🇮🇳🇮 🇳 🇩 🇮 🇦 🇮🇳
                 🇻🇸
🇵🇰 🇵 🇦 🇰 🇮 🇸 🇹 🇦 🇳 🇵🇰

*पाकिस्तान भारतासोबत युद्धाची भाषा करतोय काय लायकी आहे पाकिस्तानची..*

💠 तुलनात्मक दृष्ट्या भारतासमोर काय लायकीचा आहे पाकिस्तान..
वाचा....

👉 *लढाऊ जहाज-🇮🇳 184 > 🇵🇰74*

👉 *सैनिक-🇮🇳47 लाख > 🇵🇰14 लाख*

👉 *बँटल टँक-🇮🇳6000 > 🇵🇰 4000*

👉 *सब मरिन-🇮🇳13 > 🇵🇰8*

👉 *सैन्य बजेट- 🇮🇳43 अरब डॉलर >*
*🇵🇰 8 अरब डॉलर*

👉 *एअर क्राफ्ट कँरीयर- 🇮🇳2 > 🇵🇰0*

👉 *लढाऊ विमान- 🇮🇳 1000 पेक्षा जास्त >*
🇵🇰 *आसपास 500 पर्यंत ..*

👉 *अणुबॉम्ब -🇮🇳 3 > 🇵🇰 1*

सर्व बाबतीत भारत स्वयंपुर्ण आहे

🇮🇳 *भारताचा* *अन्नधान्य निर्यात दर 88.7%* *आहे..*
तर
🇵🇰 *पाकिस्तान 24.3%*  *आहे.*

🇮🇳 *भारताकडे 43.5% जमिन सुपिक आहे,*
  तर
🇵🇰 *पाकिस्तानकडे 11.8% आहे.*

🇮🇳 *भारत पुढची 4 वर्ष वापरु शकेल एवढा धान्यसाठा आहे*,
तर
🇵🇰 *पाकिस्तान फक्त 1.5 वापरेल एवढा धान्यसाठा जवळ ठेवतो.*

🇮🇳  *1 $ डॉलरचे भारताला ₹ 66 रुपये*
तर,
🇵🇰  *पाकिस्तानला 104 रुपये प्रति 1 डॉलरचे मोजावे लागतात.*

म्हणजे यातही भिकारी... 😂😂😂

-----------×----------

⚜ *शिक्षण दर*
🇮🇳  _73.8%_
🇵🇰 _40.5%_

⚜ *विकास दर*
🇮🇳 _72.5%_
🇵🇰  _33.9%_

-----------×----------

*पाकिस्तान सोबत*
*_1965, 1971_ आणि  _1999_*
*चा कारगिल युद्ध, हे तिन्हीही युद्ध भारताने जिंकलेत....*
💯💯💯

-----------×-----------

आणि🙏🏿🙏🏿...

जोक म्हणजे
👇🏻 😆

  👉 *🇵🇰 पाकिस्तान*
🏆 क्रिकेट वर्ल्डकप 🏏 मध्ये
*🇮🇳 भारतासोबत*
👉 एकही मँच जिंकु शकला नाही.

😂😂😂😅😅😂😂😂

रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेच्या सर्वे मध्ये देशात प्रथम .......

" आपले कोकण अनेक विषयात देशात आणि जगात पहिले आहे " .
*  येथील माणसांची जीवन पद्धती
* निसर्ग आणि मानवी जीवनाचा समतोल
*  नैसर्गिकपणे पर्यावरणा विषयक आवड
     *  शून्य हुन्डा बळी
     *  शून्य  भिकारी
     * शून्य स्त्री भ्रूण हत्या
* शून्य कर्जबाजारीपणा
* शून्य शेतकरी आत्महत्या
* शून्य सरकारी निधी व कर्ज डुबवणे
* गेली 5 वर्षे सतत ssc/hsc बोर्ड महाराष्टात प्रथम .
        
गावात राहाणाऱ्या व देशात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करणाऱ्या रत्नागिरी वासियांचा सर्वाना अभिमान आहे .....

माणूस देवा कडून लाखो-करोडो रूपये मिळावे अशी अपेक्षा करत असतो
परंतु...
जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्टे पैसे शोधत बसतो....

