Showing posts with label Chinese Recipes in Marathi. Show all posts
Showing posts with label Chinese Recipes in Marathi. Show all posts

स्वीट अंड सोर वेजी आणि कोलंबी -Sweet and sour Veggie with Prawn

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
१ कप उभा चिरलेला कांदा
१/४ कप गाजराचे २" लांबीचे तुकडे
१/२ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ कांद्याची पातीचे देठ
१/२ कप कांद्याची पात बारीक चिरून
९-१० (साफ केलेली) कोलंबी
३-४ लसूण पाकळ्या
२" आल्याचे उभे तुकडे
१ चिमुट अजिनोमोटो
१ टेबलस्पून शेजवान सॉस
३ टेबलस्पून टोमॅटो केचप
१ टेबलस्पून सोया सॉस
१ १/२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर

मीठ आणि साखर चवीप्रमाणे
१/४ कप तेल

कृती:
१.१/४ कप पाण्यात १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, १ टीस्पून शेजवान सॉस, १/४ टीस्पून मीठ घालून गुठळ्या होऊ न देता मिक्स करा. त्यात कोलंबी बुडवून तेलावर शालो फ्राय करून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. नंतर आल्याचे तुकडे आणि लसूण ठेचून घाला. मग लगेचच भोपळी मिरची आणि गाजर घालून परता.
३. १ टीस्पून शेजवान सॉस,३ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टेबलस्पून सोया सॉस ,अजिनोमोटो आणि भाज्यांपुरतेच मीठ घाला. भाज्या नीट परतून झाकण ठेवून अर्धवट शिजवा. कांद्याच्या पातीचे देठ आणि फ्राय केलेली कोलंबी घालून परता.
४. सॉस साठी एका छोट्या भांड्यात १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, १ टीस्पून शेजवान सॉस,१ टीस्पून साखर, १/४ टीस्पून मीठ घालून १ १/२ कप पाणी घाला आणि गुठळ्या होऊ न देता नीट मिक्स करा. आणि उकळायला ठेवा. एकीकडे सतत ढवळत राहा. उकळी आल्यावर सॉस जाडसर होईल. मग लगेच परतलेल्या भाज्यांवर वरून ओता आणि मिक्स करा.शेवटी वरून कांद्याची पात घालून फ्राईड राइस बरोबर सर्व्ह करा.
_______________________________________________________________________________


Servings : 4 Persons



Ingredients:
1 cup julienned onion
¼ cup julienned carrots
½ cup julienned capsicum
6-7 spring onions ( 2" in length)
½ cup spiring onion, chopped
9-10 prawns/ shrimps (cleaned)
3-4 garlic cloves
2" ginger piece, julienned
1 pinch ajinomoto (MSG)
1 tbspn schezwan sauce
3 tbspn tomato ketchup
1 ½ tbspn cornflour/ cornstarch
Salt and sugar as per taste
¼ cup oil

Method:
1. Mix cornflour in ¼ cup of water. Addd 1 tspn schezwan sauce and ¼ tspn salt. Avoid lumps and mix well. Dip prawns in that and shallow fry till golden brown.
2. Heat oil in a saucepan and add onion. Stir onion for 2 minutes and add ginger and chopped garlic. Next add capsicum and carrots. Stir for a minute.
3. Add 1 tspn schezwan sauce, 3 tbspn tomato ketchup,1 tbspn soya sauce, ajinomoto and salt. Stir well and cook vegetables till half done. Add spring onion (2” pieces) and prawns.
4. For making sauce, in a bowl take 1 tbspn cornflour, 2 tbspn tomato ketchup, 1 tspn schezwan sauce, 1 tspn sugar, 1/4 tspn salt and 1 ½ cup of water. Mix well and avoid lumps.
5.Boil the mixture till it Becomes thick and then pour on stirred vegetables. Mix well. Garnish with chopped spring onion and serve with fried rice.


