Shanta bai

अमिताभ -- मैं हुं डॉन😎😎

शाहरुख -- मैं हुं डॉन😎😎

दाऊद ईब्राहिम-- मग मी शांताबाई का💃💃😜

झाकलेल्या मुठीतून वाळूचा
कण निसटावा,
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते" 

झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच तो पुढे पण येतो तसेच ..

सुख आणि दु:ख हि सुद्धा जीवनात बरोबर येतात
जीवनाचा झोपाळा मागे गेला तर तो नक्की पुढे पण येणारच . .........

Shanta bai

अमिताभ -- मैं हुं डॉन😎😎

शाहरुख -- मैं हुं डॉन😎😎

दाऊद ईब्राहिम-- मग मी शांताबाई का💃💃😜

Shanta bai

अमिताभ -- मैं हुं डॉन😎😎

शाहरुख -- मैं हुं डॉन😎😎

दाऊद ईब्राहिम-- मग मी शांताबाई का💃💃😜

Aashiq banaya aapne

मुलगी : जानू आशीक बनाया आपने |
आता तू का येत नाही सामने |
.
.
.
.
.
.
.
मुलगा : काय आशीक बनाया आपने
दो दीन फीरा साथ मे
तो कंबर मोड्या na बाप ने |😂😂😂😂

एका खेडे गावात एक
आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत
होते,
उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार

त्याच्या हातात १०
रुपये
तरी असावे, पण
घरात
१० रुपये नाही म्हणून
त्या माऊलीने
बाजूच्या शेतात
राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे
पैसे आणले,
तितक्यात
मुलगा शाळेतून
आला आई
ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर
झोपतो उद्या जत्रेला जायचे
आहे सकाळी लवकर
उठेन.
मुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण
उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर
न्याहारी तयार ठेव
मी लगेच अंघोळ करून
घेतो
माऊलीने भाकर करून
ठेवली, दुध चुलीवर
होते,
मुलगा अंघोळ
करून आला आई जवळ
बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर
दुध आणि भाकरी दे
मला उशीर होतोय
आई ने आजू
बाजूला पहिले दुध
उतरवायला काहीच
सापडत
नव्हते
पुन्हा मुलाचा आवाज
आला आई लवकर
कर माउलीने
विचार न
करता तसाच
दुधाचा टोप हाताने
उतरवला गरम
दुधाच्या टोपाचे
चटके
मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली,
पुन्हा मुलाचा आवाज
आला आई लवकर कर न
उशीर होतोय
त्या माउलीने
पुन्हा टोप
उचलून दुध प्यालात
ओतले
आणि मुलाला दिले,
त्या माऊलीच्या डोळ्यातले
अश्रू पाहून
त्या मुलाने मान
खाली घालून
न्याहरी केली. आई ने
जवळचे १०
रुपये
त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत
गेला संध्याकाळी परतला आई
ने
विचारले
बाळा जत्रेत काय
काय पहिले ? मुलाने
जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या ,
मग आईने विचारले
दिलेल्या १० रुपयाचे
की केलेस
काही खाल्लेस
कि नाही,
त्या मुलाने आई
ला सांगितले की तू
डोळे बंद कर
मी काहीतरी आणले
आहे
तुज्यासाठी माऊलीने
डोळे बंद केले
मुलाने िपशवीतून
पक्कड काढून
आईच्या हातात
दिली, आई
च्या डोळ्यात
त्या पक्कडीच्या स्पर्शाने
अश्रू
आले
आई धन्य
झाली.....आईच्या
हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली ."
"दोस्तानो ,आई
च्या पायाशी स्वर्ग
आहे ..कधी हि तिला दु:खवू
नका ....
डोंगरा आड
गेलेला सूर्य
पुन्हा दिसतो पण
मातीआड गेलेली आई
पुन्हा दिसत नाही "
"फक्त Like
किंवा Share
नका करू ,
आपल्या माई
साठी काही तरी करा .....!
आई माझा गुरु .. आई
कलपतरु . . आई सैख्याचे
सागरु . आई माझी ...

SSC AND HSC MARKSHEET ONLINE

🙏🏽महत्वाचे🙏

दहावी आणि बारावी चे मार्कलिस्ट व सर्टिफिकेट आता कोठेही मिळवता येईल .

PDF File स्वरूपात DOWNLOAD पण करता येईल .

खालील वेबसाईट वरुन DOWNLOAD करुन संग्रही ठेवा.

आपणास  कोठेही केंव्हाही उपयोगी येईल .

www.boardmarksheet.maharashtra.gov.in

सन १९९० पासुनचे रेकॉर्ड उपलब्ध आहे .

Download Hsc and ssc MARKSHEET online at anytime, anywhere in PDF File

💐 एक सुंदर कविता 💐

आजी माझी सांगुन गेली
पोटा पुरतंच कमव.

जिवाभावाचे दोस्त
मात्र खुप सारे जमव..!

पैशा पुढे झुकणारे
खुप सारे भेटतील,

असेल तुझा खिसा गरम
तर बळे बळेच खेटतील.

तुझ्या सुखात हसणारे
जे तुझ्या दुःखात रडतील.

तेच नातं खर आहे
त्याला जिवापाड जपव.

जिवाभावाचे दोस्त
मात्र खुप सारे जमव..!

श्रीमंती नी गरीबी
असतो खेळ ऊन सावलीचा,

मनी सदा ठेव
आदर माय माऊलीचा.

सच्चा मित्र मिळायला
खुप मोठं लागतं दैव,

जपुन ठेव धन मैत्रीचं
हि आयुष्यभराची ठेव.

जिवाभावाचे दोस्त
मात्र खुप सारे जमव..!

आजी माझी सांगुन गेली
पोटा पुरतंच कमव.

जिवाभावाचे दोस्त
मात्र खुप सारे जमव..!
👏😊✌

Sadicha padar

साडीचा "पदर" !

काय जादुई शब्द आहे हो मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी
नाही, अनुस्वार नाही. एक
सरळ तीन अक्षरी शब्द. पण,
केवढं विश्‍व सामावलेलं आहे
त्यात!

किती अर्थ, किती महत्त्व...
काय आहे हा पदर?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या
खांद्यावर रुळणारा मीटर दीड
मीटर लांबीचा भाग. तो
स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच, सगळ्यात महत्त्वाचं
हे कामच त्याचं. पण, आणखी
ही बरीच कर्तव्यं पार पाडत असतो हा !

या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते. सगळ्या जणींमध्ये
चर्चाही तीच.

लहान मूल आणि आईचा पदर,
हे अजब नातं आहे. मूल तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन अमृत प्राशन
करण्याचा हक्क बजावतं.

जरा मोठं झालं, वरण-भात
खाऊ लागलं, की त्याचं
तोंड पुसायला आई पटकन
तिचा पदरच पुढं करते.

मूल अजून मोठं झालं, शाळेत
जाऊ लागलं, की रस्त्यानं
चालताना आईच्या पदराचाच
आधार लागतो.  एवढंच काय,
जेवण झाल्यावर हात धुतला,
की टॉवेलऐवजी आईचा
पदरच शोधतं आणि आईलाही
या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात
मुलानं पदराला नाक जरी
पुसलं, तरी ती रागावत नाही
त्याला...

बाबा जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच सापडतो.

महाराष्ट्रात तो डाव्या खांद्या
वरून मागे सोडला जातो;
तर गुजरात, मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून पुढं
मोराच्या पिसाऱ्यासारखा
फुलतो !

काही कुटुंबात मोठ्या
माणसांचा मान राखण्यासाठी
सुना पदरानं चेहरा झाकून
घेतात, तर काही जणी आपला
लटका, राग दर्शवण्यासाठी
मोठ्या फणकाऱ्यानं पदरच झटकतात !

सौभाग्यवतीची ओटी भरायची
ती पदरातच अन्‌ संक्रांतीचं
वाण लुटायचं ते पदर लावूनच.

बाहेर जाताना उन्हाची दाहकता
थांबवण्यासाठी पदरच
डोक्‍यावर ओढला जातो,
तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब
मिळते!
काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी
पदरालाच गाठ बांधली जाते
अन्‌ नव्या नवरीच्या जन्माची
गाठ ही नवरीच्या पदरालाच,
नवरदेवाच्या उपरण्यासोबत
बांधली जाते.

पदर हा शब्द किती अर्थांनी
वापरला जातो ना?
नवी नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते, पण
कामाचा धबडगा दिसला,
की पदर खोचून कामाला
लागते.
देवापुढं आपण चुका कबूल करताना म्हणतोच ना - माझ्या
चुका "पदरात घे.‘

मुलगी मोठी झाली, की आई
तिला साडी नेसायला शिकवते,
पदर सावरायला शिकवते अन्‌
काय म्हणते अगं, चालताना
तू पडलीस तरी चालेल.
पण, "पदर" पडू देऊ नकोस ! अशी आपली संस्कृती.

या पदरावरूनच किती तरी वाक्‌प्रचार, म्हणी रूढ झाल्या आहेत.

पदर सुटला म्हटले, की
फजिती झाली; कुणी पदर
ओढला म्हटलं, की छेड
काढली.