मुलगा : चाहूंगा मॆ तुझे सांज सबेरे...

मुलगी : आणि दुपारचे काय?

मुलगा : १ ते ४ विश्रांती. मी पुण्याचा आहे.
😝😝😝

बायको:- आहो मी काय काय
सांभाळू ;
मुलं सांभाळू,
का तुम्हाला सांभाळू
का तुमच्या आई, वडीलांना सांभाळू
का घर सांभाळू...?


नवरा:-(आरामात) तू फक्त
स्वता:ची जीभ सांभाळ
सर्व ठीक होईल..😜😝😂

👨माणुस - देवा मुली इतक्या
सुंदर आणि गोड असतात
मग
बायका एवढ्या तिखट
आणि कडु का असतात
👼देव - कारण मुली मी बनवतो
आणि त्यांना बायका तुम्ही
बनवता
तो तुमचा 👉Problem आहे. तुम्हीच बघा
😄😜😄😜😄😜😄 🔫चुकीला माफी नाही🔫

रात्री ,भुताची  मालिका बघून झाल्यावरचा संवाद :

बायको : अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटतेय,

नवरा : हां, म्हणजे मी भीतीनं मेलो तरी चालेल.😜😜😜😜

ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो ,
सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात ....
पण त्या सुटणाऱ्या असतात , या उलट जो दुसाऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही ,,,,,,
" किती वेळा मागितलं तरी
सुख उसनं मिळत नाही "
" एखाद्या जागी बसून कधीच
ध्येयाचं शिखर गाठता येत नाही "
" आपल्या देवावर नेहमी
नि:संकोच विश्वास ठेवा "
" योग्य वेळी तो इतकं देतो की
मागायला काहीच उरत नाही
💐💐💐💐
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*"

मनसे /राष्ट्रवादी / कॉँग्रेस /भा ज पा / शिवसेना पक्षात गेलेल्या

तरुण बिनडोक तरुणांनो

राज ठाकरे बोलला लगेच गेला टोलनाका अड्वायला

उद्धव ठाकरे बोलला चालला मराठी म्हणून बस फोडायला

शरद पवार बोलले लागला पुरंदरेला शिव्या द्यायला

बी जे पी वाला बोलला चालला गो माता गो माता करायला

राहुल गांधी बोलला लागला  रस्त्यांवर पळायला

ह्यांची मुले स्टडी रूममध्ये
तुम्ही कस्टडी रूममध्ये

ह्यांची मुले अमेरीका युरोपात
तु दहीहंडीच्या कळपात

ह्यांची मुले उच्चपदस्थ
तू एका क्वॉर्टर एवढा स्वस्त

त्यांची मुले इंजिनियर
तू पितो किंगफिशर बीअर

त्यांच्या मुलांना पाचआकडी पगार
तु हंगामी बेरोजगार

नको पवार नको ठाकरे नको मोदी नको सोनिया

तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.
जगा फक्त तुमच्या आई-बापा साठी, समाजासाठी, आणि स्वत: साठी.

👌👌👌तरूणांना तसेच प्रत्येक व्यक्तीलाच विचार करायला लावणारी post आहे👏🏻👏🏻💐

🎾🎾✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼🎄🍁🎄🍁

समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
   ☄Be Positive☄,,,💐💐💐
          दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....
कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."🍃🍂🍃🍂

🍎🌻शुभ सकाळ🌻🍎

माझी  नोकरी  म्हणजे .......

माझी  नोकरी  म्हणजे याहूनही खूप काही आहे ,
ती माझा मोकळा श्वास आहे ,
समदुःखी मैत्रीणीँचा सहवास आहे ,
जीवनविषयक  अभ्यास आहे ,
तो माझा  आत्मविश्वास आहे ,
मनमोकळ्या हास्याचा तास आहे ,
अनुभवाचे आकाश आहे ,
चार  भिंतीबाहेर पडण्याचा पास आहे ,
तिथ काम असूनही विश्रांतीचा भास आहे ,
घरगुती ताणतणावातून सुटकेचा निश्वास आहे ,
कर्तुत्व सिद्ध करायचा ध्यास आहे ,
म्हणून जाण्यायेण्याचा त्रास आहे तरी मला नोकरीची आस आहे .

(नोकरी करणाऱ्या व करत होत्या त्या माझ्या प्रत्येक
मैत्रिणीसाठी )

आई म्हणायची 'श्री' लिहावे
नव्या पानावरती,
वापरावी नवी वस्तू,
कुंकू लावल्या वरती.

आई म्हणायची संध्याकाळची,
झोपी जातात झाडे,
अजून फुलं तोडायला हात
होत नाहीत पुढे.

आई म्हणायची मिळतेच यश,
तुम्ही करत रहा काम,
भीती वाटली कि फक्त म्हणावे,
राम,राम,राम.

आई म्हणायची काहीही असो,
होतो सत्याचाच जय,
अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय.

आई म्हणायची ठेवा श्रद्धा
आपल्या प्रयत्नात,
चुकूनही दाखवू नका
ज्योतिष्याला हात.

आई म्हणायची निर्मळ मन तर
राहतो चेहरा साफ,
उपयोग नाही लाऊन काकडी
अन घेऊन सारखी वाफ.

आई म्हणायची राष्ट्रध्वजाचा
राखावा नेहमी मान,
जन गण मन म्हणतांना असावी
ताठ आपली मान.

आई म्हणायची अन्नावर कधी
काढू नये राग, कोणाला लागली लाथ तर, लावायची
पाया पडायला भाग.

दूध ऊतू गेल्यावर चुकचुकू नये
म्हणावं 'कृष्णार्पण अस्तु',
वाईट शब्द आणू नयेओठांवर,
वास्तू म्हणत असते तथास्तु.

आई म्हणायची पहाटेची
स्वप्न होतात खरी,
आई म्हणायची दिवा लावा,
सांजेला लक्ष्मी येते घरी.

आई म्हणायची खाऊन माजावं
पण टाकू नये ताटात,
अजूनही मी संपवतो सगळं,
जरी असलं सगळं माझ्या हातात!

आई म्हणायची येतेच झोप
जर मनात नसेल पाप,
जड होतात पापण्या अन
मिटतात डोळे आपोआप.

अजूनही वाटतं बसलाय देव
घेऊन पाप पुण्याचा घडा,
आई सांगते तसं लक्ष ठेऊन
टाकतोय त्यात खडा.

जेव्हा जेव्हा व्हायची भांडणं
आम्हा भावंडात,
आई म्हणायची अरे एक तीळ
वाटून खायचे सात.

मरण यातना सोसत
आई जन्म देत असते
आपलं हसू पहात पहात
वेदना विसरून हसत असते.

बाबा मात्र हसत हसत
दिवस रात्र झटत असतो
शिस्त लावत आपल्यामधला
हिरवा अंकुर जपत असतो.

त्याला कसलंच भान नसतं
फक्त कष्ट करत असतो
चिमटा घेत पोटाला
बँकेत पैसा भरत असतो.

तुमचा शब्द तो कधी
खाली पडू देत नाही
तुमची हौस भागवताना
पैशाकडेही पहात नाही.

तुम्ही म्हणजे त्याची स्वप्नं
तुम्ही म्हणजे त्याचा आभाळ
तुमच्यासाठी गिळत असतो
नामुष्कीची अवघी लाळ.

तुम्ही जेव्हा मान टाकता
तेव्हा बाबा खचत असतो
आधार देता तरी
मान मारून हसत असतो.

तुमच्याकडूनं तसं त्याला
खरंच काही नको असतं
तुमचे यश पाहून त्याचं
अवघं पोट भरत असतं.

त्याच्या वेदना कुणालाही
कधीसुद्धा दिसत नाही
जग म्हणत, “ आई एवढं
बाबा कधी सोसत नाही.”

त्याच्या वेदना आपल्याला
तशा कधीच कळणार नाहीत
आज त्या मागितल्या तर
मुळी सुद्धा मिळणार नाहीत.

एक दिवस तुम्हीसुद्धा
कधीतरी बाबा व्हाल,
त्या बाळाच्या डोळ्यात तुमच्या
स्वप्नांचं आभाळ पहाल

तेव्हा म्हणाल, “ आपला बाबा
खरंच कधी चुकत नव्हता
आपल्यासाठीच आयुष्यभर
रक्तसुद्धा ओकत होता.”

तेव्हा सांगतो मित्रांनो
फक्त फक्त एक करा
थरथरणारा हात त्यांचा
तुमच्या हातात घट्ट धरा.

आपल्या आई-वडिलांवर
खरोखर प्रेम करा..

👪  आजच्या जागतिक कुटुंब दिवसाला सुंदर सलामी 💐💐🌹🌹🙏🙏

*✍🏻सुंदर विचार✍🏻*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*माणूस तेंव्हा मोठा नसतो जेंव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो...*
*मोठा तर तो तेंव्हा होतो जेंव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो...*
🍂🍁🍃🍂🍁🍃🍂🍁🍃
*😊शुभ सकाल😊*

तू अनोळखी, तरी ओळखीची..
असुनी दूर, का जवळची....

पाहिले न तुजला कधी
माझी परी तू सावली..
शोधितो मीच मजला
का देहात अशी सामावाली..

बोलणे लटके तुझे
का, कसे हटके असे
मोकळा होवुनी गुंततो मी
का, मन झाले वेडेपिसे...

सांग ना ग कोण तू
बहरले का ऋतू
गंध तू कुसुमातला
का कस्तुरी सुवास तू..

डोळ्यांतली आस तू
का खुळी प्रीत तू..
अनोळखी, का ओळखीची
गूढ सखे हे खोल तू....!! —

आपल्या बापाचं काय जातं
असं म्हणणारी एक जमात आहे.
रस्त्याला पडलेला मोठा खड्डा असो
किंवा नाक्यावर चालणारा दारूचा अड्डा असो
माझ्या घराला कुंपण आहेच
आपल्या बापाचं काय जातं.
रस्त्यावर लहानगं पोरगं भिक मागतं
माझं पोरगं इंग्लीश शाळेत जातं
आपल्या बापाचं काय जातं.
मोर्चे निघतात बंद पुकारतात
जाळपोळीत सारे निरपराध मरतात
मी दारे खिडक्या लावून असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दिवसा ढवळ्या कळ्या कुस्करल्या जातात
बलात्काराच्या बातम्या रोजच झळकतात
सकाळच्या चहा सह मी वाचत असतो
माझ्या आया बहिणी सुरक्षित आहेत
याच भ्रमात मी नांदत असतो
आपल्या बापाचं काय जातय.
रोजच शेतकरी शेतात राब राब राबतो
धान्याला भाव मिळत नाही म्हणून
शिवारातल्या झाडाला लटकतो
माझ्या घरी वाण्याकडून धान्य घरपोच होतय
आपल्या बापाचं काय जातय.
शेजारीच कुणीतरी मरण भोगत असतो
माझ्या दारावरचं तोरण मी आनंदाने पहात असतो
आपल्या बापाचं काय जातय.
दहशतवादी हल्ले रोजच होतात
जवान आपले नाहक मरतात.
मी आपला श्रद्धांजली वहातो
हुतात्मा होणं फक्त त्यांचंच कर्तव्य समजतो
आपल्या बापाचं काय जातय.
आपल्याच बापाचं खूप काही गेलेलं
कळतं तेव्हा बराच उशीर झालेला असतो.  
आपल्याच घरचा वासा नकळत जळालेला असतो.

शैलेन्द्र

अनंत चतुर्थीचा दिवस होता त्या दिवशी ऑफिस असल्यामुळे सकाळपासून चीड चीड चालू होती माझी मला त्या दिवशी सुट्टी हवी होती कारण बाप्पा चालले होते.
मी विचार करत होतो  बॉस ला सांगून लवकर निघूयात पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तस झालं त्या दिवशी बॉस ने माझ्यावर एक जबाबदारी टाकली आणि माझ्या वाटेला  नाहुर ते कंजूरमार्ग अशी मला पायपीट करावी लागली. आणि त्या दिवशी नेमका पाऊस होताच सोबतीला, मनातून कोसत होतो माझ्या नशिबाला काय हा जॉब काय हि फिरफिर देवाला विचारात होतो मनातून काय हे देवा काय असा जॉब दिलास थोडाही शांती नाही जिथे कसतरी काम संपवून मी घरी आलो. तर घरी आलो तर प्रचंड भूक लागली होती आणि मनातून नशिबाला दोष देणे चालूच होते, कदाचित त्या दिवशी बाप्पा ने माझं ते बोलणं ऐकलं असावं असाच वाटत. मी भूक लागली म्हंजन जेवायला बसलो मस्त पराठे केले होते आईने भूक लागली होती म्हणून तुटून पडलो जेवणावर जेवत असताना एकदम दारावरची बेल वाजली वैतागलो जेवताना उठाव लागेल म्हणून मी उठलो दार उघडलं तर समोर एक म्हातारी व्यक्ती माझ्या बँकेचं कुरिअर घेऊन आली होती साधारण त्यांचं वय 60किंवा 65 घरातलं वाटत होत त्यांनी मला ते कुरियर दिल, आणि मला म्हटले बाळ थोडं पाणी दे त्याच्याकडे बघून वाटत होत कि ते थकलेलं आहेत मी पाणी दिल ते म्हटले बाळ चहासाठी पैसे असतील तर देऊ शकतोस का पहिलेच त्यांना बघून मला कसतरी झालं होतं हे म्हटल्यावर मला अजूनच कसतरी झालं पाकीट घेतलं आणि 50 नोट त्यांना दिली विचार होता चहाबरोबर काही खातील हि ते उतरायला लागलेत उतरताना त्यांचे पाय थरथरत होते त्यांना उतरायला हि नीट जमत नव्हतं ते बघून माझं मनही तेवढ्याच जोरात थरथर झाली . प्रचंड वाईट वाटलं एवढा वेळ मी स्वतःच्या नशिबाला किती दोष देत होतो काय माझ जीवन म्हणून पण जेव्हा ती वृद्धद व्यक्ती बघितली तर माझी बोलती बंदच झाली हे हि दिवसभर फिरले असतील वय बघावं तर माझ्यपेक्सा 30,35 वर्ष सहज मोठे असतील मग ह्या माणसाने काय तक्रार करावी कोणाकडे करावी दिवसभर फिरताना मी सामोसा पाव तवा पुलाव आणि मग संध्याकाळी ते पराठे एवढं सगळं खाऊन माझ्या नशिबाला दोष देत होतो आणि ती वृद्धद व्यक्ती फक्त चहासाठी माझ्यासमोर लाचार झाली होती ते जात असताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून काही प्रश्न पडलेत
सुखी कोण ते का मी?
नशीब कोणच चांगलं माझं का त्यांचं??
ह्या वयात हि व्यक्ती का काम करते आहे ??
आणि मग त्या दिवशी कळलं कोणीतरी म्हटलं आहे ना तुम्ही जे जीवन जगत असतात ते लाखो लोकांचं स्वप्न असत ते मनोमन पटलं. बाप्पा ने जात जात माझे डोळे उघडले
बाळ हेय जीवन आहे चढ उतार येणार फक्त जगात राहा लढत रहा बाकी मी आहे सांभाळायला त्या वृद्ध व्यक्तीच्या स्वरूपात त्या दिवशी बाप्पा च आला होता.
आता नशिबाला दोष देण्यापेझा मला काय करायचं आहे ते कळलं होतं.
पण एक कळलं सुखी तू का मी हा प्रश्न नसतो फक्त आपण कशे जगतो त्यावर सुखाची व्याख्या होत असते.
बाप्पा तुझे आभारी डोळे उघडल्याबद्दल
😊गणपती बाप्पा मोरया😊
😊मंगल मूर्ती मोरया😊

.एक मुलगी तोंडाला स्कार्प बांधुन स्कुटी ने चालली होती.
.
.
समोरुन एक माणुस बाईकने येत होता.
.
.
तो तिला म्हणाला
.
"ऐ जानेमन जरा दुपट्टा हटाके चेहरा दिखाके हमारे दिलपर
बिजली तो गिरा".
.
.
.
.
मुलगी : पप्पा मी आहे,

पप्पा गाडी तिथेच सोडुन पंढरपुरच्या वारीला गेले
😝😛😜😝😜😜😜😝

Missing my school day.....
😓😓😓👇
शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद -
.
.
.
.
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.😡
.
.
.
.
.
.
.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला😳
.
.
.
.
.
.
.
.
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??💷
.
.
.
.
.
.
.
.
4. तुमच बड़बडून झाल का सांगा 😷
.
.
.
.
.
.
.
.
.
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे आम्हीपण हसू.😆
.
.
.
.
.
.
.
.
.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.😏
.
.
.
.
.
.
.
.
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये😤
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता😠
.
.
.
.
.
.
.
.
.
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली😎
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि सगळ्यात भारी😝😝😝😝
10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂😂
Missing school days

