उटण्याचा नाजूक🍁 सुगंध घेऊन🍁
आली आज पहिली पहाट🍁
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी🍁
उजळेल आयुष्याची वहिवाट !!🍁
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली !
🌺🍀🍁🌸🌼🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो
💐💐💐✨✨💥💥
आपणास व आपल्या परिवारास
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! 😘
💥💥💥💥💥💥💥💥
💐🙏💐🙏💐🙏💐🙏

*नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻
*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा* ..☺🙏

*दिपावली शुभेच्छा*

सस्नेह नमस्कार,

दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...!

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली !.

❗चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती...
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी...
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती...
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती...❗
♨♨♨  दीपावलीच्या हार्दिक  शुभेच्छा. ♨♨♨

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली......!!
हासत, नाचत, गात यावी दीपावली...!!
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,....!!
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्यायावे.......!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे........!!
!! शुभ दीपावली !

Happy Diwali SMS, Happy Dipavali Sms


*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*
    *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते*

*धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*

*ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची  पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!*             
            *या जगात सर्वात...*
           *मोठी संपत्ती "बुध्दी"*
      *सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
      *सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
      *सर्वात चांगले औषध "हसू"*      
        *आणि आश्चर्य म्हणजे हे*
         *"सर्व विनामुल्य आहे".*

दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।

दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।

दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।

दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
. . . . अश्विन आमावस्येला ।।४।।

दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
         (पाडव्याला)  ।।५।।

दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला
         (भाऊबीजेला) ।।६।।

सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची  आणि समृद्धीची जावो.
सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा ....

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय?

१० रूपयाला वडापाव आणी ८ रूपयाला चाय.

आला पाहुणा घरी तर आखडून बसायच पाय.

आणायची १०० रु. किलोचे चिकन नी सांगायचे

... बोकडाच मिळतचं नाय.

अहो पगार कमी सांगुन इज्जत

गमवायची नाय.

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?

सकाळी सकाळी 7:30 वाजता उठायच.

बिना तोंड धुता खिडकित यायच.

शेजारच्या पोरीला collegeला जाताना

हळूच म्हणायच, हाय.

तीने रागात पाहिलं तर,

म्हणायच सुंदर माझी ताय..

मनातल्या मनात एक शिवी घालून बोलायच..

राँग नंबर लागला की काय?

अहो मुंबई मुंबई मुंबई तिथं आहे तरी काय??

रिक्षाची भीड, गल्ली बोलातले रस्ते

बाइक वाल्यांची किर किर,

फेरीवाल्यांची दादागिरी,

सडलेली कोथींबीर,

कच्चा कुच्चा वडापाव,

आणि पानी पुरी खाऊन

पर प्रांतीयांनाच म्हणायचे भाय.

अहो मुंबई मुंबई मुंबई तिथेआहे तरी काय??

पाण्यासाठी पळायच, गॅससाठी रांगा

कामाला जाण्या अगोदरच

फैक्ट्रीचा वाजतो भोंगा.

धावत धावत टाकाव्या लागतात

ट्रेन मधे ढेंगा.

ट्रेन मधल्या गर्दीत

आपण असतो आतमध्ये

आणि बाहेरच लटकतात पाय..

दादा मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय??

काही ही असुद्यात

पण करोडो कुटुंबाची पोशिंदा ती

तीच आमची ताय आणि तीच आमची माय..

आमच्या मुंबईचा आम्हाला अभिमान हाय

आहो मुंबई मुंबई मुंबई म्हणजे आहे तरी काय

गरिबाच पोट आणि दुधावरली साय....😄😊😊

Bonus

एकदा बायको आपल्या नवर्‍याला विचारते,

या जगात वजन,ऊँची ,वेग ,अंतर हे सगळं मोजायला एकक आहे..
.
.
.
.
.
.
जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे मोजतो पण . . ..
.
.
.
.
.
.
प्रेम
.
.
.
.
विश्वास
.
.
.
.
.
.
मैत्री
.
.
.
.
.
.
सुख
.
.

