मुलाचं लग्न झाल्यानंतर माझं कीचन पुर्ण बदललयं... सुनेने त्याला पुर्ण मॉडर्न बनवलयं..!!

बाहेर काम करुन घरी लवकर आली की किचनमधे शिरुन काही ना काही बनवण्याची तिला हौस आहे..

पुर्वी मी विळी घेऊन भरभर कांदा कापत होते पण आता तिने कांदा कापून द्यायच यंत्रही आणलयं.. खोबर किसायचंही....

खरंच.. जेवण बनवणं कीती सोप्पं झालयं!  *काही सासवा या सुधारणा स्विकारत नाहीत...* 

"आमच्या वेळी नव्हते बाई असले नखरे..स्वतःच्या हातानी करायचो सगळी कामे ."  अशी वाक्य फेकत विनाकारण सुनांना कमी लेखण्यातच त्या धन्यता मानतात...

अरे असु देत ना.. तुम्हाला नाही मिळालं तरुणपणात सुख म्हणून तर सुनांनीही घ्यायच नाही ?

उलट तुम्ही सुध्दा त्याच्या बरोबरीने नवीन एंजॉय करायचा प्रयत्न करा..
उद्या त्यांच्या सुना आल्या तर त्या आणखीन काहीतरी नवीन बदल करतीलच की... आपण जातं सोडून पीठाच्या गिरणीकडे वळलोच ना? पाटा वरवंटा सोडून मिक्सरला आपलसं केलच ना? मग येऊ देत की विचारातही आणखीन बदल... त्या यंत्रांशी खेळण्यात पण एक मज्जा आहे.. ती घ्या..
आणि सुनेने कौतुकाने समोर आणलेला पास्ताही मनापासून खा ! मग बघा ती सुध्दा तुमची चपाती भाजीही किती चवीने खातेय ते...

माझी सुन खाते मी केलेलं आवडीने.. मीही स्विकारलीय तिच्या हातची  वेगळी चव... 😊😊😊
आपल्या मुलासाठी सुन स्वत:ला बदलवतच असते की.. मग आपल्या मुलासाठीच आपणही जरा बदललं तर त्याचाच संसार सुखाचा होईल... तेच तर हवं असत ना आईला??

*आणि हो..* सुनेनेही आपल्या सासुबाईला आईसारखे मानावे.. त्यांच्या बोलण्यामागेही मुलाचे व कुटुंबाचे भले व्हावे हीच अपेक्षा असते..

*माणसाने बदल स्विकारले की नाती सुदृढ होतात..!!*

- एक सासुबाई

No comments:

Post a Comment