"पदरावरती जरतारीचा मोर
नाचरा हवा, आई मला नेसव
शालू नवा...‘ अशी गाणी ऐकायलाही छान वाटतात.

असा हा किमयागार साडीचा पदर आजकाल जिन्सच्या जमान्यात लुप्त होत चालला आहे . नाहीतर पुढील पिढीला त्याचा अर्थ सांगायला तुम्हाला आम्हाला नक्कीच डिक्शनरी काढावी लागणार हे देखील एक कटू सत्य आहे !

कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची
किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे .
आणि
स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे.
आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..."

" सत्याच्या " मार्गावर चालणे हे कधीही फायद्याचेच आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते

Amazing Dahi Handi 2015

Pagarachi Aarti

|| पगाराची आरती ||
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव, जय देव !
महिन्याच्या पहिल्या, आठवड्याला येशी,
सकलांना सुख आणि आनंद देशी,
काटकसर केली तरी, कमी पडशी,
शेवटच्या आठवड्यात, संपून जाशी.
जय देव, जय देव !    -1
असशी तू तुटपुंजा, घरी ना पटते,
रोज सौ. माझ्याशी, भांडत असते,
तुझ्या हिशोबातच, नोकरी सरते,
मुला-बाळांची, काळजी वाटते.
जय देव ! जय देव !    -2
तुझ्यासवे कधी, ओव्हर टाईम येतो,
दसरा, दिवाळीला, बोनस असतो,
महागाईत थोडा, दिलासा मिळतो,
कर्जाचा डोंगर, जरासा हालतो.
जय देव ! जय देव !    -3
महागाईबरोबर, तुझी शर्यत,
कुर्मगती तुझी रे, नाही जिंकत,
हव्यासे काहीजण, भ्रष्टाचारात,
सांग कुठे कशी, राहिल नियत ?
जय देव ! जय देव !    -4
मागणे इतुकेच, तुजला पगारा !
महिन्याला भेटावे, तुच आसरा,
आणखी विनवितो, तुला रे जरा,
पुरून उरावा तू, आमुच्या संसारा,
जय देव ! जय देव !    -5
जय देव, जय देव, जय जय पगारा !
तुझ्याविना अडतो, संसार सारा !
जय देव ! जय देव !

“सत्य” ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते.
पण “असत्य” हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!

"कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही."
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्...
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...!

Nimbu Mirchi

🍋🎋लिंबू मिरची🎋🍋

ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक  बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या ह्या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल. किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणार्या वाटसरूना तो लगेच मिळेल .
पण हे का?
असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.
ह्याचे उत्तर असे आहे कि मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्या मुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.
त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे.
जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता. असा अंदाज बांधला जात
. बिब्बा हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात , आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई. अश्या प्रकारे हा प्रथोमपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारा साठी लावला जात.
पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा  बनून अजून ही चालू आहे.
  ह्या प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा  झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश….!

डोळे कितीही छोटे असले तरीही,
एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते,
आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे,
जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,
दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते,
फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी.

देखणेपणावर जाऊ नका, सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.
श्रीमंताला भुलू नका, 'आलेल्या ' पैशाला 'जाण्याच्या' वाटा पटकन सापडतात .
जी व्यक्ती तुमच्या चेहर्‍यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.

जरूर वाचाच.......
👌👌👌👌👌👌👌

केस अर्पण
करून कुठे पुण्य मिळते,

नारळ अर्पण
करून कुठे भाग्य उजळते,

केस अन् नारळ
विकुनी होतो व्यापार.

सोनं- चांदी अर्पण
करून कुठे काय मिळते.

सोने -चांदीच्या
दागिन्यांचा होतो लिलाव.

काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ???

कधी शेतक-याला
बियाणं दान देऊन बघा.

कधी निराधार
कन्येचा विवाह लाऊन बघा.

कधी एखाद्या निराधार
बालकाचा पालक होऊन बघा.

कधी एखाद्या
उपाश्याला भरवुन बघा.

कधी एखाद्या
अपंगाला आधार देऊन बघा.

कधी एखाद्या शाळेचा
जीर्णोध्दार करून बघा.

कधी एखाद्या
वृध्दाश्रमास दान करून बघा.

कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघा.

एकदा दान धर्माच्या
व्याख्या बदलून तर बघा !!!

जेव्हा मंदिरात जाणाऱ्या
रांगा वाचनालयात जातील,

तेव्हा भारत
जगात महासत्ता बनेल...

पुस्तक वाचनाने
माणसाचं मस्तक सशक्त होतं...

सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसतं...

आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसतं...!

शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?

शाळेत आज मुलांना
बसायला साधी फरशी नाही.

आणि
मंदिराला मात्र संगमरवरी ?

शाळेला दोन रुपये देतांना दहा
वेळा चौकश्या करणारा पालक,

मंदिराला दोन हजार देतांना
अजिबात चौकशी करत नाही..

आपला भारत
नक्की महासत्ता होणार ?

पायात घालायची चप्पल
ए सी मधे विकायला ठेवतात,

आणि
भाजीपाला फूटपाथवर...!

आणि म्हणे
आमचा देश कृषी प्रधान..!

आणि
आत्महत्या करतो शेतकरी..

शेकडो
मैल चालतो वारकरी...

अन विठोबाचे
पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!

वाचा, विचार करा, आणि
पटलं तरच पुढे पाठवा..!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-🍥१) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥
२) सासू क्लबमध्ये सून पबमध्ये !🍥
३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥
४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥
५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥
६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥
८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं !🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी !🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चो-या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला !🍥२०) आपले ते पक्षांतर, दुसर्याचा तो फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया अंगी खोटेपण, तया मिळे मोठेपण !🍥 रह२४) एल.एल.बी झालो अन भिकेला लागलो !🍥२५) सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना !
🍥२६) वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला !🍥२७) वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले !🍥२८) घोड्याच्या शर्यतीत वशिल्याचे गाढव पुढे !🍥२९) साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता !🍥३०) गाढवापुढे वाचली गीता, वाचणारा गाढव होता !🍥३१) स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार !🍥३२) मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका !🍥३३) न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला !🍥३४) पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा !🍥३५) पुढा-याचं मूळ व हॉटेलची चूल पाहू नये !🍥३६) नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही !🍥३७) नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही !🍥३८) घरात नाही दाणा आणि म्हणे बर्शन आणा !🍥३९) घरावर नाही कौल पण अॅंटीनाचा डौल !🍥४०) घाईत घाई त्यात चष्मा नाही !🍥४१) रिकामा माळी ढेकळ फोडी !🍥४२) घरोघरी मॉडर्न पोरी !🍥४३) ओठापेक्षा लिपस्टीक जाड !🍥४४) नाकापेक्षा चष्मा जड !🍥४५) अपु-या कपडयाला फॅशनचा आधार !🍥४६) बायकोची धाव माहेरापर्यंत !🍥४७) गोष्ट एक, चित्रपट अनेक !🍥४८) काम कमी फाईली फार!🍥४९) लाच घे पण जाच आवर !🍥५०) मंत्र्याच पोर अन् गावाला घोर !🍥५१) मरावे परी पुतळ्यारुपे उरावे !🍥५२) नटीच्या लग्नाला सतरा नवरे !🍥५३) मिळवत्या मुलीला मागणी फार !🍥५४) रिकामी मुलगी शृंगार करी!🍥५५) प्रेमात पडला हुंडयास मुकला !🍥५६) दुरुन पाहुणे साजरे !🍥५७) ऑफीसात प्यून शहाणा !🍥५८) सत्ता नको पण खैरनार आवर !🍥५९) एक ना धड भाराभर पक्ष !🍥६०) हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे !🍥६१) थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे !🍥६२) तोंडाला पदर गावाला गजर !🍥६३) कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं !🍥६४) रात्र थोडी डास फार !🍥६५) शिर सलामत तो रोज हजामत !🍥६६) नेता छोटा कटाऊट मोठा !🍥६८) दैव देते आयकर नेत !🍥६९) डीग्री लहान वशिला महान!

मला आलेली ही पोस्ट मी शेअर करत आहे.

मानवानेच देवाची निर्मिती केली त्याचे
पुरावे.
१) माणुस सोडुन जगातील एकही प्राणी देव
मानत नाही.
२) जिथ माणुस नाही पोहचला तेथे मंदिर
मस्जिद किंवा चर्च नाही सापडले.
३) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत
याचाच अर्थ
मानवाला जसी कल्पना सुचली तसा देव तयार
झाला.
४) जगात अनेक धर्म व पंथ व स्थानीक देवता
आहेत याचाच अर्थ देव सुद्धा एक नाही.
५) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत
६) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत.
७) मानला तर देव नाही तर दगड ही म्हण
उगीचच नाही तयार झाली.
८)तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे
संत वचन
९)जगातील देवतांचे
वेग वेगळे आकार व त्यांना प्रसन्न करण्याच्या
वेगवेगळ्या
पुजा
१०) आता पर्यंत ठाम पणे मला देव भेटला असे
कुणी सांगु शकला नाही
११) देव माननारा व न माननारा ही सारखेच
आयुष्य जगतो
१२) देव कुणाचेच काहीही भले वा वाकडे करू
शकत नाही
१३) देव कोणताही भ्रष्टाचार अन्याय चोरी
बलात्कार आतंकवाद अराजकता रोखू शकत
नाही.
१४) लहान निष्पाप बालकावर गोळ्या
घालनाराचेही हात धरू शकत नाही.
१५) मंदिर मठ आश्रम प्रार्थना स्थळे व देवांचे
वास्तव्य ज्या ठिकाणी मानले जाते त्या
ठिकाणी सुद्धा बालके स्त्री सुरक्षीत नाही.
१६)मंदीर मस्जिद व चर्च पाडताना देव
एकदाही आडवा आला नाही की बांधताना
नगर पालीकेची परवानगी घेतली नाही
१७) अभ्यास नकरता
एकाही देवाने विद्यार्थ्याला पास केल्याचे
आठवत नाही.
१८) केदारनाथ मध्ये एकाच वेळी १०००० लोक
मेली एकालाही त्याने वाचवले नाही
१८) ब-याच देवांचा २५ वर्षापुर्वी मागमुसही
नव्हता ते प्रख्यात देव झाले आहेत
१९) स्वतःस भगवान म्हणून घेणारे सध्या जे़लची
हवा घेत आहेत
का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत
२०) जगात २५० कोटी लोक देवच मानत नाहीत
तरी ते समाधानाने व आनंदाने रहात आहेत.
२१) हिंदु अल्लाला मानत नाही मुस्लीम
देवाला मानत नाही
ईसाई देव व अल्लाला मानत नाही हिंदू
मुस्लिम
गॉड मानत नाही
तरीही कोणत्याही देवाने एकमेकांला
विचारले नाही की असं का?
२२) एक धर्म म्हणतो त्याला आकार नाही
दुसरा देवाला आकारदेवुन फॅन्सी कपडे घालतो
तिसरा वेगळच सांगतो
म्हणजे नेमके काय
२३) देव आहे तर लोक धाक का पाळत नाहीत
२४) समाजाला घातक गोष्टी का करतात.
२५) जो मांसाहार करतो तोही जगतो नाही
करत तोही जगतो
दोन्ही खातो तोही जगतो
२६) अमेरिका देव मानत नाही तरिही
महासत्ता आहे.
२७) आपल्या कडे ३३कोटी देव आधिक महाराज
आधिक अल्लाहआधिक गॉड अाधीक संत महंत
ऊत आला आहे तरी पाऊस नाही.गरीबी पासुन
मुक्ती नाही शेतक-यांच्या आत्महत्या कमी
नाहीत बलात्कार कमी नाही रोगराई कमी
नाही
भ्रष्टाचार कमी नाही.
या सर्व बाबी वरून लक्षात येते की मानसाला
देवाचा धाक नाही उलट देवच घाबरलेले आहेत
कारण देवाचा निर्माता मानवच

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही,
समाधानासारखे कोणतेही सुख नाही,
लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणी दयेसारखे कोणतेही पुण्य नाही...
"तुमचा येणारा प्रतेक दिवस आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो."

स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सर्वच तुमच्यावर प्रेम करतील,...
           तुम्ही निघुन गेलात तर तिथे तुमची सर्वदा आठवण राहिल,..
आणि जिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट पाहतील .

एक सुन्दर ओळ 👌👌

"देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आर्शिवाद मागा, तुम्हाला कधी स्वताःसाठी काही मागायची गरज पडणार नाही......!

चांगल्या व्यक्तीने अपमान केला , रागावली तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा.
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा....

Premala upama nahi

"प्रेमाला उपमा नाही"
उपम्याला रवा नाही,
रव्याला गहू नाही,
गव्हाला पाणी नाही,
पाण्याला पंप नाही,
पंपाला पैसे नाही,
पैश्याला नौकरी नाही,
नौकरीला डिग्री नाही,
डिग्रीला कॉलेज नाही,
कॉलेजला मुली नाही,आणि मुलीशिवाय
प्रेम नाही म्हणून कवी म्हणतात
"प्रेमाला उपमा नाही".

            आपुलकी असेल,
             तर जिवन सुंदर..
        संदेशाची आवड असेल,
           तर मोबाईल सुंदर...
       💐 फुले  असतील, 💐
              तर बाग सुंदर...
          गालातल्या गालात
       एक छोटस हसु असेल,
        😊 तर चेहरा सुंदर...
                    आणि....
      नाती मनापासून जपली,
        तरच आठवनी सुंदर...