.
.
.
.
दुःखं

.
.
.
.
.
हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण
नाही रे..
.
.
.
.
..
.
असं का असत रे?
?
?
?
?
?
?
?
?
?
तो खुप विचार करतो
😕😕😕😕
.
.
.
.

.
तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो,

अणि म्हणतो" हे
बघ "
.
.
.
.
.
.
.
.

अगोदरच कंपनीत बोनस नाही झालाय.....
त्यात तू डोक खाऊ नको...

नाहितर एकाबुक्कीत दात पाडीन..

😀😆😆😆😆😂

माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं
                  पैसा कमावला तर
          त्याला ठेवायला जागा लागते,
                   तसं पुण्याचं नाही.
      ते दिसत नाही, पण वेळ आली की
         बरोबर समोर उपभोगता येतं.
                           कारण
   कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं

सुप्रभात मित्रांनो
चैत्र  नेसतो सतरा साड्या
वैशाख  ओढतो व-हाडाच्या गाड्या
ज्येष्ठ  बसतो पेरित शेती
आषाढ  धरतो छत्री वरती
श्रावण  लोळे गवतावरती
भाद्रपद  गातो गणेशमहती
आश्विन  कापतो आडवे भात
कार्तिक  बसतो दिवाळी खात
मार्गशीर्ष  घालतो शेकोटीत लाकडे
पौषाच्या  अंगात उबदार कपडे
माघ   करतो झाडी गोळा
फाल्गुन  फिरतो जत्रा सोळा
वर्षाचे महिने असतात बारा
प्रत्येकाची न्यारीच त-हा।।

मराठी महिने शिकवण्यासाठी एक बडबडगीत...

कैद्याला फाशी देण्या पूर्वी सकाळी लवकर ऊठवतात, छान आंघोळ करून, नविन कपडे घालून, आवडीचा नाष्टा करून, काही धार्मिक पठन करून निमंत्रित उपस्थितां समोर फाशी देतात.......

मग. आता मला सांगा..

.
.
..
लग्नात नवरदेवाला ह्या पेक्षा काही वेगळी वागणूक मिळते का??
😜😄😄😄😄

अवश्य वाचा🙏🏼

एक 6 वर्षाचा मुलगा आपल्या 4 वर्षाच्या लहान बहिणीसोबत बाजारातून जात असतो. अचानक त्याला जाणवते की त्याची बहीण मागे राहिली आहे.

तो थांबतो व मागे वळून पाहतो तर त्याला दिसते की, त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून अतिशय कुतूहलाने काहीतरी पहात आहे.

तो मुलगा मागे जातो व तिला विचारतो, "तुला काही हवे आहे का?" ती एका बाहुलीकडे बोट दाखविते. तो मुलगा तिचा हात धरतो व एका जबाबदार मोठ्या भावा प्रमाणे तिला ती बाहुली देतो. ती बहीण अत्यानंदीत होते....

हे सर्व तो दुकानदार पहात असतो व त्या मुलाचे प्रगल्भ  वागणे पाहून आश्चर्यचकित होतो.....

आता तो मुलगा काउंटर कडे येतो व त्या दुकानदाराला विचारतो "सर, किती किंमत आहे या बाहुलीची?"

दुकानदार एक शांत माणूस असतो व त्याने जीवनाचे अनेक चढ उतार पाहिलेले असतात. तो त्या मुलाला प्रेमाने व आपुलकीने  विचारतो " बोल तू काय देशील ?"

मुलगा आपल्या खिशातील सर्व शिंपले जे त्याने व त्याच्या बहिणीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावर गोळा केलेले असतात ते बाहेर काढतो व दुकानदाराला देतो. दुकानदार ते घेतो व जणूकाही पैसे मोजत आहे या अविर्भावात मोजायला सुरु करतो. शिंपले मोजून झाल्यावर त्या मुलाकडे पाहताच मुलगा म्हणतो " कमी आहेत का ?"
दुकानदार म्हणतो " नाही नाही, हे बाहुलीच्या किमतीपेक्षा जास्त आहेत.  ज्यादाचे मी परत करतो. असे म्हणून तो केवळ 4 शिंपले घेतो व बाकी सर्व शिंपले त्याला परत करतो.
मुलगा एकदम आनंदात ते शिंपले आपल्या खिशात ठेवतो व बहिणीसोबत निघून जातो.

हे सर्व त्या दुकानातील कामगार पहात होता व त्याने आश्चर्याने मालकाला विचारले, " मालक ! इतकी महागडी बाहुली तुम्ही केवळ 4 शिंपल्यांच्या मोबदल्यात दिलीत ?"

दुकानदार एक स्मित हास्य करीत म्हणाला,
"आपल्यासाठी हि केवळ शिंपले आहेत. पण, त्या मुलासाठी हि शिंपले अतिशय मौल्यवान आहेत. आणि आत्ता या वयात त्याला नाही समजणार पैसे काय असतात. पण जेंव्हा तो मोठा होईल ना, तेंव्हा नक्कीच समजेल. आणि जेंव्हा त्याला आठवेल कि आपण पैश्यांच्या ऐवजी शिंपल्यांच्या मोबदल्यात बाहुली खरेदी केली होती, तेंव्हा त्याला माझी आठवण होईल आणि तो हा विचार करेल कि हे विश्व चांगल्या माणसांनी भरलेले आहे.

हि गोष्ट त्याच्यातील सकारात्मक दृष्टीकोन वाढण्यासाठी मदतीची ठरेल आणि तो सुद्धा चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित होईल.......😊

Newton Che new Niyam

$असे काही नियम, जे न्यूटन सुद्धा सांगू शकला नाही $
               नियम 1
जर ब्रेड तुमच्या हातातातून सुटला तर तो जमिनीवर त्याच बाजूला पडतो,

ज्या बाजूला "जाम" किव्हा "बटर" लावलेले असते,
😅😂😜😝

     (न्यूटन चा भाओजी)

नियम 2
जेव्हा तुमचे हात ग्रीस किव्हा पिठाने भरलेले असतात,
तेव्हाच तुमच्या नाकाला अचानक "खाज" सुरु होते.
😝😂😝😂

      (न्यूटन चे काका)

नियम 3
जेव्हापण तुम्ही कुठला Worng Number डायल करता,📞
तेव्हा तो कधीच Busy/Engage लागत नाही.....
📱📲
😬😁😬😁
         (न्यूटन चे मामाश्री)

नियम 4
WhatsApp वर जेव्हा कुठला फ़ोटो चुकीच्या ग्रुप मधे पोस्ट होतो तेव्हा,
नेट एकदम फ़ास्ट चालत असते.
📡📡📡📡📡📡📡
तुमच्या लाख प्रयत्ना नंतर सुद्धा तो मेसेज सेंड होतोच,
आणि जेव्हा Urjent मेसेज पाठवायचा असतो तेव्हा नेट कासवाच्या गतीने चालते.
🐢🐢🐢🐢🐢
😂😅😜😝
        (न्यूटन चा मुलगा)

नियम 5
जेव्हा पेट्रोल पंप वर तुम्ही
  30 रुपयाचे
पेट्रोल भरण्यासाठी उभे असता,
        तेव्हाच तुमच्या शेजारी एखादी,
💃� हॉट मुलगी येऊन थांबलेली असते......||
😂😅😂😅
         (न्यूटन चा भाऊ)

नियम 6
जेव्हा तुम्ही एखाद्या रांगेतील गर्दी पाहुन दुसऱ्या रांगेत जाता,
🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻🚶🏻
तेव्हाच ती पहिली वाली रांग पटापट पुढे जाते.......
🏃🏻🏃🏻🏃🏻
😜😝😜😝
       (न्यूटन ची आज्जी)

नियम 7
जेव्हा तुम्ही दुसरयान्ना सोडवायला बस स्टोप वर जाता🚌🚌🚌
तेव्हाच सुंदर मुली गावाला जात असतात...💃💃�💃�💃�....
😜😝😜😝
       (न्यूटन च्या बायकोचा चुलत भाऊ)

Bonus Kavita

💵💴💶💷💰💳💵💴💶

न झालेल्या बोनसमुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता....
       
(पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास)

👚👗👕
"लाडके" कशासाठी गं तू
नवे नवे "कपडे" शिवतेस?
अगं.. जुन्या साड्यांमध्ये
तर तू "अप्सरा" दिसतेस!

