी !
एवढ्या जगात माय मानतो मराठी !
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या !!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी || सर्व मित्र परिवाराला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेछ्या ||

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या WhatsApp chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले ||

आईची कास आटली मग चालू केली दूधाची बाटली.......

शाळेत जाऊ लागलो चालू केली पाण्याची बाटली ........

माध्यमिक शिक्षण चालू केले हातात घेतली थंडयाची बाटली .........

उच्च शिक्षण चालू केले  हातात घेतली बियर ची बाटली .........

ती चांगली वाटली पण त्याने तहान नाही भागली........


मग चालू  केली इंग्लिश बाटली तीने खिशाची तिजोरी आटली........

मग सुरु केली देशी बाटली ती काय बरी नाय वाटली........

तेव्हा चालू केली गावटी बाटली ती ऐवढी चांगली वाटली..........

ओव्हर लोड होऊन आतडी फाटली.........

मग दवाखान्यात गेलो मग डॉक्टरांनी लावली सलाईनं ची बाटली.........

पण त्या बाटली च काही चालेना शेवटी प्राणजोत मावळ ली बाँडी घरी आनली.......

आणि आंघोळ घातली.
मग अंगावर गुलाब पाणी आणि आतरची बाटली........

तिने हाऊस नाय फिटली.......



चितेवर ठेवली मग राँकेल ची बाटली.........

ती मग ओतली जिवाची हाऊस तिथेच मिटली.....

मित्रांनो दारु पिवुन गटारात पडण्यापेक्षा........

दुध पिवुन बलवान व्हा....

एक सुंदर पञ आईविना असलेल्या एका मुलाने आपल्या आईस
काव्यरूपाने लिहून पाठवले आहे ते मला आवडले म्हणुन आपल्या सर्वाना पाठवित आहे.

प्रिय आईस,
 
पत्ता.देवाचे घर,

           तुझा हात हवा होता
सदा माझ्या उश्यावर,

         थोपटून मला झोपवायला
अचानक जाग आल्यावर,
       
         मी अजून सुृद्धा दचकुन
जागा होतो मधिच,

      तुझी काळजी राञभर
सतावीत राहते उगीच,

             तु का इतक्या लवकर
सोडून गेलीस गाव माझ,

            ''आईविना पोर" असं
घेतात लोक नाव माजं,

           वरवरच्या पदार्थाची मला
चवच लागत नाही,

           काय करु तुझ्या दुधाविना
माझी भुकचं भागत नाही,

            पोरकेपणाची माझ्या भोवती
का ठेवून गेलीस जाळं,

            का खरच इतकी कच्चि होती,
तुझ्या माझ्यातली नाळ.

             तिथं कुणी आहे तुझ्याशी
बोलायला भरपूुरं,

             उगाच रडत जाऊ नकस
दाबून स्वत्तःचा उरं,

             बघ आई आता मी
रडत नाही पडलो तरी,

              मला ठाऊक आहे तु
गेली आहेस देवाघरी,

              भुक लागली तरी
बिलकुल मी रडत नाही,

               कारण मी हसल्या शिवाय
तुला चैन पडत नाही,

            पण रोज राञ झिली की
तुझ्या आठवणीचा थवा येतो,

            अंथरुणात लपून, पुसून डोळे,
मी गप्प झोपी जातो,

             बघं तुझ बाळ किती
समजूतदार झालं आहे,

             आणी वय कळण्याआधी
वेडं वयात आलं आहे,

             अजिबात म्हणजे अजिबात
ञास देत नाही पप्पाला,

              तुझी काळजी तेवढी माञ
घ्यायला सांग बाप्पाला,

               आणि सांग की हे
शहाणं बाळही आहे हट्टी,

             जर का काही झालं तुला
तर घेईल म्हणावं कट्टी,

            मी आता थकलोय
तुला ढगामधी पाहूनं,

             ये आता भेटायला
नजर तिथली चुकऊन,
           
              जमलं जर का सुट्टी घ्यायला तर ये निघून अशिचं,

             पोट भरतं ग रोज
पण मायेची भुक अजून तशीचं..........

        मायेची भुक अजुन तशीचं...

मायेची भुक अजुन तशीचं....��

        आईची किंमत ही ती नसल्यावरच कळणाय्रालाच कळते,,,,,,म्हणून  त्या माऊलीची तीच्या हयातितच सेवा करा आणि आईला कधी दुःख देऊ नका.

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो...पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो....

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले ...आणि रात्र तिने चोरून नेली

आपण टाईमपास नाही करतय...
आपण सिरीयेसली  प्रेम करतो तुझ्यावर ...!

आपल्या बहिणीवर पण . .
तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम . .
इतरांच्या बहिणीवर करता.

आपण फक्त क्रुष्णा च्या पाऊलावर पाऊल टाकत रहायच
राधा काय घरचे पण आणून देतात आपण फक्त गोपिया पटवत
रहायच...!!!

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातंजुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊनकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघारघेऊ नकोस..

चांगले मित्र आणि औषधे ही
आपल्या आयुष्यातील वेदना
दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की, औषधांना
एक्स्पायरी डेट असते,
पण मैत्रीला नाही...

