कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त " *शक्ती*" असून चालत नाही .
तर त्याला " *सहनशक्ती* "चीही
जोड आसावी लागते .
माणुस " *कसा* दिसतो" ह्यापेक्षा,
" *कसा आहे*" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,
*सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत*,
तर, *गुणाचं आयुष्य*
*मरणापर्यंत असतं*
🍾🍻नट सम्राट गटारी🍻🍾
कोणी बियर देतं का बियर बियर बियर
या तुफानी बेवड्याला बिhयर देत का कोणी बियर
तु पी or not तु पी
that is the question ?😞
ए वाइनशॉप वाल्या , तू इतका कठोर का झालास ?🍻🍻🍻
एका बाजूला ... आम्ही ज्यांना पाजली
ते आम्हाला विसरतात😥😞🍻
आणि दुसर्या बाजूला, ज्यानं आम्हाला पाजली...
तो तू ही आम्हाला विसरतोस,😥😜
मग रिकाम्या बिअर चे हे गाठोडे घेऊन ... हे करुणाकरा
आम्ही बेवड्यांनी
कोणाच्या अड्ड्यावर बसायच रे !🙇🙇
तु पी or not तु पी
that is the question ?🚶🏃🏻🏃🏻
Happy Gatari 🍻🍻🍗🍤
😂😂😂😂😂
*एकत्र येण सोप असत,
पण एकत्र होण कठीण असत.
एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,
पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत....!!
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो....!!
झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो....
त्यामुळे एकत्र राहा व जीवनाचा आनंद घ्या....!!*
🔅सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण आचार्य विनोबांनी दिल होत.
👌 ते म्हणतात, की आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो.
🔅तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही...
🔅तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते, तो नष्ट होतो .
🔅कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो...
थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबुन असते...!
बाप्पा तुझ्यासाठी चार ओळी
🐦चातकाला जसी ओढ असतेणारे श्रावणाची,💧
तसी काहीसी ओढ आहे रे तुझ्या भेटीची..👬
👩आई जसी वाट पाहते नारे लहानश्या बाळाची,👏
तसीच आतुरता आहे रे या भोळ्या जीवाला तुला👉 पाहण्याची..🙏
⚡नदी जसी धावते नारे त्या सागराला भेटण्यासाठी,🌊
तसीच धडपड आहे रे तुला भेटण्याची..🏃
श्रावण सरी💧💧 बरसून कशी चाहूल देतो नारे सुखाची,💃
तशीच ओढ आहे फक्त आणि फक्त 'बाप्पा" तुझ्या आगमनाची..👀
💃💃"ऐ" लाव DJ माझा बाप्पा येतोय💃💃
बेवडा नवरा अर्ध्या रात्री दारू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला.
बायको :-"मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा.
नवरा :-"दरवाजा उघड नाही तर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन "
बायको :-"मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा "
यानंतर नवरा गेटजवळील अंधारया भागात जाऊन उभा राहतो आणि दोन 2 मिनिट वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यातील पाण्यात फेकतो.
धपाक
बायकोने हे ऐकल्यावर दरावाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पळाली.
आंधारात उभ्या असलेल्या नवरयाने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला.
बायको :-"दरवाजा उघडा ,नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी गल्ली जागी करेन "
नवरा :-"जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाही तोपर्यंत मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री तू कुठून येते आहेस?
😜🍺🍻टैलंटेड बेवड्डा🍻🍺😜
तू 'राम' म्हण, 'अल्ला' म्हण
'येशू' म्हण, 'साई' म्हण
'देव' म्हण, 'दूत' म्हण
'अवतार' म्हण, 'काही' म्हण
मी हरकत घेण्याचंही
कारण नाही काही..
पण माणूस म्हणून एक गोष्ट
खरंच पटत नाही !
तू हवी त्याची पूजा कर
हवी त्याची आरती गा
मॅगी, पिझ्झा, चिकन, मटन
प्रसाद म्हणून काही खा !
चोविस तास देव देव कर
वाटल्यास विसर घर
पण माझ्यासाठी दोस्ता फक्त
एवढा विचार कर !