              💄👡💇
               ब्यूटी पार्लरच्या चक्रात
               खरोखर तू पडू नकोस
               चंद्रासारख्या सुंदर शीतल
               चेहऱ्याला तू कुठलीही
               क्रीम लेपू  नकोस!

🍎🍊🍏
अगं सफरचंदासारखे
गुटगुटीत गोरे गाल तुझे
पावडर क्रीमची गरज काय
एकदा सखे ऐक माझे!

               🍲🍛🍪
               हॉटेलच्या जेवणामध्ये
               अशी कुठली चव आहे?
               तुझ्या हातच्या स्वयंपाका
               राणी "अमृताची" चव आहे!

💃💪🏃
"धुणीभांडी"वाल्यांच्या नादाने
तब्बेत नको खराब करू
हातात झाडू घेवून आता
दोघेही कसे व्यायाम करू!

               💍🏅🔶
               सोने चांदीचे अलंकार
               कुरुपांसाठी बरे आहे
               निसर्गसुंदर रुप तुझे
               सोन्यापेक्षाही खरे आहे!

💶💰💴
"पैसापैसा" करू नकोस
तो तर "मोहलक्ष्मी" आहे
माझ्या घरच्या अंगणाची
तू खरी "धनलक्ष्मी" आहे!

               💁🍆🍅
               जेवणात तीन तीन भाज्या
               काहींची सवयच ही प्यारी
               एकाच तुझ्या भाजीला
               प्रिये चव असते न्यारी!

💰👨‍👩‍👦‍👦🙋
राज्याच्या आर्थिक संसाराचे
शासनाचे तोकडे ग्यान आहे
कमी खर्चात घर चालवण्याचे
तुझ्याकडे खरे ज्ञान आहे

               👹🌸🙂
               नको बोलावू माहेरच्यांना
               हे गाव भुतासारखे काटते
               सुटीत जावू तुझ्या माहेरी
               तिथे स्वर्गासारखे वाटते!

😌☺🙆
कुणा कशाचा तर
कुणा कशाचा अभिमान आहे
बायकोच्या काटकसरीचा
मला खरा स्वाभिमान आहे!

(कवी- न झालेल्या बोनस मुळे वैतागलेला नवरा...)

💴💶💵💸💳💰💷💴💶

*'माझं कोकण' *

आता 'माझं कोकण' पुढे कसं असेल? त्याचं काय होईल? माहित नाही.
दरवर्षी फेरी मारताना, प्रत्येकवेळी ओळखीच्या वाटणाऱ्या खुणा एकेक करत हरवत जात आहेत हे निश्चित.
माणसं बदलली आणि कोकण बदलत चाललंय.
तरीदेखील आपल्या पिढीने जे 'कोकण' बघितलंय, ते पुढच्या पिढीला बघायला मिळेल का?
'कोकण' म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं, तेच चित्र नवीन पिढीसमोर साकारलं जाईल का हे माहिती नाही. पण तसं नसेल तर ते चित्र साकारण्याचा एक अल्पसा प्रयत्न.

*'कोकण'* म्हणजे कौलारू घर,
स्वच्छ अंगण, तुळस व तिला आधार देणारा दिवा.

*'कोकण'* म्हणजे गोठा, साठवून ठेवलेलं गवत आणि गाईच्या भोवती पिंगा घालत असलेलं तिचं वासरू.

*'कोकण'* म्हणजे बाहेरची पडवी, झोपाळा, त्यावर असलेली पानसुपारीची पिशवी, तिरक्या रिपी मारलेल्या खिडक्या.

*'कोकण'* म्हणजे माजघर, एका कोपऱ्यात पडलेलं जातं, आजीने सारवलेली चूल, फुंकून ओलसर
झालेला आईचा चेहरा.

*'कोकण'* म्हणजे देव, महापुरुष, वेतोबा, रवळनाथ, सातमाई, सातेरी, गिरोबा, रामेश्वर, कुणकेश्वर, रत्नेश्वर.

*'कोकण'* म्हणजे कौलारू देवळे, देवळा शेजारून वाहणारी छोटी नदी.

*'कोकण'* म्हणजे गर्द देवराई,
त्यात नाहीशी होणारी देवाची वाट आणि वेशीवर दिलेला नारळ.

*'कोकण'* म्हणजे घुमत असलेले ढोल, येणारी देवीची पालखी, तीला तोरण बांधण्यासाठी घरातल्यांची घाई.

*'कोकण'* म्हणजे देवचार, त्याच्या चपलांचा आवाज, मनात असलेली भीती, वाडवडिलांची पुण्याई

*'कोकण'* म्हणजे लाल माती, मोहरत असलेला आंबा, फणस आणि डोलणारी माडा-पोफळीची झाडं.

*'कोकण'* म्हणजे सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी आणि मोरी माश्याचं कालवण.

*'कोकण'* म्हणजे चुलीवर भाजला जात असलेला बांगडा, भाकरी, आणि कांद्या-गोलम्याचा ठेचा.

*'कोकण'* म्हणजे उकड्या तांदळाची पेज, उकडलेल्या अठळा आणि फणसा-केळफुलाची भाजी.

*'कोकण'* म्हणजे भात, कैरी घातलेली डाळ, घावणे आणि वाटण घातलेली उसळ.

*'कोकण'* म्हणजे तळलेली सांडगी, कांडलेली पिठी, सुकत असलेली आंब्याची साठ आणि मुरत असलेलं लोणचं.

*'कोकण'* म्हणजे नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि कोपऱ्यात पुढे सरकत असलेला नांगर.

*'कोकण'* म्हणजे पेप्सी खात जाणारी पोरं, डांबरी रस्ता, पत्र्याचा पूल आणि खालून वाहणारा व्हाळ.

*'कोकण'* म्हणजे लाल डब्याची एस्.टी., धुरळा आणि नातवांची वाट बघत स्टॉपवर उभे असलेले आजोबा.

मैत्रीवर एक छान वाक्य,👌
"वय" आणि "जीवन" यांच्यात फक्त इतकाच फरक आहे...
जे मित्रांविना सरते ते
"वय" आणि ,
जे मित्रांबरोबर सरते ते "जीवन"
🙏अशीच साथ राहु दया🙏

सत्याच्या वाटेवर स्वप्न
तुटून जातात,🌺
निसर्ग बदलला कि फुले
सुकून जातात..!🌺
मनापासून आठवण काढली आहे
तुमची,🌺
पुन्हा म्हणू नका आपली माणसे  🌺
विसरून जातात...

प्रत्तेक पहाटेची किरणे काहीतरी आठवण काढतात,
प्रत्तेक फुलाच्या सुगंधात एक जादू असते,
जीवन किती ही चांगले असो वा नसो,
पण सकाळ सकाळी आपल्या माणसांच्या आठवणी येतात..

जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात... 

              या जगात सर्वात...
           मोठी संपत्ती "बुध्दी"
      सर्वात चांगल हत्यार "धैर्य"
      सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"
      सर्वात चांगले औषध "हसू"    
  आणि आश्चर्य म्हणजे हे "सर्व विनामुल्य आहे".

जीवन आहे एक रम्य पहाट, संकटांनी गजबजलेली एक वादळवाट,

सोनेरी क्षणांची एक आठवण,
सुख दुःखाची गोड साठवण,

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता,
नात्यांच्या अतुट शब्दांनी  गुफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडच  जगावेगळ गाव,
यालाच तर आहे "आयुष्य" हे नाव.ll

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा. नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.
अगरबत्ती देवासाठी हवी असते म्हणून विकत आणतात पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.


यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण गगन भरारी मारत असतो
तेंव्हा पृथ्वीवर दोन आतूर डोळे  सर्व जग विसरून आपल्याकडे पहात असतात
ते दोन डोळे म्हणजे आपले आई-वडील...
 

सतत आनंदी राहण्यासाठी. . .

