लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत...
हे नेहमीच लक्षात ठेवा ...
रस्त्याने चालताना असे चाला की लोकांनी राम राम घातला पाहीजे...
.
बसताना असे बसा की लोक शेजारी येऊन बसले पाहीजे...
.
आणि
.
मरताना असे मरा की ज्याला कळेल त्याच्या डोळ्यातुन खळाखळा पाणी आल पाहीजे....
जीवनाचे सार्थक फक्त येवढ्याच गोष्टीत
आहे !!!.......
.
कलीयुगाचे पर्व
आहे..
,
प्रत्येकालाच इथे गर्व
आहे...!
.
मी आहे तरच सर्व
आहे...,
.
नाहीतर सर्व व्यर्थ
आहे...!!
.
अरे वेड्या..!
.
कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
.
आदर कर सर्वांचा,
हाच खरा मानव धर्म
आहे...!!!
.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्या जवळ आहे..,
.
तोच या जगात
खरा "श्रीमंत"
आहे..
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत +भांडण + जिवन = मित्र
श्वासातला श्वास असते मैञी....ओठातला घास असते मैञी....काळजाला काळजाची आस असते मैञी....
कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैञी.
पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो.
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही.
पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे...रण मग आपोआप जिंकले जाते.
लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो...तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो.
"जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो."
पाहूया श्रीकृष्ण काय म्हणतो.
श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती. त्यातून तो वाचला.
पुढे सतत जीवावर संकटं आली. तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला. प्रसंगी पळसुध्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वताची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, ना उपास केले. ना अनवाणी पायाने फिरला.. त्याने पुरस्कार केला फक्त कर्मयोगाचा!!
भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला. तेव्हा कृष्णाने ना अर्जुनाची कुंडली मांडली, ना गंडे-दोरे बांधले. तुझं युद्ध तुलाच कराव लागेल असं त्याने अर्जुनाला ठणकावून सांगितलं.
अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वत अर्जुनातर्फे लढाई केली नाही. श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही. जर अर्जुन लढला तर त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. एक महान योद्धा driver बनला. अर्जुनाला स्वताची लढाई स्वतालाच करायला लावली.
ह्या कृतीतून संदेश दिला कि जर तुम्ही स्वताचा संघर्ष करायला स्वत सज्ज झालात तर मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमचा driver बनायला तयार आहे. पण तुम्ही लढायला तयार नसाल तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही. तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.
कोणत्याही देवाचा-देवीचा आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा श्रीकृष्णाला विसरू नका.
अनवाणी चालत जायची गरज नाही. उपाशी राहायची गरज नाही... शस्त्र खाली टाकू नका
प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. नेमकं तेच शस्त्र काढा आणि त्याचा उपयोग करून लढा. कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही.
तुमची स्वप्न फुकटात पूर्ण करून देणार नाही.
स्वताची लढाई स्वत लढा
एकदा एका विमानतळावर एक मुलगी वाट पाहत बसली होती.
.
थोड्या वेळाने तिने तिथल्याच स्टोअरमधून एक पुस्तक आणि बिस्कीटपुडा खरेदी केला.
.
कुणाचा त्रास होऊ नये म्हणून ती “व्हीआयपी वेटिंग एरिया"त जाऊन पुस्तक वाचत बसली.
.
तिच्या शेजारी दुसरे एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत बसले होते.
.
शेजारी बिस्किटाचा पुडा होता.
.
तिने एक बिस्कीट खाताच त्यांनी ही त्याच पुड्यातून एक बिस्कीट घेऊन खाल्ले.
.
त्या गृहस्थाचा निर्लज्जपणा पाहून तिचा पारा चढला.
“काय निर्लज्ज मनुष्य आहे हा!"
.
"माझ्या अंगी थोडी हिंमत असती,
तर याला इथल्या इथे चांगलंच सरळ केलं असतं!"
.
ती मनात विचार करत होती.
.
दोघांचेही एक-एक बिस्कीट खाणे सुरूच होते.
.
आता शेवटचे बिस्कीट उरले.
.
“आता हा हावरट मनुष्य ते बिस्कीट स्वत: खाईल,
का?
मला अर्धे देण्याचा आगाऊपणा करेल?’
.
ती विचार करत होती.
“आता हे अतिच झालं,”
असे म्हणत ती दुसऱ्या खुर्चीवर
जाऊन बसली.
.
थोड्या वेळाने राग शांत झाल्यावर पुस्तक ठेवायला तिने पर्स उघडली.
.
पाहते तर काय,
❔
तिचा बिस्कीटपुडा पर्समध्येच होता.
.
आपण कुणा दुसऱ्याची बिस्किटे खाल्ली,
याची तिला खूप लाज वाटली.
