पु. ल. म्हणतात -

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो...

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो...बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो...

माणूस अपयशाला भीत नाही...अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते...

रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही, त्याचा त्रास होतो...
पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो...

सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही...

कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे...

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते... तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं...

आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय...

ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते...

आयुष्य फार सुंदर आहे...
ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे...💞💞
🌺🌺🌺🌺
🌹🌺🙏🏻शुभ सकाळ🌹🌺🙏🏻

No comments:

Post a Comment