मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!

बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..

पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....

खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं!  *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...* 

"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ."  अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...

अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?

उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...

माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची  वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??

*आणि हो..* सुनेनेही आपल्या सासुबाईला आईसारखे मानावे.. त्यांच्या बोलण्यामागेही मुलाचे व कुटुंबाचे भले व्हावे हीच अपेक्षा असते..

*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*

- एक सासुबाई

*BABA*

लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
१ शेअर बाबांसाठी.👍🙏❤

पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

*वेडी ही बहीणीची माया*.....

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.
जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा...

माणसांच्या गर्दीत
हरवून बसला माझा भाऊ
सांगा ना त्याला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

एकुलता एक दादा
त्याला जिवापाड जपला
लग्न झाल्या पासून
वाहिनी च्या पदरा आड लपला
एक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ
सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ......

नको दादा साडी मला
नको पैसा पाणी
तुझ्या सूखा साठीच
देवा ला करते विनवणी
सांग तुला कोणत्या रंगाचा  शर्ट घेऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ....

काम गेलं तुझ्या दाजीचं
म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते
तळ हातावरले फोड बघून
तूझी आठवण येते
दादा चढउतार होतात जीवनात
तू घाबरुन नको जाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

उचलत नाहीस फोन म्हणून
वहीनीला केला
Wrong नम्बर करत
कट त्यांनी केला
नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ...

आई बाबा सोडून गेले
घर पोरकं झालं
आठवणींचे आभाळ
डोळ्यामधी आले
वाईट वाटते शेजारी येतात  जेव्हा त्यांचे भाऊ
सांग ना तुला
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ....

नको मला जमीन
नको घराची वाटणी
आवडीने खाईन
भाकरी आणि चटणी
काकूळती ला आला जीव
मनात राग नको ठेऊ
दादा सांग ना रे
भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ .....
😔😔😔😔
आवडली तर नक्की शेयर करा
....🙏 कवयित्री   बहिनाबाई चौधरी)

Hasa Pot Bharun...

पोट धरून हसा..

दत्तुचि आई :  वीस वर्ष मला             
           काहीच मुलबाळ नव्हतं .

गन्याची आई : अगं बाई गं !
           मग काय केल हो तुम्ही ?

दत्तुचि आई : काही नाही !
          मग मी २१ वर्षाची झाले ,
         बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!!
😜😜😜

नदी किनारी जोडपे बसलेलेे असते

प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे

प्रियकर : तोच ग ....

२५पैसा १ मिनीट

प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच

😆😎😎😏😏😁
 
पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला...
.
.
तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥

Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा  😂💪🙆🏻😃😃😃
😆😆😆😆😆😜
सरदार इंटरव्यू देने गया,
बॉस ने पूछा तुम कितने भाई बहन हो
सरदार: 5
बॉस: उन में तुम्हारा नंबर कौनसा है ?

सरदार: एयरटेल
😂😂😂😂😂😂😂

लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक

आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय

लागली का सवय ?

याला म्हणतात Control. 😂😝😆😂😂😂

खुलता कळी खुलेना....
आमचा बोनस काय मनासारखा मिळेना
.
.
वैतागलेला कामगार
😄😄😄

बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही .
एक वैतागलेली काळी परी
😂😂😂😂😂😂😂😂😂

😀 एक भयंकर जोक 😀

प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार...

प्रेयसी - का ?

प्रियकर - घरचे विरोध करतात...

प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ?

प्रियकर - बायको आणि दोन मुले...

😜😂😝😜

बर झाले ‪
‎लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये

नाही तर

‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎
बिनलग्नाचे‬ मेले असते
😂😂😂😂😂😂😂

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते.  तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते.,

बहिण : मुलगा कसा आहे?

भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला
फिल्मचा हिरो वाटतो....

बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺

भाऊ : "फँड्री
😜😝😜😜😜😜😜

मानलेली बहीण,
मानलेला भाऊ,
मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,
ही मानलेली नाती चालतात....

