Showing posts with label 2 Shabd Premache. Show all posts
Showing posts with label 2 Shabd Premache. Show all posts

😊Saglyani ha msg
nakki vacha😊

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची..

एंक खूप छान कथा.....

कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.

ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......

पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...

'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....

तसा तुलाही.. ...

सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...

अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......

पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?

तसं व्हायला नको...

म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......

कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....

"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......

विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...

निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....

नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'

आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......

कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात

अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...

मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..

याची त्याला
कल्पनाच नव्हती...

एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....

त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...

त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...

कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...

सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...

इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..

अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...

तारीख पुढे गेलीतर....

त्याला गलबलूनच आलं ....

या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...

ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......

तक्रार करत राहिलो.....

त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....

तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....

खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......

वाळून वाळून
झूरायला आलेली ....

तिला भिजवयला
तो आतूर झाला,......

कातर झाला...

पाणी घालायला
भांड नव्हतं .......

त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....

तहानलेली शेवंती

गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......

तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......

ती आली होती......

शेवंतीसारखीच... .....

तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...

काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....

हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....

की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....

दोघांची नजरा नजर झाली...

दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....

ती म्हणाली,

"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "

तो गलबलून म्हणाला,

"आत्ताच पाणी दिलय... ...

तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"

आणि ती थांबली......

..अगदी...   कायमची...!!!

पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....

परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....

त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....

त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....

आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......

हेच खरं "प्रेम" असतं.....

हेच खरं "प्रेम" असतं.....

नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....

कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......

तर आयुष्यभर
एकटे राहाल......

विश्वास उडाला
की आशा संपते......

आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......

म्हणुन, विश्वास ठेवा,....

आणि काळजी घ्या.......

आयुष्य खुप सुन्दर आहे.......

प्रेम सुंदर आहे" कारण ते
हृदयाची काळजी घेते
पण
"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण
मैत्री दुसर्यांच्या हृदयाची
काळजी घेते....👌�👌�👌�
🙏 शुभ सकाळ 🙏

कधी कुणाचे प्रेम सोडून जाते,
कधी कुणी स्वतःच प्रेम करायचे
विसरते.
स्वतःवर प्रेम करायला शिका,
स्वतःसाठी जगायला शिका.
शोधा जीवनात हरवलेले क्षण,
पुसून टाका दुःखाचे व्रण..
तेव्हा हसेल तुमचे मन,
भासेल सुंदर हे जीवन.

RaDhE...
ती मला म्हणाली
एक प्रश्न सारखा माझ्या मनात येतो रे
मी : कोणता प्रश्न ??
ती : खरं उत्तर देणार असशील तर विचारते
मी : काय गं म्हणजे तुला काय म्हणायचं
मी तुझ्या सोबत खोटे बोलतो ती : तसे नाही रे पण हा प्रश्न जरा माझ्यासाठी खास आहे
आणि तु दिलेल छानस उत्तर मला हव आहे
मी : ठिक आहे विचार मग
ती : तु खूप मस्त आहेस तुझं बोलणं तुझं वागणं
माझ्यावर भरभरून प्रेम करणं मी तर खूप
साधी आहे रे
अगदी तुझ्या समोर काहीच नाही मग तु माझ्यात असे काय बघून माझ्यावर प्रेम
केलस ??
मी : एक तिला गोड स्माईल दिले आणि म्हणालो
तुझ्या दिसण्यावर
तुझ्या हसण्यावर
तुझ्या गालावर
तुझ्या गुलाबी ओठावर तुझ्या पानेदार डोळ्यावर तुझ्या रेखीव नाकावर तुझ्या लांबसडक केसांवर तुझ्या हणूवटी वरील खळीवर तुझ्या मुखातून येणार्या मधुर शब्दावर तुझ्या हरणी सारख्या चालेवर तुझ्या आकर्षीत करणार्या आदानवर तुझ्या चेहर्यावरील हावभावानवर खरंच सांगायचं तर या तुझ्या कशावरच मी प्रेम
केलं नाही
सौंदर्य हे चिरकाळ टिकत नाही म्हातार पण
आलं कि सर्व
विदरूप होतं सौंदर्य आहे तेव्हा तो पर्यंत प्रेम करणार्यातला मी नाही
आणि म्हणून मी फक्त तुझ्या छातीत माझ्यासाठी धडधडणार्या त्या तुझ्या ह्रदयावर प्रेम केलं आहे ते ना काळे ना गोरे ना सुंदर
ना विदरूप
ते माझ्यासाठी जिवास जिव देणारं
आहे
माझ्या भावनाना समजून घेणारं आहे माझ्या प्रेमाला हळूवार जपणारं आहे हो मी प्रेम केलंय तुझ्या स्वभावावर तुझ्या वागण्यावर तुझ्यात असलेल्या माझ्यावर फक्त तुझ्या ह्रदयावर
आणि म्हणूनच सौंदर्य संपेल पण माझं प्रेम
कधीच संपनार नाही
माझं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातुन अश्रू
वाहात होते
मी तिला जवळ घेतले
अश्रूंचा ओघ कमी झाल्यावर ती फक्त इतकेच
म्हणाली
मी या जगातील सर्वात नशिबवान मुलगी आहे.

