अनंत चतुर्थीचा दिवस होता त्या दिवशी ऑफिस असल्यामुळे सकाळपासून चीड चीड चालू होती माझी मला त्या दिवशी सुट्टी हवी होती कारण बाप्पा चालले होते.
मी विचार करत होतो  बॉस ला सांगून लवकर निघूयात पण दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना तस झालं त्या दिवशी बॉस ने माझ्यावर एक जबाबदारी टाकली आणि माझ्या वाटेला  नाहुर ते कंजूरमार्ग अशी मला पायपीट करावी लागली. आणि त्या दिवशी नेमका पाऊस होताच सोबतीला, मनातून कोसत होतो माझ्या नशिबाला काय हा जॉब काय हि फिरफिर देवाला विचारात होतो मनातून काय हे देवा काय असा जॉब दिलास थोडाही शांती नाही जिथे कसतरी काम संपवून मी घरी आलो. तर घरी आलो तर प्रचंड भूक लागली होती आणि मनातून नशिबाला दोष देणे चालूच होते, कदाचित त्या दिवशी बाप्पा ने माझं ते बोलणं ऐकलं असावं असाच वाटत. मी भूक लागली म्हंजन जेवायला बसलो मस्त पराठे केले होते आईने भूक लागली होती म्हणून तुटून पडलो जेवणावर जेवत असताना एकदम दारावरची बेल वाजली वैतागलो जेवताना उठाव लागेल म्हणून मी उठलो दार उघडलं तर समोर एक म्हातारी व्यक्ती माझ्या बँकेचं कुरिअर घेऊन आली होती साधारण त्यांचं वय 60किंवा 65 घरातलं वाटत होत त्यांनी मला ते कुरियर दिल, आणि मला म्हटले बाळ थोडं पाणी दे त्याच्याकडे बघून वाटत होत कि ते थकलेलं आहेत मी पाणी दिल ते म्हटले बाळ चहासाठी पैसे असतील तर देऊ शकतोस का पहिलेच त्यांना बघून मला कसतरी झालं होतं हे म्हटल्यावर मला अजूनच कसतरी झालं पाकीट घेतलं आणि 50 नोट त्यांना दिली विचार होता चहाबरोबर काही खातील हि ते उतरायला लागलेत उतरताना त्यांचे पाय थरथरत होते त्यांना उतरायला हि नीट जमत नव्हतं ते बघून माझं मनही तेवढ्याच जोरात थरथर झाली . प्रचंड वाईट वाटलं एवढा वेळ मी स्वतःच्या नशिबाला किती दोष देत होतो काय माझ जीवन म्हणून पण जेव्हा ती वृद्धद व्यक्ती बघितली तर माझी बोलती बंदच झाली हे हि दिवसभर फिरले असतील वय बघावं तर माझ्यपेक्सा 30,35 वर्ष सहज मोठे असतील मग ह्या माणसाने काय तक्रार करावी कोणाकडे करावी दिवसभर फिरताना मी सामोसा पाव तवा पुलाव आणि मग संध्याकाळी ते पराठे एवढं सगळं खाऊन माझ्या नशिबाला दोष देत होतो आणि ती वृद्धद व्यक्ती फक्त चहासाठी माझ्यासमोर लाचार झाली होती ते जात असताना त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून काही प्रश्न पडलेत
सुखी कोण ते का मी?
नशीब कोणच चांगलं माझं का त्यांचं??
ह्या वयात हि व्यक्ती का काम करते आहे ??
आणि मग त्या दिवशी कळलं कोणीतरी म्हटलं आहे ना तुम्ही जे जीवन जगत असतात ते लाखो लोकांचं स्वप्न असत ते मनोमन पटलं. बाप्पा ने जात जात माझे डोळे उघडले
बाळ हेय जीवन आहे चढ उतार येणार फक्त जगात राहा लढत रहा बाकी मी आहे सांभाळायला त्या वृद्ध व्यक्तीच्या स्वरूपात त्या दिवशी बाप्पा च आला होता.
आता नशिबाला दोष देण्यापेझा मला काय करायचं आहे ते कळलं होतं.
पण एक कळलं सुखी तू का मी हा प्रश्न नसतो फक्त आपण कशे जगतो त्यावर सुखाची व्याख्या होत असते.
बाप्पा तुझे आभारी डोळे उघडल्याबद्दल
😊गणपती बाप्पा मोरया😊
😊मंगल मूर्ती मोरया😊

No comments:

Post a Comment