देव म्हणजे सुपर पाॅवर
ब्रम्हांडावर ताबा
मग त्याचं आॅफिस गल्लीबोळात
कशाला रे बाबा ?
ऐकलं होतं.. देव असतो
उभा सत्त्यापाठी !
तरी त्याच्या अवती भवती
दलालांची दाटी ?
चोर, डाकू, बलात्कारी
सारेच त्याचे भक्त
देव काय नुसते चेहरे
बघत बसतो फक्त ?
असा कसा चिडत नाही
त्याला नाही भान ?
वरून तुझ्यासारखे मूर्ख
तिथंच देतात दान !
देवळा भवती भिकारी
लुळे पांगळे जीव
ज्याला असेल काळीज त्याला
पाहून येते कीव !
प्रश्न त्यांचे सुटत नाहीत
दुःख सरत नाही
तरी तुझा सुपर देव
काहीच करत नाही !
म्हणून म्हणतो डोकं वापर
गहाण नको ठेऊ
भुकेल्याला, तहानल्याला
घाल कधी जेवू !
अनाथ, कोवळ्या हातामधे
पाटी-पुस्तक ठेव
आई शप्पथ तुला सांगतो
तूच होशील देव !
एक आजोबा कोथरुड स्टँड ला रिक्षात बसतात.
शिवाजी पुतळ्याला रिक्षा थांबवतात...
आजोबा : किती झाले ?
रिक्षावाला : ३२ रुपये
आजोबा ४० रु देतात
रिक्षावाला : सुट्टे नाहीयेत
आजोबा : ठीक आहे,
जोपर्यंत मीटर मध्ये ४० होत नाहीत तो पर्यंत पुतळ्याभोवती गोल फिरव....
रिक्षावाला मुकाट्याने सुट्टे पैसे देतो
काही लोक परफेक्ट होण्यासाठी आयुष्य भर झटतात...
तर काही लोक थेट पुण्यातच जन्म घेतात....!
😜😜😝😝😆😆
*एका वाचनात आलेले सुंदर ऋणानुबंध*...
माणूस हा समाजशील प्राणी आहे . समाजाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे . फुलण्यासाठी रोपांना जशी मातीची तशी माणसाला समाजाची गरज असते . अनेक पाकळ्या जेव्हा एकसंघ फुलतात तेव्हा एक सुंदर फूल उमलतं . पण त्यातल्या काही पाकळ्या मिटल्या , कोमेजल्या वा गळून पडल्या तर फूल सौंदर्यविहीन , मूल्यहीन होतं . त्याचा जगण्याचा अर्थही संपतो . आपल्या जीवनाचं पुष्पही असंच नात्याच्या पाकळ्यांनी बहरत असतं . त्याची प्रत्येक पाकळी अनमोल असते .
मी पाहिलेली , अनुभवलेली नात्यांची विलोभनीय उत्कटता शब्दांच्या कँमेरातून टिपण्याचा इथं प्रयत्न आहे .
*|| आई- वडील ||*
सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं
आपल्या घराची जीवित दैवतं
तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती
आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह - निर्झर
*|| गुरुजन ||*
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत
*|| आजी - आजोबा ||*
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश
स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती
*|| सासू - सासरे ||*
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती, आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप
*|| काका - मावशी ||*
आईवडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिता , विशुध्द भावाचे चिंतामणी
*|| आत्या - मामा ||*
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती
*|| मामा ||*
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा
आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार
*|| मामी ||*
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती
*|| दाजी ||*
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक
*|| बहिण ||*
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका
मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका
कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका
*|| भाऊ ||*
आपल्या हिमतीच्या धमन्या
आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं
आपल्या आवाजातील निनाद
*|| साडू ||*
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं , इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ
*|| मावस भाऊ बहीण ||*
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस
बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय
*|| मेव्हण भाऊ बहीण ||*
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी
थट्टा मस्करीतून करणारे जीवलग
*|| भाचे भाची ||*
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं
*|| पुत्र ||*
भविष्याचा प्रकाश
अस्तित्वाचा अर्थ
वंशाचा कुलदीपक
कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी
*|| पुत्री ||*
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती
*|| नातवंडे ||*
दुधावरली साय , आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा, अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट
*|| मित्र मैत्री ||*
वरदान रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं विश्वासाची आधारशीला स्वतःचेच प्रतिरुप
*|| शेजार धर्म ||*
मानवी मूल्यांचा ओझोन , संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन
*|| शिष्य ||*
आपल्या कर्तृत्वाचा कळस
आपल्या कौशल्याची किरणं
*_खरंच , नातं न जोपासणारा माणूस जणू पिसारा गमावलेला मोरच ! नाही का ?_*
🙏😊🙏😊🙏
*सर्व पालकांना विनंती.*
या सुंदर सेवेचा लाभ घ्यावा.
पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी आपल्या प्रधानमंत्र्यांचे आणखी एक पुढचे पाऊल
राष्ट्रीय रोगप्रतिबंधक लसटोचणी स्मरण मोहीम ही नि:शुल्क सेवा आहे.
*तुम्ही फक्त एवढेच करा.*
तुमच्या बाळाचं नाव आणि जन्मतारखेचा एसएमएस संदेश 566778 या क्रमांकावर खालील सूत्रात पाठवा :-
Immunize[स्पेस]बाळाचे नाव[स्पेस]बाळाची जन्मतारीख
(हे सगळं इंग्रजी त हवं)
उदा. *Immunize Krishna 01-01-2015*
तुमच्या बाळाला लस टोचण्याची आठवण करून देणारा संदेश तुमच्या मोबाईल वर २ दिवस आधीच येईल.
तुमचं बाळ १२ वर्षांचं होईपर्यंत हे चालूच राहील.
*तुमच्या बाळाला निरोगी जीवनाची ही अनमोल अशी भेट द्या.*
कृपया हा संदेश तुमच्या सर्व मित्रांना आणि संबंधित सर्वांना पाठवा.
*ज्यांची मुले १२ वर्षे पेक्षा लहान आहेत, त्या सर्व पालकांनी ही नोंदणी करायलाच हवी.*
*एक शिष्य आहे ज्याला सुपारी खाण्याचे व्यसन आहे*
*खूप जणांनी समजवले पण सवय काही जात नाही*............
*त्याला स्वतःला हे व्यसन सोडायचे आहे पण व्यसन काही सुटत नाही*
*शेवटी कंटाळून आपल्या गुरूंकडे आला आहे......आणि संवाद चालू आहे......................*
*शिष्य: प्रणाम गुरुवर्य,.......(चाचरत...) मला, सुपारी खाण्याचे व्यसन लागले आहे........मला स्वतःला ते सोडायचे आहे..........पण काही केल्या सुटत नाही........काय करू* ?
*गुरुवर्य: (हसत)...थांब, तुला उपाय सांगतो*........
*(जागेवरून उठून एका झाडाभोवती मिठी मारतात)*
*शिष्य: (मनातल्या मनात) अरे, हे काय ......मला उपाय सांगतो म्हणाले आणि झाडाला का असे मिठी मारून बसले आहेत*
*आपण थांबूया*.......
*बराच वेळ जातो*.......
*गुरु झाडाला मिठी मारून आहे तसेच उभे आहेत*........
*तो शिष्य आता वैतागला आहे*.......
*शिष्य(कंटाळून) गुरुवर्य, मला माफ करा*.....
*पण तुम्ही मला उपाय सांगणार होता*......
*हे झाडाला असे का मिठी मारून बसलात*?
*गुरुवर्य: अरे काय करू*.....
*बघ ना.....या झाडाने मला कसे घट्ट धरले आहे*.....
*याने जर मला सोडले नाही तर मी कसा तुला उपाय सांगणार*........
*शिष्य(हसत) गुरुवर्य, झाडाने तुम्हाला नाही तर तुम्ही झाडाला धरले आह*....
*तुम्ही सोडा ना त्या झाडाला* ........
*तर ते झाड तुम्हाला सोडेल*.............
*गुरुवर्य (झाडाची मिठी सोडत आणि हसत*)
*अरे तुला जर एवढे समजते*....
*कि झाडाने मला नाही तर मी झाडाला धरले आहे*.....