�� �� नक्की वाचा �� ��
.
एक मुलगा आणी एक मुलगी एकमेकांवर खुप प्रेम करत असतात..
.
मुलगी : काय करतोस जान...?
.
मुलगा : तुलाच miss करतोय...
.
मुलगी : हट्ट पागल...
.
मुलगा : तु काय करते आहे पिल्लू...
.
मुलगी : काही नाही बस्स..माझ्या मैत्रीनींना भेटायला निघाले आहे..
ओके..रात्री बोलुयात आपण...
.
मुलगा : ओके...
.
मुलगी तीच्या मैत्रीनींना भेटायला जाते...
.
मुलीची मैत्रीण : तुझा बाॅयफ्रेंड तुझ्यावर किती प्रेम करतो...?
.
मुलगी : खुप जास्ती करतो,आम्ही लवकरच लग्न करणार आहोत..
.
मुलीची मैत्रीण : ओह्ह,मग सिद्धकरून दाखव..
.
मुलगी : सिद्ध ते कसं...?
.
मुलीची मैत्रीण : आपण त्याला काॅल करूया आणी हे सांगूयात की,
तुझा accident झाला आहे,
बघुयात किती वेळात ईथं येतोय ते..?
.
मुलगी : ओके ठिक आहे....
.
मुलीची मैत्रीण : मुलाला काॅल करते आणी सांगते.
.
मुलगा : तीचा accident झालाय...?
हे समजल्याबरोबर वेड्यासारखं करू लागतो,आणि
तूफान वेगाने गाडी चालवत तिच्याकडे पोहोचत असतो,
.
पण,
.
तिच्याकडे येत असताना त्याचाच accident होतो,
आणी,तो तीथच मरण पावतो...
.
जेव्हा तीला ही घटना समजते तेव्हा ती रडू लागते...
.
पण,
.
आता तीच्याजवळ पश्चातापकरण्या शीवाय काहीच उरलेले नव्हते..
.
(तुम्ही कोणावर किती प्रेम करता याची सिद्धता
कोणासमोर दाखवून द्यायची गरज नसते..)
.
खरं प्रेम वेळ आली की त्याची सिद्धता स्वताःहून देते....

प्रेम म्हणजे...💓💓💓............?

मला माझ्या मित्राने विचारले की प्रेम म्हणझे नेमके काय?

मी त्याला सागितले की ...

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम. 💕💖💞💖💕💞

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडे न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम. 💕💖💞💕💖

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💞💖💕💖💞

कितीही वाद झाले तरी   जेवलास का अशी विचाणारी बहिण म्हणजे प्रेम. 💖💕💞💕💖💕💞💖💕

पगार कितीही कमी असेल तरी दिवाळीत भाऊबीजला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम. 💞💕💖💕💖💞💕💖

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... 
म्हणजे प्रेम! 💕💖💞💖💕💞

कुणाचा  रिप्लाय येवो अगर न येवो, तरीही नियमितपणे एसएमएस पाठवीत रहाणारा मित्र म्हणजे प्रेम❗💕💕💖💖💞💞💕💕 आवडल तर👏जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा👏
अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव...
..
तिने हळूच माझ्याकडे बघाव ,
मी बघतांना तिने हळूच लाजाव... .
.भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...
. मी दिसताच तिने मग हळूचहसाव,
आणि मी नसतांना तिने रडाव ...
..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव... .
.तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव
निघाव ,स्वप्नातही तिला मीच दिसावं....
. .अस कधीतरी घडाव ,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव.