.
एका शब्दानेही न बोलता त्या व्यक्तीने आपली बिस्किटे तिच्यासोबत वाटली होती.
.
तिने नजर टाकली,
तर,
शेवटचे बिस्कीटही त्याने तिच्यासाठी ठेवले होते.
.
❕
निष्कर्ष – आयुष्यात कितीतरी वेळा आपण दुसऱ्याच्या वाट्याचे खाल्ले आहे;
पण आपल्याला त्याची जाणीवच नसते.
.
दुसऱ्यांविषयी मत बनवताना किंवा वाईट बोलताना आपण सर्व गोष्टींचा आढावा घेतलाय का ???
.
कित्येकदा गोष्टी वरपांगी वाटतात तशा प्रत्यक्षात नसतात....!!!
.
"चांगली वस्तु"
"चांगली व्यक्ती"
व
"चांगले दिवस"
यांची
"किंमत"
निघुन गेल्यावर समजते...
"प्रेमाने" जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे "वैभव" ज्याच्याजवळ आहे, तोच खरा "श्रीमंत".
.
चार चौघात बसण्यापेक्षा,कधी कधी समुद्र किनाऱ्यावर किंवा निवांत ठिकाणी शांतपणे आठवणींना घेऊन बसावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
.
आपल्याला कोण हवंय,
यापेक्षा
आपण कोणाला हवंय
हे सुद्धा कधीतरी पहावं.
आयुष्य खरंच जास्त सुंदर वाटत...
.
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत,
त्याच प्रमाणे,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
.
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
Nice msg "लक्ष्मी आणि विष्णू संवाद"
लक्ष्मी म्हणते:- 'जग सर्व पैशावर चालले
पैसा नाहीतर काही नाही म्हणून
मलाच किंमत'.
विष्णू:- सिद्ध करुन दाखव.
लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य
दाखवते अंतयात्रा चाललेली असते,
लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक
प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.
लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि बघा बघितलं
पैशाला किती किंमत आहे !!
विष्णु:- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला?
लक्ष्मी:- प्रेत कसे उठणार तो मेलाय !
विष्णूंनी खूप सुंदर उत्तर
लक्ष्मीमातेला दिले:- 'जो पर्यंत
मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ह्या जगात
किंमत आहे.
ज्या क्षणी मी ह्या शरीरातून
जाईन तेव्हा पैसा मातीमोलच'.... नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ....
ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
जीवनाचे मुळ आहे।
एकदा गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, "आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?"
सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, "रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो."
यावर गौतम बुद्ध म्हणाले, "पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरीसुध्दा आपण ओरडतो... जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो".
यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणत्याच उत्तराने बुद्धांचे समाधान झाले नाही.
शेवटी बुद्धांनी स्वतःच उत्तर दिले.
ते म्हणाले, "जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढ्या आवाजात बोलतात."
"आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतिशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?"
असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले....
"कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते. आणि जसजसे दोन्ही मनात प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतूनच किंवा देहबोलीतूनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.
शिकवण - परस्परांत वादविवाद आणि भांडणतंटे होतंच राहतात मात्र कितीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढू देऊ नका... तसे होऊ दिल्यास दोन व्यक्तिंमधील दरी इतकी मोठी होईल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य.
☝नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
☝ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
☝जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
भरपूर आहेत.
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती, यावरून
माणसाची श्रीमंती कळते.
☝तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
☝"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".
☝"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".
☝आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...
☝कमीपणा घ्यायला शिकलो
म्हणून... आजवर खूप
माणसं कमावली...
हिच आमची श्रीमंती...!!
☝नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
☝ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
☝जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या
प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे
भरपूर आहेत.
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती, यावरून
माणसाची श्रीमंती कळते.
☝तुमच्या पाठीशी किती जण
आहेत हे मोजण्यापेक्षा, तुम्ही
किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्त्व आहे.
☝"एखादे संकट आले की,
समजायचे त्या संकटाबरोबर
संधी पण आली.
कारण संकट हे कधीच
संधीशिवाय एकटा प्रवास
करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार
असते. फक्त संकटावर मात
करा, मग संधी तुमचीच आहे".
☝"वडाचे झाड कधीच पडत
नाही, कारण ते जेवढे वर
वाढते तेवढेच ते जमिनीखाली
पसरते. जीवनात तुम्हाला
जर पडायचे नसेल तर स्वत:
चा विस्तार वाढवतेवेळी
चांगल्या मित्रांची सोबत
वाढवा".
☝आयुष्यात सुई बनून रहा.
कैची बनून राहू नका. कारण
सुई दोन तुकड्यांना जोडते,
आणि कैची एकाचे दोन
तुकडे करते...
✨✨