खुप काही अपेक्षा करावी आणि सत्यात
काहीतरी वेगळंच असावं,
असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात..
कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट
जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते...
कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडीशन पेक्षा अचानक
अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन
जाते.
💐 💐...शुभ सकाळ....💐 💐

बंड्याने नंबर डायल केला. . .
फोन एका मुलीने ऊचलला

बंड्या : हॅलो कोण. .?
.
.
.
.
.

.
मुलगी : मी बानू. . .

बंड्या : आयला फोन जेजुरीला लागला
वाटतं. . .  सॉरी माते. . .

👌💐 *एक छान मेसेज* 👌💐

☝ *कमीपणा घ्यायला शिकलो*
    
      _म्हणून. .. आजवर खूप_
      _माणसं कमावली..._

      *हिच आमची श्रीमंती...!!*

☝ *नाते सांभाळायचे*
        *असेल तर*

      _चुका सांभाळून घेण्याची_
      _मानसिकता असावी ..._
      _आणि_

      *नाते टिकवावयाचे*
      *असेल तर*

      _नको तिथे चुका काढण्याची_
      _सवय नसावी ..._

☝ *ताकद आणि पैसा हे*
        _जीवनाचे फळ आहे._

     _परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम_

     *हे जीवनाचे मूळ आहे.*

☝ *तुमच्या पाठीशी*
       *किती जण आहेत*

       _हे मोजण्यापेक्षा,_

       _तुम्ही किती जणांच्या_
       _पाठीशी आहात_
       *याला महत्त्व आहे.*
     
☝ *"एखादे संकट आले की,*
     _समजायचे त्या संकटाबरोबर_
     _संधी पण आली._

     *कारण संकट हे कधीच*
     _संधी शिवाय एकटा प्रवास_
     _करत नाही._

     *संकट हे संधीचा*
     
     *राखणदार असते.*

     *फक्त संकटावर मात करा,*
     *मग संधी तुमचीच आहे".*

☝ _"वडाचे झाड कधीच_
       _पडत नाही,_

       _कारण ते जेवढे वर_
       _वाढते_
       _तेवढेच ते जमिनीखाली_
       _पसरते._

      *जीवनात तुम्हाला* 
      *जर पडायचे नसेल*

     _तर स्व: ताचा विस्तार_
     _वाढवता वेळी चांगल्या_
      *मित्रांची सोबत वाढवा".*

☝ *आयुष्यात सुई*
       *बनून रहा.*

     _कैची  बनून राहू नका._
     _कारण सुई  दोन_
     _तुकड्यांना  जोडते,_

    _आणि_
     _कैची एकाचे_
     *दोन तुकडे करते..*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

*जीवनामध्ये या 5 गोष्टीँना*
*कधीच तोडु नका.*

1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम

*कारण या गोष्टी तुटल्यावर*
*आवाज होत नाही.*

*परंतु वेदना खुप होतात.*

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

*"जेवण आणी राशीचे स्वभाव'*

थोडेसेच जेवण का असेना
*मेष* आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

*वृषभे*ची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
*मिथुना*चे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।

'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणत
*कर्के*चे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

राजस जेवणाच्या *सिंहेचा*
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

'कमी-जास्त नाही ना?'
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
*कन्येची* जेवायची नीती.. ।।६।।

भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
*तूळ* खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण *वृश्चिकेला* रुचत नाही.. ।।८।।

कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
*धनू* काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो *मकर*
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
*कुंभेची* चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

कधी-कुठेही जमते
*मीनेची* खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
'डाएट' नावाशी कट्टी.. ।।१२।।

😄😋आहे ना गंमत ! 😛😋

स्वतःची रास तपासून बघा😝😝😝

नक्की वाचा!!!!!!!

कालबाह्य परंपरा

मित्रांनो, वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला, तो याप्रमाणे...