Tip: To make this dish vegetarian you can use tofu or paneer instead of prawns

व्हेजिटेबल फ्राईड राइस-Veg .Fried Rice

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी


साहित्य :
१ १/२ कप बासमती तांदूळ
१ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेले गाजर
१/४ कप बारीक चिरलेली फरजबी
१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ टीस्पून मिरपूड
१ चिमुट अजिनोमोटो
१ टेबलस्पून सोया सॉस
१ टीस्पून विनेगर
मीठ चवीप्रमाणे
१/४ कप तेल


कृती:
१. बासमती तांदूळ धुवून घ्या. पातेल्यात तेल गरम करून त्यात तांदूळ परतून घ्या. ३-४ मिनिटे तांदूळ चांगले परत.तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट पाणी घाला. आणि मीठ घालून ढवळा.पाण्याला उकळी आली कि झाकण ठेवून भात शिजवून घ्या. तयार भात झाकण काढून गार करत ठेवा. काटा चमच्याने भात वर- खाली हलवून घ्या म्हणजे शीत मोडणार नाहीत.
२.छोट्या पातेल्यात तेल गरम करून कांदा फोडणीला घाला. १-२ मिनिटे कांदा परतून झाला कि गाजर आणि फरजबी घालून परता. सोया सॉस, विनेगर, अजिनोमोटो आणि मीठ घालून परता. भाज्या अर्धवट शिजवा. पूर्ण शिजू देऊ नका.
३. गार झालेल्या भातात हि भाजी थोडी थोडी घालून अलगद मिक्स करा.मिरपूड आणि सर्वात शेवटी कांद्याची पात घालून पुन्हा मिक्स करा आणि मंद आचेवर १ वाफ काढा आणि आवडत्या चायनीज ग्रेवी बरोबरसर्व्ह करा.
________________________________________________________________________________


Servings : 2 to 3 Persons



Ingredients:
1 ½ cup basmati rice
1 cup finely chopped onion
¼ cup finely chopped carrots
¼ cup finely chopped green beans
¼ cup finely chopped spring onion
¼ tspn black pepper
1 pinch MSG
1 tbspn soya sauce
1 tspn vinegar
salt to taste
¼ cup oil

Method:
1. Wash and soak rice. Heat 2 tbspn oil in a cookware. Add soaked rice and stir till rice grains separate. Then add hot water exactly double the amount of rice. ( here 2 cups). Add salt and close the cookware with tight lid. Let the rice cook completely. Remove the lid and let the rice become completely cool. Fluff rice with a fork to get fluffy rice with separate grains.
2. Heat oil n a small saucepan. Add chopped onion. Stir for 2 minutes then add chopped carrots and chopped green beans. Add soya sauce, vinegar, MSG and salt. Cook vegetables till half done.
3. Add spoon by spoon stirred vegetables to the rice and mix gently. Sprinkle some pepper and mix well. Steam cook fried rice on low heat for 5 minutes. And serve hot with any Chinese gravy.

पनीर चिली -Paneer chilli Dry

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी









साहित्य:
२०० ग्रॅम ताजे पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
१ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ लसूण पाकळ्या चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून मिरपूड
१/४ कप डार्क सोया सोस
३ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
मीठ चवीप्रमाणे
१ चिमुट अजिनोमोटो
तेल

कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
३. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
४. पनीरचे तुकडे घालून परता.
५. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी, ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण एकजीव करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेचServe करा.


________________________________________________________________________________


Servings: 4 persons


Ingredients:
200 gram fresh paneer
1 cup sliced onion
1 cup sliced capsicum (green pepper)
6-7 garlic cloves
2 green chilies slice lengthways in half and remove the seeds.
1 tspn vinegar
¼ tspn black pepper
¼ cup dark Soya sauce
3 tbspn corn flour/ corn starch
Salt to taste
1 pinch MSG (ajinomoto)
Oil


Method:
1. Cut paneer into 1”x1” small cubes. In a bowl take 2 tbspn of cornflour. Add 2 pinch of salt and ¼ cup of water. Mix well to make a thick batter. Dip paneer cubes in it and shallow fry them on medium heat till golden brown.
2. Heat oil in a wok (kadhai) and sauté chopped garlic for a minute. Add onion, chillies and capsicum. Stir till half cooked.
3. Add 2 tbspn of soya sauce, MSG, salt black pepper and vinegar. Stir for a minute.
4. Add paneer cubes and stir gently for few seconds.

5. For making sauce- Add ½ cup of water to remaining corn flour. Add 4-5 tbspn soya sauce,2 pinch of salt and mix well. Bring it to boil. Stir continuously till sauce gets thick and nice dark brown in colour.
6. Pour sauce over paneer. Garnish it with chopped spring onion and then serve hot.

हाका नुडल्स - Hakka Noodles

Servings : 4 Persons











साहित्य:

१ पाकीट चायनीज हाका नुडल्स

१/४ कप उभा चिरलेला कोबी

१ कप उभा चिरलेला कांदा

१/२ कप उभी चिरलेली भोपळी मिरची

१/४ कप गाजराच्या मध्यम फोडी

३ पातीचे कांदे

कांद्याची पात चिरून

२ सुक्या लाल मिरच्या

१/४ टीस्पून मिरपूड

२ टेबलस्पून सोया सॉस

१ टीस्पून विनेगर
३ टेबलस्पून तेल

मीठ चवीप्रमाणे



कृती:

१. नुडल्स बुडतील इतक्या पाण्यात घालून गॅस वर उकळत ठेवा. पाण्यात १ टीस्पून तेल आणि १/४ टीस्पून मीठ घाला.

२. नुडल्स शिजल्या कि चाळणीत घालून ठेवा म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. नुडल्स जास्ती वेळ शिजवू नका.

३. कढईत तेल गरम करा आणि सुक्या मिरच्या दोन तुकडे करून घाला. लगेचच कांदा घालून परता.

४. लगेचच गाजर, भोपळी मिरची आणि पातीचा कांदा मधोमध चिरून घाला. मीठ,सोया सॉस,विनेगर आणि मिरपूड घालून परता.

५. भाज्या अर्धवट शिजेपर्यंत परता आणि लगेच उकडलेल्या नुडल्स घालून परता. नुडल्स परतताना एकावेळेला दोन डाव वापरा म्हणजे नुडल्स नीट मिक्स होतील.

झाकण ठेवून १ वाफ आणा आणि वरून कांद्याची पात घालून लगेच serve करा.

व्हेज मंचुरियन-Veg Manchurian

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
मंचुरियन बॉल्ससाठी-
१ गाजर किसून
४-५ कोवळी फरजबी बारीक चिरून
१/४ कप बारीक चिरलेला फ्लॉवर
१/४ कप बारीक चिरलेला कोबी
१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१ टीस्पून किसलेलं आलं
१/४ टीस्पून मिरपूड
१ टेबलस्पून सोया सॉस
१ चिमुट अजिनोमोटो
१ टीस्पून चिली सॉस
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून साखर
१/२ कप साधा भात
४ ते ५ टेबलस्पून मैदा
मीठ चवीप्रमाणे
तळ्ण्यासाठी तेल
मंचुरियन सॉस साठी-
२ कप व्हेजिटेबल स्टॉक
१/४ कप डार्क सोया सॉस
१ हिरवी मिरची
१ टीस्पून बारीक चिरलेलं आलं
१ टीस्पून बारीक चिरलेली लसूण
१ चिमुट अजिनोमोटो
१ टीस्पून साखर
२ टीस्पून विनेगर
२ टीस्पून चिली सॉस
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ कप बारीक चिरलेला कोबी
१ १/२ टेबलस्पून कॉर्नफलोर
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे


कृती:
१. मंचुरियन बॉल्ससाठी दिलेल्या सगळ्या भाज्या एका पातेल्यात घ्या. पातेल्यात १ १/२ कप पाणी आणि १/४ टीस्पून मीठ घाला आणि झाकण ठेवून भाज्या वाफवून घ्या.
२. दुस-या पातेल्यावर एक कॉटनचे पात्तळ (सुती) कापड घाला आणि कापडावर वाफवलेल्या भाज्या पाण्यासकट ओता. कापड चारही बाजूंनी धरून भाज्या घट्ट पिळून घ्या. खाली गळलेलं पाणी (व्हेजिटेबल स्टॉक) मंचुरियन सॉस बनवण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
३. घट्ट पिळून घेतलेल्या भाज्यांमध्ये किसलेलं आलं, मिरपूड,विनेगर, चिलीसॉस, सोया सॉस, अजिनोमोटो, साखर, मीठ, विनेगर, साधा भात आणि मैदा घाला. मिश्रण हाताने छान कालवून घ्या. मिश्रणाचे १ १/२" चे बॉल्स करून घ्या. गरज वाटल्यास आणखीन थोडा भात आणि अजून थोडासा मैदा घाला.
४. कढईत तेल गरम करा आणि मंचुरियन बॉल्स ब्राऊन रंगावर तळून घ्या. मगाशी बाजूला ठेवलेल्या व्हेजिटेबल स्टॉक मध्ये १ १/२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर घालून गुठळ्या होऊ न देता ढवळून घ्या.
५. आता पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा. तेल तापले कि त्यात बारीक चिरलेलं आलं,बारीक चिरलेली लसूण घालून परता. लगेचच कांदा घालून परता.
६. नंतर हिरवी मिरची, भोपळी मिरची,कोबी घालून परता. विनेगर,सोयासॉस, चिली सॉस, साखर आणि अजिनोमोटो घालून परता. बारीक चिरलेली कांद्याची पात घाला.
७. व्हेजिटेबल स्टॉक आणि कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून ढवळा. मिश्रणाला उकळी येईल तसा मंचुरियन सॉस जाड व्हायला लागेल. सॉस सेमी ट्रान्सपरंट झाला याचा अर्थ सॉस तयार झाला. चव बघून मीठ घाला.त्यात मंचुरियन बॉल्स घालून व्हेज मंचुरियन राइस किंवा नुडलस बरोबर सर्व्ह करा.

टीप: मंचुरियन बॉल्स घातल्यावर मंचुरियन ग्रेविमध्ये बॉल्स १/२-१ तास मुरु द्यावे. म्हणजे खाताना जास्ती मजा येईल.
ड्राय मंचुरियन करायचे असेल तर व्हेजिटेबल स्टॉक आणि कॉर्न फ्लोर घालायच्या आधीच्या स्टेप पर्यंत (no . ६) सॉस बनवून त्यात बॉल्स मिक्स करा.

_________________________________________________________________________________


Veg. Manchow Soup

सर्व्हिंग: २ माणसांसाठी

साहित्य:
३ कप व्हेजिटेबल स्टॉक
३/४ कप बारीक चिरलेली कांद्याची पात
१/४ कप बारीक चिरलेलं गाजर
१/२ कप पात्तळ उभा चिरलेला कोबी
१ १/२ टेबलस्पून सोया सॉस (मी चिंग्झ सिक्रेटचा वापरते)
२ टीस्पून टोमॅटो केचप
१ टीस्पून चिली सॉस
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून अजिनोमोटो (MSG )
१/२" आलं, बारीक चिरून
३-४ मध्यम लसणीच्या पाकळ्या,बारीक चिरून
१ हिरवी मिरची,बारीक चिरून
१/२ टीस्पून मिरपूड
१ १/२ टेबलस्पून कॉर्न फ्लोर
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२५ गरम नुडल्स आणि त्या तळण्यासाठी तेल

कृती:
१. नुडल्स पाण्यात घालून शिजे पर्यंत उकळत ठेवा. नंतर उकडून घेतलेल्या नुडल्स गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यंत तळून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा.त्यात बारीक चिरलेला आलं-लसूण आणि हिरवी मिरची घालून मोठ्या आचेवर मिनिटभर परता. बारीक चिरलेली कांद्याची पात घालून २ मिनिटे परता.
३. १/२ टेबलस्पून सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, मिरपूड,विनेगर,साखर आणि मीठ घालून मोठ्या आचेवर परता.
४. लगेचच बारीक चिरलेला गाजर ,कोबी आणि अजिनोमोटो घालून परता.
५. कॉर्न फ्लोर आणि १ टेबलस्पून सोया सॉस व्हेजिटेबल स्टॉक मध्ये गुठळ्या होऊ न देता मिक्स करा.
६. हे सगळे मिश्रण परतलेल्या भाज्यांमध्ये घाला. मीठ घालून सूप जाडसर होई पर्यंत उकळा.
७. वरून तळलेल्या नुडल्स आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून सजवा आणि गरम गरम सर्व्ह करा.

________________________________________________________________________________SServings: 2 Persons


Ingredients:
3 cups vegetable stock
3/4 cup finely chopped spring onion
1/4 cup finely chopped carrots
1/2 cup shredded cabbage
1 1/2 tbspn dark soya sauce (I use ching's secret )
2 tspn tomato ketchup
1 tspn chilly sauce
1 tspn vinegar
1/4 tspn ajinomoto (MSG)
1/2" ginger, minced
3-4 medium garlic cloves,minced
1 green chilly,finely chopped
1/2 tspn black pepper
1 1/2 tbspn corn flour
2 tbspn oil
1 tspn sugar
salt to taste
25 grams noodles and oil for deep frying

Method:
1. Boil noodles in the water till cooked. Drain water and deep fry boiled noodles till golden brown.
2. Heat oil in a cookware. Add minced ginger-garlic and chopped green chilly. Sauté for a minute then add chopped spring onion. Stir for 2 minutes.
3. Add 1/2 tbspn of soya sauce,chilly sauce and tomato ketchup. Add black pepper,vinegar sugar and some salt. Stir on high flame/heat.
4. Add chopped carrots and shredded cabbage. Stir for a minute on high flame/heat. Add MSG and stir.
5. Mix corn flour and 1 tbspn of soya sauce with vegetable stock. Avoid flour lumps and add to the vegetables. Add salt and bring it to boil.
6. Boil soup till it becomes thick.
7. Garnish soup with fried noodles and chopped spring onion and serve hot.

Chilly sauce

सर्व्हिंग: १/२ कप
साहित्य:
५-६ लाल सुक्या मिरच्या
१ टोमॅटो
५-६ लसूण पाकळ्या बारीक चिरून
१ टीस्पून साखर
१/२ टीस्पून मीठ
३ टेबलस्पून विनेगर
२ कप पाणी

कृती:
१. १ कप पाण्यात सुक्या मिरच्या घालून पाणी चांगले उकळत ठेवा.
२. पाणी आटून अर्ध झालं कि त्यात लसूण आणि टोमॅटो बारीक चिरून घाला.
३. २-३ मिनिटे उकळल्यावर टोमॅटो शिजला कि गॅस बंद करा. त्यात मीठ साखर आणि विनेगर घाला.
४. हे सगळं मिश्रण मिक्सरवर वाटून पेस्ट करून घ्या.
५. हा चिली सॉस तुम्ही चायनीज ग्रेविमध्ये वापरू शकता. हा सॉस काचेच्या बाटलीत भरून ठेवला तर फ्रीज मध्ये १ महिना पर्यंत टिकतो.
________________________________________________________________________________


Servings: 1/2 cup

Ingredients:
5-6 dry chilies
1 tomato
5-6 garlic cloves,minced
1 tspn sugar
1/2 tspn salt
3 tbspn vinegar
2 cups water


Method:
1. Boil dry chilies in water till water reduces to half.
2. Add minced garlic and finely chopped tomato.
3. Boil for 2-3 minutes or till tomato cooked completely.Turn off the heat. Add sugar and vinegar and mix well. Let it cool down completely.
4. Grind everything to make a fine paste.
5. Use this sauce in Chinese preparations.
You can store this sauce in refrigerator for 1 month.