*** शब्दांचा खेळ ***

गरीब माणुस दारु पितो,
मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात !

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते !

गरीब माणुस करतो ते लफडं,
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर !

शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते,
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते,
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते...!!!!

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं...!

स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शोधायचं,

डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जोपासून सुसंस्कृत व्हायचे,

आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा.

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!

What's Up वर स्वता:च मनोरंजन करायचं .......का आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं.,

जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच,

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!

तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.

मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची...का निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे.

जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.

आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं....!!!!!!!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment