#श्रुंगारपुर
1995 साली बाबांची बदली #देवरुखला होऊन माझा श्रुंगारपुरशी संपर्क जरी तुटला असला तरी त्या गावाशी नाते गेली 25-30 वर्षे अजुन #टीकुन आहे.
आयुष्याची सुरुवात,माझे बालपण,पहिले पाऊल,पहिला शब्द,पहिली शाळा,पहिला मित्र,पहिला खेळ,मासे पकडण्याची कला,भजनाची आवड, गावची ओढ आणि माणुस जोडण्याचे #संस्कार माझ्यावर याच #गावात झाले ते ही खोलवर.
वयाची 6 वर्षे पुर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश मिळतो पण मी अडीच वर्षाचा असल्यापासुनच शाळेत जावुन बसत असे,त्यानंतर पहीली आणि दुसरी ला तर मी कधीच #चालत घरी नाही गेलो वरच्या वर्गातील मुले मला कांदे-बटाटे (म्हणजेच पाठीवर उचलुन)घ्यायचे एकाकडे बॅग तर एकाकडे चप्पल असायची, गुरुजींचा मुलगा म्हणुन माझा थाट वेगळाच असायचा.सातवीतल्या मुलांसोबत पाण्यातुन #पार्लेजी खायची मज्जा,त्यांच्या डब्यातला #फोडणीचा_भात मी आयुष्यात विसरु शकणार नाही.
बामन नदीला लागुन 10-15 फुटावर आमचं घर पावसाळ्यातुन पुराच्या वेळेला येणारे #दगडांचे आवाज आजही कधी-कधी कानात वाजतात.
बाबा कामानिमित्त बाहेर गेले की मी दिवसभर नदीत मासे पकडत बसायचो,त्यात काठीला गांडुळ बांधुन शिट्टी वाजवत #मासे_पकडायचो,पोहायला लवकर शिकायला यावे म्हणुन कोणाच्यातरी सांगण्यावरून जीवंत #रतवा (छोटा मासा)पण बर्याच वेळेला खाल्ल्या आहेत.
नदीशी संबंधित माझी गोड आठवण म्हणजे नदी आटली की कातळाजवळ एक डोह होता त्याच्या वरच्या बाजुला शेतीच्या मळ्या होत्या त्या ठीकाणी आम्ही थोडीशी #कोथींबीर रूजवायचो आणि ज्या दिवशी ती तयार होईल त्या दिवशी नदीच्या त्या डोहातील संपुर्ण पाणी ताटलीने उपसुन त्यातील #मासे पकडायचो आणि त्या कोथिंबीर सोबत शिजवुन त्या शेतातच पार्टी करायचो.काय सुख होतं त्यात,एकदम भारी.
खेळ पण त्यावेळी खुप मजेदार होते #लगोरी आणि #विटीदांडु हे त्यात माझे खुप आवडीचे ,नदिपलिकडे खेळत असलेल्या त्या विटीदांडुच्या कावडीतील "कुत्ती कवाडी" मी एकटा असलो की आजही म्हणतो पण त्या शब्दाचा अर्थ आजपर्यंत काही मला कळलेला नाही.
शेजारील #बारक्या जो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता तो आमचा त्यावेळचा ग्रुप लिडर होता त्या सोबत च्या आठवणी म्हणजे आमच्या #पार्टी असायच्या त्याही कसल्या..?? चहा बटर,चहा बिस्कीट स्पाँन्सर नेहमी बारक्याच असायचा. गुढीपाडव्याला आमच्या जाधव वाडीतील प्रत्येक घराची गुढी आम्ही उतरवायचो मग प्रत्येक घरातुन 2-3 रुपये मिळायचे मग आम्ही त्याचा रवा आणायचो आणि #शिरा करुन जंगी पार्टी करायचो.
मी 5-6 वर्षाचा होतो असेन तेंव्हा बारक्या आणि आम्ही बिझनेस पण करायचो #निकमांच्या दुकानावरून गुळाच्या चिक्क्या,चणे,शेंगदाणे,दगडीगोळी विकत आणायचो आणि बारक्याच्या एका ओपन खिडकीत #दुकान मांडायचो आणि आणलेल्या कीमतीतच ते आम्हीच विकत घ्यायचो😂😂
पण देवदिवाळीच्या जत्रेत आमची उलाढाल मोठी असायची बारक्याच दुकान असायच त्यात तो पपनीसच्या शेडी,ताक आणि त्याच्या घरी लागलेली म्हैस-केळी विकायचा मी त्याच्या सोबतच असायचो या सगळ्यात मला एक वेगळीच #मज्जा यायची जी मी आजही miss करतो.
सणाला सुट्टी पडायची आणि आम्ही गावाला यायचो पण सुट्टी संपुन परत श्रुंगारपुरला कधी जातोय असच नेहमी व्हायचं.
श्रुंगारपुरचे सण ही त्यावेळी दिमाखात व्हायचे मग तो शिमगा असो,दहीहंडी असो की #देवदिवाळी .त्यात शिमगा म्हणजे वेगळीच मज्जा आमच्या जाधव वाडीची छोटी होळी उभी रहायची मग शेवर तोडुन आणणे ,ती उभी करणे यात मी सहभागी असायचो आमचा #नाना मग माझ्यासाठी रात्री वाजविण्यासाठी #आमट्या घेवुन यायचा,आणि मग आठ दिवस खेळणे आणि फाक पाडणे यात नुसती धम्माल यायची.
आमचे दादा-वहीनी म्हणजेच सख्खे आजी-आजोबाही मागे पडतील असे प्रेम त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्यामुळेच आजपर्यंत माझी एक नाळ या गावाशी बांधुन राहीली.मला ते घर आजही माझं दुसरं मुळ घर किंवा दुसरं आजोळ वाटतं त्यांची मुलं नाना,रवी दादा, वंदुताई आजही मला #भावंडासारखीच वाटतात आणि आहेत कारण तेवढं प्रेम आम्हाला त्या घरातुन मिळालं आणि अशी खुप घरं या श्रुंगारपुरात आहेत जी आपलीशी वाटतात,मग ते #सुभेदारांचे घर असो,#आनंद दादाचे असो.
कोणीतरी #रक्ताची नातीच तिथे आहेत असेच सतत भासत असते...
गाव #सोडतांनाचा तो क्षण आजही माझ्या डोळ्यासमोर आहे जवळ-जवळ संपुर्ण गावच आम्हाला निरोप देण्यासाठी स्टॉपवरती आला होता,त्यानंतर मला आजही आठवतंय जवळ-जवळ चार महिने नवीन शाळेत मी गेलोच नव्हतो,गावातुन #शहरात तर आलो होतो पण जे #सुख_समाधान श्रुंगारपुरने दिले ते कुठेच मिळाले नाही.
आजही माझं #क्लिनीक ज्या #मारळ #बामणोली गावात आहे ती गावे निवडण्याचं श्रेयंच श्रुंगारपुरला जातं कारण या तिन्ही गावांची #ठेवण एकसमान गावच्या मधोमध नदी,चारही बाजुन #सह्याद्री आणि तीच माणसांची ठेवण त्यामुळे मी अजुनही श्रुंगारपुरात असल्याचे बर्याच वेळा भासते.
लहानपणी शाळेत असतांना आम्ही गावावरती निबंध लिहायचो-
चारही बाजुंनी निसर्ग सौंदर्याने श्रुंगारलेले असे माझे श्रुंगारपुर😘😘😘
डॉ सुशील भालेकर
No comments:
Post a Comment