तर मानलेली " बायको " यात काय
प्रॉब्लेम?
😝😝
भावाचा मित्र भावासारखा असतो
बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी
..................
तर बायकोची मैत्रीण
बायकोसारखी का नाही ??
हरी ओम् 😝😝

😝😉😜
☺☺☺😝😝😝😝
.😝😝😝

नविन आहे बाजारात. फेका दुसरी कडे😉😉😉😉
  जो येतो तो ग्रुप हालवतो

जो येतो तो ग्रुप हालवतो


च्यायला आता मी ग्रुपच
अम्बुजा सीमेंट चा बनवतो.
😂😂😜😜😛😛😝😝😄

एगदा सर बंड्याला प्रश्न विचारतात      सर :  कॉस थिटा ÷ साईन थिटा =?







बंड्या : पणदूर तिट्टा
😜😜😜😜

त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.
ज्या,
सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या

" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना??

👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈
😝😝😝😝😡😡😡

गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू.

बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..!


😳😨😱😃😄😆😝

मार्टिन ल्युथर किंगने सांगितले
"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.
पळू शकत नसाल तर चाला.
चालू शकत नसाल तर रांगा.
पण पुढे सरकत राहा."
.
.
एका मालवणी माणसाने विचारले,

.

"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा?
😂😂😂

पोरगी पोरग्याला:

"तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके...? 😁




पोरगं लाजून... ☺

"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"
😌😊😁😂😂😂😂

उपकार

💐खुप छानआहे नक्कीवाचा💐   

            *बोधकथा*

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया  आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली

*"उपकार पण वाघासारख्यावर करावेत, उंदरा सारख्यावर नाही. कारण असे लोक नेहमी कामापूरते असून आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याया मिळाला कि ,सच्च्या व प्रमाणिक माणसाला ते विसरण्यातच त्यांची स्वभाव धन्यता मानतात आणि बहादूर लोक उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात"*
👏👏👏👏👏👏
_

New Marathi Jokes

Teacher :-१८६९ मध्ये काय झाले ??.....

रमेश  :- गांधीजींचा जन्म ...

Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली. ..

Teacher :-   सुरेश  तु सांग १८७२ मध्ये काय झाले .... .

सुरेश  :-  गांधीजी ३ वर्षाचे झाले...मी पण बसुका ..😜😜😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂

एका कैद्याला फाशी देण्यापूर्वी
जेलर : एखादी अंतिम इच्छा
आहे काय?
कैदी: आहे ना. मला फाशी देताना
माझे डोके खाली आणि
पाय वर ठेवा!
😝😝😝😝😝
जेलर झेंडा घेऊन पंढरपुरकडे रवाना
😆😆😆😆

गुरुजी :गण्या ,  दालचिनी को मराठी
मे क्या कहते है?
.
.
.
.
.
.
गण्या  : सर, दालचिनी को मराठी
मे ‪"वरणसाखर"‬ कहते है।
😉😜😂😂😂
गुरुजी जागे वर कोमात
😜😜😜😜😜😜😜😜😜

kAvi is BacK
😉😂     आर्ची आणि परशा 
            जाते है शाळा 😢😯

😉😁😀शाळा मे आर्ची ला
                        लगता परशाचा लळा😐😯😃😄

😬😑😬     बादमे आर्ची दिखाती
        अपना मळा 😐😯😃

  😬😑😉   शेवटको क्यु काटते
           दोनोका गळा😉😂

     😉😑😯😑     ये बघके डोळे मे पाणी
                      आता है घळा घळा 😐😅😐😴

👨गुरुजी: पाण्यात राहणारे पाच जीव सांग..? ?
😮बंडू: मासा...

😊गुरुजी: छान !
अजुन चार नाव सांग...
.
.
.
😎बंडू: माश्याची आई , वडील , बहीण , भाऊ

😱गुरूजींनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केली..😱
😜😜😜😜😂😜

मास्तर:
1)त्याने भांडी घासली.
2)त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे?

बंड्या:
पहील्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे.
आणि
दुस-या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.

मास्तरचे डोळे भरुन आले..!!!!
😆😆😆😆😂😂😂😂😂

नवरा आपल्या नाराज बायकोच्या माहेरी दररोज फोन करत असतो ☎.
 
*सासू* - किती वेळा सांगितले की, ती आता तुमच्याकड़े येणार नाही म्हणून.
  मग दररोज फोन का करता ?
 
*जावई* - ऐकून छान वाटत म्हणुन .....
😂😂😂😂😂 
😜😜😜

*"बघून घेईन"*😡म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा

*"घेऊन बघतो "* म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा....🍺🍺

😝

बायका नवऱ्याला
'थोडं जेवून घेता का ?' 
ऐवजी
"थोडी घेऊन, जेवता का ?"
असं म्हणाल्या तर  नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !!
😜😜😜😜😝😝

एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून  स्वच्छ करून  देत होत्या!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜

😬😬😬

एका पार्टीमध्ये दोन महिला💁🏻🙆🏻 एकमेकीना अजिबात सोडत नव्हत्या.

अगदी बसायला खुर्च्या देखील शेजारीशेजारीच पकडायच्या.
कहर म्हणजे, एक खुर्चीत बसू लागली की दुसरी तत्परतेने तिची खुर्ची पुसून  स्वच्छ करून  देत होत्या!

हे पाहून जमलेले सर्व जण
खूप आश्चर्यचकित झाले.
किती प्रेम हे!!!

नंतर एकाने खोलात जाऊन चौकशी केली तर असे समजले की,

त्या दोघी *नणंद-भावजया* होत्या आणि एकमेकींच्या साड्या नेसल्या होत्या. आपली साडी मळू नये म्हणून सारा आटापिटा चालला होता!!😜

😬😬😬

भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला:-
"मुलांनो पृथ्वी का फिरते?"
.
.
एक कारट लगेच उभ राहिल न म्हणाल...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
"बाई जरा खात पीत जावा!!!
तुम्हाला चक्कर आली असेल..."😝😝😝😝😝

पूल आणि भींत दोन्ही बनवायला
एक सारखाच साहित्य लागत

पण पुल लोकांना जोडायच काम करतो..,
                 आणि
भिंत वेगळ करायच काम करते ..

मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखच बनवलय..,
पण कोण कस "आचरण " करत हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे .
     🍂🍃शुभसकाळ🍃🍂

नातं म्हणजे काय ?
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss"
आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय"
दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे"
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते"
पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल"
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला.

असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी पायानेच आलाय. ती काही बोलली नाही. मात्र पोस्टमन गेल्यावर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे "दिवाळी पोस्त" (म्हणजे बक्षिशी) मागण्याची सुरुवात केली. अनेकांनी त्याला बक्षिशी दिली. असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला. हिच्याकडे काय बक्षिशी मागणार ? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे. पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने तिला आवाज दिला. मुलीने दार उघडले. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून बक्षिशी आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघडा"
घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला. आणि म्हणाला, " मला फंडातून  कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला," अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?
पोस्टमन म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."
साहेब : "पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे. जयपूर फूट कुणासाठी?
पोस्टमन : "साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने ना का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे.

साहेबासह सर्व स्टाफ निशब्द !! सारेच गहिवरलेले!!

नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागते. ती ज्याच्या अंगी, (मग भले ही तो कुटुंबातला नसला तरी) तो आपला नातेवाईक मानायला हरकत नाही !!

Hsc and SSC Exam Timetables 2017

🚺 *दहावीचे वेळापत्रक* 🚺
तारीख वेळ विषय

७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
९ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - हिंदी
११ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इंग्रजी
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - बीजगणित
१६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूमिती
१८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - १
२० मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - विज्ञान - २
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - इतिहास
२५ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १ - भूगोल

🚺 *बारावीचे वेळापत्रक*🚺
तारीख वेळ विषय

२८ फेब्रु सकाळी ११ ते दुपारी २ इंग्रजी
२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - मराठी
४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भौतिकशास्त्र
६ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - गणित
८ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - रसायनशास्त्र
१० मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - जीवशास्त्र
१४ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - इतिहास
१७ मार्च - सकाळी ११ ते दुपारी २ - भूगोल
२० मार्च -११ ते १.३० आयटी (शिक्षणशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१
२२ मार्च - सकाळी ११ ते दुपारी १.३० आयटी (ग्रंथलाय व माहितीशास्त्र प्रविष्ट परीक्षार्थी वगळून ) आणि इतर ‍व्यावसायिक विषय पेपर -१

HSC SSC EXAM TIMETABLE 2017