🙏  हॅपी थाॅट्स 🙏 ✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* आज दिवसभर काहीतरी चांगलं घडणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच-दहा वेळा मनाशी म्हणा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फूल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* आवडते गाणे पुन: पुन्हा ऐका व गुणगुणत राहा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या. दीर्घ श्वसन करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्या चेहर्याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* एखादी बाग, देऊळ, नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत 10-15 मिनिटे घालवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* नकारात्मक शब्दांचा वापर पूर्णपणे टाळून उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चार वर्षांचे बालक दिवसात साधारणत:500 वेळा हसत असते तर एव्हरेज मनुष्य जेमतेम 15 वेळा. यामुळे स्ट्रेस वाढत जातो. याकरिता अधिकाधिक आनंद व्यक्तकरण्याची संधी निर्माण करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* शरीरातील 83 टक्के संवेदना या डोळ्यांच्या माध्यमातून होत असपतात. याकरिता भोवतालाचे वातावरण प्रसन्नपूर्वक व प्रकाशयुक्त ठेवा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* रिकामे मन सैतानाचे घर असते. त्याकरिता स्वत:ला आवडत्या छंदामध्ये गुंतवा. सतत काहीतरी करत राहा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* संगीतामध्ये उत्साह जागृत करण्याची शक्ती आहे. रोजचे काम करताना आवडीचे संगीत बॅकग्राऊंडला चालू असू द्या.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* चिडचिडेपणा, डोक्याला आठ्या पाडणारा स्वभाव उखडून टाका. मनाला सतत शांत व प्रसन्न राहण्याची सूचना करा.
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
* विनोदाला जीवनात महत्त्वाचे स्थान द्या. कोणत्याही वातावरणात मोकळेपणा आणण्यास तो मदतगार ठरतो.

खतरनाक प्रपोज 😄 & खतरनाक उत्तर 😄

खतरनाक प्रपोज 😄
.
.
तू_माझी नसली,
😔😔😔
तरी मी तुझा आहे....
😘😘😘😘😘
कारण
😉😉😉😉
तु भारतात आहे....
आणि_भारत_माझा_आहे
😜😝😝😝😝😝
विषय संपला.😎
जय हिंद








खतरनाक उत्तर 😄
.
.
तू जरी मला बहिण मानत नसला
😔😔😔
तरी मी तुझी बहिण आहे....
😘😘😘😘😘
कारण
😉😉😉😉
तु भारतात आहे....
आणि_सारे_भारतीय_माझे_ बांधव_आहे
😜😝😝😝😝😝
विषय संपला.😎
जय हिंद भावा

Marathi Jokes Collection

बासुंदि चा full form सापडला......... .!
.
.
.
"बायको सुंदर दिसते "
👌👌
टीप - स्वतःची का दुसऱ्याची हा मात्र वादाचा विषय असू शकतो 😂



लंगड्या दादा लंगड्या दादा
आर्ची ताई म्हणती आर्ची ताई म्हणती
त्या दिवशी मंग्या च्या विहिरि वर
कोणती साबन लाऊंन आलता??

लई मोठा फेस केलता😳

लंगड्या- पतंजलि

डील : या वेळी नापास झाला तर मला यापुढे बाबा म्हणून हाक मारू
नकोस.(परंपरेनुसार आपला मंग्या यंदाही नापास झाला).
वडील : काय लागला
निकाल?
मंग्या : माफ कर रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारणं बहुतेक नशिबात नाही
रे माझ्या..

प्रेमात रस नाय,
रापणिक मासो नाय,
जावचा होता पैसो कमवक अमेरिकेत,
पण......
शिरा पडली ती,
मालवणातसुन बस
नाय.........!!




Excellent Thoughts in Marathi

आयुष्यात स्वत:ला कधी 'उध्वस्त' होऊ देऊ नका..कारण लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत..
संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की....जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..!

  कडू औषध आपण
लगेच गिळून टाकतो
   पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले
   वाईट क्षण लगेच विसरा
 आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!

       हळवी असतात मने
       जी शब्दांनी मोडली जातात.  
       अन शब्द असतात जादूगार
      ज्याने माणसे जोडली जातात

काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावेसे वाटतात.
काही नाती असतातचं एवढी गोड की,
ती कधीच संपू नयेत असचं वाटतं.
आणि काही माणसं असतातचं अशी की,
ती नेहमी "आपलीचं" असावीत असचं वाटतं, अगदी शेवटपर्यत...!!