एका खोली मध्ये 8-10 माकडांना ठेवण्यात आले.

त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या वर 🍌🍌 केळीचा एक घड लटकत ठेवण्यात आला.

थोड्याच वेळात एका माकडाचे लक्ष त्या केळीच्या 🍌🍌🍌 घडाकडे जाते

आणि

ते माकड शिडी चढून केळीकड़े जाण्याच्या प्रयत्न करते .

तोच त्याच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते व इतर
उरलेल्या माकडांवर सुद्धा पड़ते
आणि
शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येतं.

दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच प्रयत्न करते , तेंव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमा-गरम पाणी पड़ते.

असे सतत 3-4 दिवस घडते, त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की, केळीकड़े धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे.

मग पाचव्या दिवशी जेंव्हा पुन्हा एक माकड केळीसाठी शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करते
तेंव्हा

इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येउन कोपर्‍यात जाऊन बसते.

यामुळे त्या दिवशी कोणावरही पाणी पडत नाही.

पुढील 3-4 दिवस असे सतत घडते.
कोणी माकड शिडीकडे वळले की इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे.

अशाप्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकड़े बघायला सुद्धा तयार नाही.

तेंव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले.

मग वैज्ञानिकांनी त्या माकडांपैकी एक माकड बाहेर काढले

आणि

दुसरे एक नवीन माकड आत टाकले.

या नवीन माकडाने केळी 🍌 नजरेत पडताच शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला तोच जुनी सर्व माकडं मिळून त्या नवीन माकडाला झोडू लागलीत.

दुसर्‍या दिवशी वैज्ञानिक जुन्या माकडांपैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड आत टाकतात.

हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिडी चढ़ण्याचा प्रयत्न करताच इतर सर्व माकडं त्याला झोड़तात.

पण यात विशेष हे असते की काल आलेले नविन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील असते ज्याच्या अंगावर कधीही गरम पाणी पडलेले नसते.

आता मारणाऱ्याला माहीत नाही
आपण का मारत आहोत?
आणि
मार खाणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात आहोत?

या नंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड आत घालतात.

आणि

रोज तोच प्रकार घडतो.

नवीन माकड केळीसाठी शिडीकड़े वळले की,

उर्वरित सर्व माकडं त्याला मारतात.

मारणार्‍या माकडांमध्ये जुनी माकडं ज्यांना माहीत होतं की आपण का मारत आहोत आणी
त्यांच्यासोबतच नवीन माकडं ही सामील होती ज्यांनी कधीही गरमा-गरम पाणी अंगावर झेलले नव्हते.

अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात.

प्रत्येक नवीन येणाऱ्या माकडाला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत असतो .

आता मात्र खोलीमध्ये सर्व नवीन माकडं असतात ज्यांनी कधीही त्या खोलीत अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो.

पण जर कोण्या एखाद्या माकडाने शिडी चढ़ण्याचा प्रयत्न केला की, इतर सर्व माकडं त्याला मारतात.

कारण आता ही प्रथा तिथे रूढ़ झालेली असते,

आपण का मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा, फ़क्त कोणी त्या शिडीकड़े वळला की त्याला मारायचे बस्स एवढेच सर्वाना माहीत !!!

बोध:-
माणसांचे ही असेच आहे, आपण अनेक रुढी परंपरा मानतो.

पण आपल्याला त्यांचे मूळ कारण माहीतच नसते.

कारण त्या रुढी परंपरा सुरु झाल्या तेव्हा आपण नव्हतो , म्हणून आपण इतर लोकं करतात म्हणून करतो.

त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

बरं , जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार , विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात, शिवाय तर्काधिष्टित तर अजिबात नसतात. तरी सुद्धा आम्ही त्या माकडांसारखे "अंधानुकरण" करतो आणि स्वतःला 21व्या शतकातील , विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो.

            म्हणून कोणतीही गोष्ट, रुढी, परंपरा यांच्या मागचे कारण नीट समजून, ते वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया खरे आहे किंवा नाही हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास करू नये.

फ़क्त इतर लोक असे करतात म्हणून आपण ही करतो , तर मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा...!!!!!
  
         मग माकडंच बरी
                  👇
    🐵🐵🐵🐵🐵🐵🐵