शोधायच आहे... फक्त प्रेम

तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तुझ्या चेहर्यावर सुख पहायचय मला मला
तुझ्यावर खुप प्रेम करायचय असच एकदा
तुझ्या स्वप्नात यायचय अलगद तुझा हात
माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय तू समोर
नसतानाही तुला अनुभावयचय तेव्हाही
तुला खुप आनंदी पहायचय माला फक्त
तुझ्यासाठी जगुन पहायचय खरा तर
तुझ्यावर खुप प्रेम करायचय तुझ्या समोर
येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय...
ते फक्त प्रेम,

मर्यादे

कुणीतरी मला विचारले कि,,,' तू
तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत
जावू शकतोस'??? मी हसत उत्तर दिले,,'जर
मर्यादाच ओलांडायच्या असत्या
तर तिला कधीच मिळवले असते!!'

प्रेम करावे

💕"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!

प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!

आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!

प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!

प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!

शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र  हि करावे !

प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!

महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!
💕Happy Valentines Day 💕

वेड आणि प्रेम

💕एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,💖💖

💕वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,💖

💕इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती, 💖
💕वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली,💞
💕 ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............💖💖
💕वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,💖
💕शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........💖

💕बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,💖
💕तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,💖

💕पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........💖
💕ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील💖
💕म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............💖
💖तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे.
🐾🌸
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून,
कवडीमोल ठरवू नका..
🐾🌸
भावनांचं मोल जाणा ,
मोठेपणात हरवू नका.
आयुष्याच्या प्रत्येक वळणात
नवं नातं जुळत असतं,
🐾🌸
जन्मभर पुरेल इतकं भरून
प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे
करुन पहा,
🐾🌸
कमीपणा मानू नका,
व्यवहारातलं देणं घेणं
फक्तं मध्ये आणू नका..
🐾🌸
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
🐾🌸
समाधानात तडजोड असते
फक्त जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
🐾🌸
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
🌸🐾 🌸.
शब्दांना  भावरूप  देते,
. . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. ॥॥💕❤️💘👏

भीती वाटते

भीती वाटते कोणाला आपल बनवायची…

भीती वाटते काही वचने निभवन्याची…

प्रेम तर एका क्षणात होत…

पण मोठी किम्मत मोजावी लागते….

विसरन्याची…

खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..

म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ

करताना….

प्रेम

समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची

प्रेम

शब्द" कमी....
"समज" जास्त,....!!
"विवाद" कमी....
"स्नेह" जास्त,.... !!
"श्वास" कमी......
"विश्वास" जास्त,....!!
"द्वेष" कमी.....
"प्रेम" जास्त....!!




प्रेम आणी "मिञ"

एकदा एकांतात
असताना राधेनं श्रीकृष्णाला
विचारले,
कृष्णा ! प्रेम आणी
"मिञ" यामधे काय
फरक आहे,
श्रीकृष्ण हसुन
म्हणाले राधे...!
प्रेम म्हणजे सोनं व मिञ म्हणजे हिरा
असतो,
सोनं मोडून पुन्हा घडवता येते गं .....परंतु,
हिरा  तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत
नाही..


सर्व मित्रांना समर्पित 👬👭👬👭
👍v💯


Premachi Bhavana

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना

५ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चाॅकलेट काढणे पण
तरी त्याचे नेहमी तिथेच चाॅकलेट ठेवणे.

१० वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श.

१५ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
आम्ही शाळा बुडवल्यामुळे पकडले गेल्यावर त्याने
स्वताहा एकट्याने भोगलेली शिक्षा.

१८ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
शाळेच्या निरोप समारंभात त्याने
मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा.

२१ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे,
माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट.

२६ वर्षाची मुलगी : प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्नासाठी केलेली मागणी.

३५ वर्षाची स्त्री : प्रेमम्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वताहा केलेला स्वयंपाक.

५० वर्षाची स्त्री : प्रेम म्हणजे,
तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद.

६० वर्षाची स्त्री : प्रेमम्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्याजन्मात लवकरच
भेटण्याचे दिलेले वचन.

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे 'आकर्षण' असतं,
परत पहावसं वाटणं हा 'मोह' असतो, त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही 'ओढ' असते, त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा 'अनुभव' असतो
आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं "प्रेम" असतं..

नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
तर आयुष्यभर एकटे राहाल..!
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीच्या दयाळूपणाने वागलाय..

जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो..
पण
मृत्यूच येण मात्र अकस्मात असत..
कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही..
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!

विश्वास उडाला की आशा संपते!

काळजी घेण सोडल की प्रेम संपत!

म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या!

आयुष्य खुप सुंदर आहे..

गप्पच राहवसं वाटतं

गप्पच राहवसं वाटतं
तुझ्याजवळ बसल्यावर
वाटतं तुच सगळं ओळखावस
मी गालात हसल्यावर....