"आई" म्हणजे भेटीला आलेला देव,
"पत्नी" म्हणजे देवाने दिलेली भेट...
आणि "मित्र" म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट....
खरी "मैत्री" ही "हात" आणि "डोळया" सारखी असावी...
हाताला इजा झाली की डोळ्यांत पाणी येते, आणि
डोळ्यात पाणी आले तर हात लगेच डोळे पुसतो 🌿

आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे
आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे.
जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही,
परंतु एक वडीलच असे आहेत 
की,जे आपल्या मुलाला
आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.

वाटीभर शिरा समोर बघितला अन लक्षात आलं. त्यात रवा, काजू, बदाम सगळंच दिसत होतं पण ज्यामुळे तो शिरा गोड लागतो ती साखर कुठे दिसली नाही.
काही अंशी आपलं एखाद्याच्या आयुष्यातलं अस्तित्व असच असावं
दिसत नसलं तरी गोडवा आणि आपुलकीमुळे जीवनाला पूर्णत्व मिळत.

शांत स्वभावाचा माणूस
         हा कधीही कमजोर नसतो...
        कारण या जगात पाण्यापेक्षा
           मऊ असे काहीच नाही...
   पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
    भले भले डोंगर हि फोडून निघतात...
    माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
        तो पैसा कमविण्यात नाही.

          " जीवन आहे
          तेथे आठवण आहे."

            "आठवण आहे
           तेथे भावना आहे."

             "भावना आहे
             तेथे मैत्री आहे."

            आणि मैत्री आहे
     तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!

प्रेम सुंदर आहे" कारण ते
हृदयाची काळजी घेते
पण
"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"
कारण
मैत्री दुसर्यांच्या हृदयाची
काळजी घेते....👌�👌�👌�
🙏 शुभ सकाळ 🙏

*कसं जगावं..?  🙄🙄🙄*  😬😜

*मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती. त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही..🤕🤕*
*श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबर करत असणार.. त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं..? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय. झालो का श्रीमंत..?👳🏼👳🏼*

*पैशाच्या मागे धावू लागला की म्हणतात, पैशाची हाव सुटली आहे.. 💵💴🏃🏽*
*पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात काही महत्वाकांक्षाच नाही..! 😮😮*

*नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले, तर कवडी चुंबक म्हणतात.*
*चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच, उधळ्या म्हणतात.🤗🤗*

*वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा..! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात..?😴😴*

*आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा..? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं..?🚶🏼🚶🏽*

*जास्त भाविक असला तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..🙂🙂*
*आणि मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.👺👺*

*तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. 🗣🗣*
*दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक..?💂🏼💂🏼*

*मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ🕷 म्हणतात. जाड असला की हत्ती 🐘 म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.🙁🙁 जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो..!👹👹*

*सहज कोणाला मदत केली तर म्हणतात, यामागे नक्कीच काहीतरी हेतू असणार.*
*नाही मदत केली तर म्हणणार, साधी माणूसकी नाही बघा..😱😱*

*सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात, अंगात थोडातरी स्वार्थ हवा.👨🏻👨🏻*
*स्वार्थी असलाच तर म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ हवा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची..?🤓🤓*

*खेळकर स्वभाव असला तर म्हणतात, आचरट आहे. परिस्थितीचं गांभीर्य नाही. 😏😏*
*आणि गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे याला. कोण जवळ येईल याच्या..!😂😂*

*तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.💁🏼💁🏼*
*अयशस्वी झालात तर म्हणणार, आमचं ऐकलं नाही. मग भोगा कर्माची फळं..!🙇🏻🙇🏼*

*लोकांचं काय घेऊन बसलात..? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची त्यांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं..?*  *जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं..?🤔🤔*

*मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय..*
*फिदीफिदी हसतील ते हसू देत की.. बोटं मोडीत बसतील ते बसू देत की..!*
*आपण का शरमून जायचं..?*
*कशासाठी वरमून जायचं?*
*कशासाठी भयाने ग्रासून जायचं..?*
*फुलायच्या प्रत्येक क्षणी कशाला* *नासून जायचं..?*
*आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं..*
*कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत, हे आपणच ठरवायचं..!* plz read