*मग माझे व्यसन सुटत नाही तू असे कसे म्हणतोस*......
*अरे व्यसनाने तुला नाही तर तू व्यसनाला धरले आहेस*.......
*तू जर स्वतःच ठरवलेस तरच तू व्यसन सोडू शकतोस*.......
*नाहीतर तुझे व्यसन कधीच सुटणार नाही*...........
*आणि एक दिवस हेच व्यसन तुला शारीरिक,मानसिक धोकादायक ठरणार आहे*.......
*वेळीच सावध हो*................
*शिष्य: माफी असावी.....मी आज आपल्या समोर संकल्प करतो*....
*कि माझे सुरु असलेले व्यसन मी आताच सोडून देतो*............
*मित्रानो, आज आपण व्यसन हि संकल्पना फक्त विडी,सुपारी,मद्य,गुटखा, तंबाखू या बाबतीत मर्यादित ठेवतो*
.....
*पण आपण प्रत्येक जण व्यसनी आहोत.......आश्चर्य वाटले ? काहीजण म्हणतील .......नाही, नाही...व्यसन आणि मी.......शक्यच नाही........कधीच केले* *नाही*..........
*पण मित्रानो*....
*आज प्रत्येकाला व्यसन आहे*..........
*कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे*.............
*कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे*..........
*कोणाला अहंकाराचे व्यसन आहे*.........
*कोणाला मी पणाचे व्यसन आहे*...........
*कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे*........
*कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे*..........
*कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे*.........
*कोणाला अमुल्य वेळ वाया घालवण्याचे व्यसन आहे*.........
*आता प्रश्न राहतो तो विडी,तंबाखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेल्या मित्रांचा*.........
*आपण जरी लपून एखादे लहान-मोठे व्यसन करत असलो*......
*जरी कोणालाच त्या व्यसनाबद्दल काही माहिती नसेल* .....
*असे असले तरी दोन व्यक्तींना मात्र नक्कीच माहित आहे*.......
*१. आपले गुरु आणि*
*२.आपण स्वतः*
*वरील पैकी एखादे व्यसन जरी आपल्यात असेल तर संकल्प करूया आणि त्या व्यसनापासून मुक्त होवुया*....
गर्लफ्रेंड 🙎🏻:- जानु मला माफ कर, तुला काही
सांगायचं आहे...
बॉयफ्रेंड👲 :- सांग ना डिअर ?.
गर्लफ्रेंड 🙎🏻:- मी तुझ्यापासुन काहीतरी
लपवलंय, माझा साखरपुडा झालाय आणि
पुढच्या आठवड्यात लग्न होऩार आहे...आपण
इतका वेळ सोबत राहीलो, चँटिंग केली, पिक्चर
पाहीले, २-२ तास बोललो, आणि..............
ब्वॉयफ्रेंड👲 :- अगं बस-बस , पागल आता
रडवशील का मला,,
चल जाऊदे आज मी पण
तुला माझ्या बायकोपोरांशी ओळख करुन देतो😳😂
गर्लफ्रेंड ढगात 😝😂😂😂😂😆😆😆.
१)शक्ती साठी?
-- पण जमिनीवरचा सगळ्यात शक्तीशाली प्राणी हत्ती शाकाहारी आहे.
तो कधी ताकदीसाठी मांस भक्षण करित नाही!!
शेतकय्रांचा सोबत राबराब राबणारा बैल कधी मांसाहार करतो का?
अश्वशक्ती(होर्सपाँवर) ने कुठल्याही यंत्राची शक्ती मोजल्या जाते अश्व-घोडा कधी मांसाहार करतो का?
मग मांसाहार केल्यानेच शक्ती मिळते असे कसे म्हणता येईल?
२)जीभेवरच्या चवीसाठी??
*मांसाला कसली आलीय चव.*
चव सगळी त्यातल्या अष्टपैलू मसाल्यांना.
तेच मसाले वापरले तर वांग्या बटाट्याच्या भाजीलाही येईलच की चव!
३)जीवनसत्वांसाठी??
--मांसापेक्षा हिरव्या पालेभाज्या आणि सूकामेव्यात कितीतरी अधिक प्रथिने जीवनसत्वे अन् पौष्टिक पदार्थ असतात.हो ना?