मनाला जिंकायचे असते,
         "भावनेने"
  रागाला जिंकायचे असते,
            "प्रेमाने"
अपमानाला जिंकायचे असते,
     "आत्मविश्वासाने "
अपयशाला जिंकायचे असते,
             "धीराने"
संकटाला जिंकायचे अ सते,
              "धैर्याने"
माणसाला जिंकायचे असते,                                                            "माणुसकीने"    

  Marathi Status -

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि "आपण" कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि "आपले" कोण आहेत.......

  Marathi Status -

"आयुष्य छान आहे"..."थोडे लहान आहे "...परंतु
लढण्यात शान आहे...!!

  Marathi Status -

आख्या महाराष्ट्रात असे गाव नाही, जिथे आपल्या छत्रपतींचे नाव नाही.....

  Marathi Status -

जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत ........

  Marathi Status -

चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात......

  Marathi Status -

जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्यांच्या इतके प्रेम कोणी देत नाही.....

  Marathi Status -

वेळ बदलते, आयुष्य पुढे सरकल्यावर.....आयुष्य बदलते, प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर.....पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर.......

  Marathi Status -

"चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".....

  Marathi Status -

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते......

   Marathi Status -

५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईलने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल, तर "नेहमी स्माईल दिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल ".......

Marathi Status -

जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती, यातील वेलांटीचा फरक म्हणजे माणसाचे जीवन....

  Marathi Status -

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.......

  Marathi Status -

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं...

  Marathi Status -

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली, यावरुन तुमची श्रीमंती कळते.....

  Marathi Status -

विचार चांगले आहेत तुझे फ़क्त, वास्तवात उतरु दे.... जास्तीची अपेक्षा नाही मला, निदान थोड़े तरी दिसू दे......

  Marathi Status -

माझ्यातले ''मराठी'' पण जोपासण्याची मला गरज नाही.. ते माझ्या ''रक्तात'' भिनलय......
    जय महाराष्ट्र !

गणपतीपुळेच्या समुद्र किनारयावरून विशाल व यश हे  जिवलग मित्र फिरत होते, बोलता बोलता त्यांच्या मध्ये छोट्याश्या गोष्टीवरून वाद झाला, व विशालने यशच्या कानाखाली मारली, त्यावेळी यश काहीच बोलला नाही व त्याने खालील वाळू वर लिहिले कि,
.
"आज माझ्या जवळच्या मित्राने मला कानाखाली मारली "
.
थोड्यावेळाने ते दोघे समुद्रात स्नान करायचे ठरवतात, स्नान करताना यशचा तोल जातो व तो समुद्रामध्ये बुडायला लागतो...

त्यावेळी विशाल त्याला वाचवितो, बाहेर आल्यावर यश एका दगडावर लिहितो कि,
.
"आज माझ्या जवळच्या मित्राने माझे प्राण वाचविले."
.
ते वाचून विशाल म्हणतो :- "जेव्हा मी तुला मारलं, दुखविले तेव्हा तू वाळू वर लिहिलेस व जेव्हा मी तुला वाचविले तेव्हा तू दगडावर लिहिलेस ..
असे का ?"
.
यश म्हणतो :- " जेव्हा कोणी आपल्याला दुखवितो, आपण ती गोष्ट वाळूवर लिहायला पाहीजे, जेणे करून माफीचा वारा व दोस्तीची शीतल लाट येऊन लगेच ते पुसून टाकेल..
.
पण जेव्हा कोणी आपल्याला सुखवितो, वाचवितो तेव्हा आपण ती गोष्ट दगडावर कोरायला पाहीजे,
.
जेणे करून सोसाट्याचा वारा किंवा कोणतीच लाट ते कधीच पुसू शकणार नाही "
.
.
मैत्री, नाते ही अशीच असतात किरकोळ कारणांसाठी कधीच तोडू नका.

आयुष्यातले नऊ सत्य

सत्य.  नंबर.१)
© आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ
आईच करु शकते.

सत्य नंबर. 2) ...
© माणसं त्यांच्या गरजेनुसार जवळ येतात आणि
सोयीनुसार दुर जातात... .

सत्य नंबर  ३)
© इथे फक्त पैशाला
किंमत आहे माणसांना नाही .

सत्य. नंबर ४(.
©कीतीही चांगला मित्र
किँवा मैत्रिण असले
तरीही एकाच दुस-यापेक्षा
चांगल झाल की थोडीफार
तरी असुया निर्माण होतेच.

सत्य. नंबर ५)
©सुंदर चारित्रापेक्षा
सुंदर चेह-याला
जास्त मान आहे..

सत्य नंबर ६)
©प्रत्येकालाच आपल दु:ख
दुस-यांपेक्षा मोठ वाटत
किँबहुना आपण दुस-यां पेक्षा जास्त सोसलय असं भासवत असतात..

सत्य नंबर ७)
©ज्या व्यक्तीच्या आपण
सर्वाँत जास्त जवळ असतो,
काळजी करतो तीच व्यक्ती जीवनात जास्त दुःख देते.

सत्य नंबर ८)
©कुणी कुणासाठी मरत नसतं किंवा कुणाच्या विरहाने
मरत नसत.. आयुष्य हे पुढे जातच असत.

सत्य नंबर ९)
©सोय बघून केला जातो
तो व्यवहार आणि गैरसोय बघुनही केल जात ते म्हणजे प्रेम. . .

बहीण - एक अनोखं नातं

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं...