Showing posts with label शहीद दिन. Show all posts
Showing posts with label शहीद दिन. Show all posts

(२३ मार्च १९३१) शहीद दिन...

फाशीवर चढवताना एक सरदार
भगतसिंगांना म्हणतो...
" माझ्याजवळ धर्मग्रंथ आहे. आता तरी
काहीतरी वाच..."
.
त्यावर भगतसिंग म्हणतात...
.
". . आज, यावेळी जर मी प्रार्थना केली तर
तुमचा देव मला भिञा म्हणेल. मी संपूर्ण
आयुष्यात कधीही प्रार्थना केली नाही. ती
मी आज केली तर तो म्हणेल की हा
भितीपोटी प्रार्थना करतो आहे कारण
आजवर मी तसा जगलो आहे. माझ्यावर कुणी
असा आरोप करणार नाही की जन्मभर मी
नास्तिक राहिलो, पण अखेरच्या वेळी
भितीपोटी आस्तिक झालो.
उद्दिष्टासाठी मरणे नव्हे, तर
उद्दिष्टासाठी जगणे आणि ते देखील
लाभदायक होईल अशा योग्य पध्दतीने जगणे
हा सर्वांसाठी प्रेरणादायी आदर्श
असायला हवा..."
.
. . या देशातील तरूणांनी शहीदे आजम
भगतसिंह यांचा आदर्श घ्यावा... डॉ.
बाबासाहेबांचे विचार घ्यावेत... सत्यशोधक
महात्मा फुलेंचा विद्रोह घ्यावा... राजर्षी
छ. शाहू महाराज व महाराजा सयाजीराव
गायकवाड यांची सर्वसमावेशकता घ्यावी,
शंभूराजेंचा बाणेदारपणा व करारीपणा
घ्यावा... शिवरायांचा स्वातंत्र्यवादी
आणि माणसाला माणूस म्हणून बघण्याचा
दृष्टिकोण घ्यावा, भारताचे भवितव्य
नक्कीच उज्वल आहे...☆
.
(२३ मार्च १९३१) शहीद दिन...
. . विद्यार्थी व तरूणांचे प्रेरणास्थान...
क्रांतीवीर... भगतसिंग, सुखदेव, राजगुरू...
यांच्या स्मृतीस...