मग मांसाहार कशासाठी?
खरे तर निसर्गाने
ना आपले दात मांस चावण्यायोग्य बनवलेत
ना आतडे मांस पचविण्या योग्य बनवलेत.
मानवी शरीरचनाच मूलत:
शाकाहार पूरक अशीच आहे.
असे नसते तर छोट्या बालकाला भाताच्या पेजेऐवजी मांसाचे तुकडे कुस्करून द्यायला सांगितले असते डॉक्टरांनी
याचा अर्थच हा आहे
की
माणूस नैसर्गिक मांसाहारी प्राणी नाही!
मग
का बळेच रक्त चाटवायचं जिभेला?
वैद्यकशास्त्र सांगते,मांसाहारातून पचनसंस्थेचे विकार जडतात.
मानसिक अस्वास्थ्य निर्माण होते ज्यातून पुढे अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
अध्यात्मशास्त्र सांगते,
मांसाहारामुळे काम,क्रोध,मद,मत्सर इ.
दुर्गुण माणसात प्रबळ होतात.
आणी असुरी प्रवृत्ती वाढते.
असं म्हणतात
वानरापासून मानव ऊत्क्रांत झाला.
वानर आजही शाकाहारी आहे.
ऊत्क्रांतीच्या प्रवासात
वानरापासून नर होताना
माणूस जानवर
कसा झाला कुणास ठाऊक?
पण माणसाचे पोट म्हणजे जनावरांची दफनभूमी नव्हे
एवढे मात्र माणसाने लक्षात घेतले पाहीजे!!!
*शाकाहारी व्हा!!!*
तनाची ,मनाची अन् आत्म्याची
पवित्रता वाढवा .🙏🏻
*मला घडविण्यात मोलाचा हातभार लावलेल्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा*
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी 'ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
Guru Paurnima
आज गुरू पौर्णिमा.,..
🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला
जगायला शिकवलं ,
लढायला शिकवलं...
अशा प्रत्येकाचा
मी ऋणी आहे...
असेच पाठीशी उभे रहा...
माझ्यासाठी
प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग ती लहान असो वा मोठी...
आपण प्रत्येकाकडूनच
नकळत खूप काही शिकत असतो....
ज्ञान, विवेक, व्यवहार
आणि आत्मविश्वास देणाऱ्या
विश्वातील सर्व गुरुजनांना
माझा साष्टांग नमस्कार.
🙏🙏🙏🙏🙏🙏
ज्याच्या मनी गुरु विचार।।
तो नसे कधी लाचार।।
ज्याच्या अंगी गुरु भक्ती।।
त्याला नाही कशाची भिती।।
ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती।।
त्याची होई जगभरात किर्ती।।
जो करेल गुरुं ची पुजा।।
त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।।
गुरू पौर्णिमेच्या मंगल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🍂🍁शुभ दिवस 🍁🍂
पाचवीतील मुलाने त्याच्या गर्लफ्रेँन्डसाठी लिहलेले
लव्ह लेटर....
प्रिय. अंजु. . . . .
लव्ह लेटर पाठवण्यास
कारण की,
मला तु खुप आवडतेस..
तु पण माझ्याकडे सारखी बघत असतेस..
.
म्हणुन मला वाटतंय,
मी पण तुला आवडतो.. .
मी जर तुला आवडत असेन
तर,
मला गणिताच्या पेपरला मदत कर..
.
तु डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ,
तुझ्या मागं मंदाकिनी बसते
ना..
.
ती तुझ्या रिबीन वर पेनची शाई सोडते, मला तिचा खुप राग येतो..
.
ती माझ्या घराशेजारीचं राहते,
शाईचा बदला घ्यायचा
म्हणुन मी तिच्या घराची बेल वाजवुन पळुन
जातो..
.
तु फेअर अँन्ड लव्हली लावत जा, आणखी गोरी होशील..
.
तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि सोनाली दोघीही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत.. .
पण त्या मला आवडत नाही..
.
पत्राचा राग आल्यास मला परत दे..
.
सरांना देऊ नकोस......
.
तुझा प्रियकर...
संजु