खान-भेटीसाठी महाराजांनी जे दोन अंगरक्षक निवडले ते त्यांच्यातील खास वैशिष्टयांमुळे.
जिवावा महाला जो नऊ हाताच्या अंतरावरील लक्षडोळ्याची पापणी लवायच्या आत भेदुन मोकळा व्हायचा आणि दुसरा संभाजी कावजी जो तुलनेने खानाएवढाच धिप्पाड आणि तेवढयाच ताकदीचा होता.
अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्या नंतर महाराजांची योजना होती की लगेच गडाच्या दरवाज्या कडे धाव घ्यायची.
महाराजांनी वाघनखे खुपसली, कोथला काढला.
सय्यद बंडा आला जिवा महालांनी त्याला ठार केलं.
जिवा महाला नऊ हातावरील नारळ अलगद कापायचा पूण्यातील वरातीत. त्याचे हेच वैशिष्ट ऒळ्खुन महाराजांनी त्याला स्वराज्याच्या लढाईत सामील केलेले होते. सय्यद बंडाकडे सुदधा हीच खासियत होती. जिवा महालाला महाराजांनी सांगितले होते, तुझे लक्ष फक्त सय्यद बंडावर ठेव मला काहीही झाले तरी भावनिक व्हायचे नाही. जिवा महालांनी त्यांचीकामगिरी चोख बजावली. त्यांचे लक्ष फक्त सय्यद बंडावर होते. राजांवर वार करण्यासाठी उठलेला त्याचा हात हवेतच बाजुला झाला. नऊ हाताच्या अंतरावरुन जिवा महालांचा अचुक वार राजांसाठी पुनर्जन्म देणारा ठरला.
राजांना कृष्णाजी भास्कर अडवा आला, महाराजांनी त्याला कापला आणी प्रतापगडाच्यादर वाज्याकडे धावत गेले.
जाता जाता सोबतचे अंगरक्षक मोजु लागले…१,२,३,४,५ ,६,७,८,९ ...?? फक्त ९?
सोबत तर दहा होते… मग कोण बाकी राहिलं? राजांनी विचारलं…
कोणी तरी म्हटलं, ‘संभाजी कावजी नाही जी’
राजे म्हणाले, ‘नाही? काय झालं? मधुनच कुठे गेला?’
तेवढ्यात संभाजी कावजी धापा टाकत आला.
राजे संतापले आणी म्हणाले, ‘संभाजी कुठे होतास?’
संभाजी कावजी ने खानाची पालखी उचलणा-या भोयांचे पाय कापले आणि पालखीत बसुन पळुन जाण्याचा प्रयत्न करणा-या खानाचं शीर कापलं. संभाजी कावजी हा खुप धिप्पाड होता अगदी खानाच्या तोडीचा. अख्खं बकरं एकटा म्हणलं तरी फस्त करायचा. संभाजी कावजीला जेवायला बोलवायला कुणीही धजावत नसे. खायला बसला की केलेला स्वयंपाक संपेपर्यंत थांबायचाच नाय. त्याचे बळ आणि धिप्पाडपणा पाहुनच राजांनी त्याला खान-भेटीत सामील केला होता.
संभाजी कावजी म्हणाला, ‘राजं तुम्ही वाघनख मारली खानाला पण म्हटलं मरत्यो की न्हाई म्हणुन मागे गेलो आणी त्याचं शीर कापुन आनलं’.
आणी त्यानी कापुन आनलेलं खानाचं डोकं वर केलं राजांना दाखवायला…
राजे म्हणाले, ‘अरे गड्या त्या वाघनखांना विष लावलं होतं. खान कसाही करुन मरणारच होता मग तू हे वेडं धाडस का केलं. यापुढे लक्षात ठेव जे आपल्या योजनेत नाही ते कधिही करायचं नाही.एक वेळेस खान मेला नसता तरी चाललं असतं पण जर तुझ्या जिवाला काही बर वाईट झालं असतं तर तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं मी. ती तर हेच म्हटली असती ना की शिवाजी ने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी माझ्या पोराचा जीव घालवला. तुझ्या जागेवर एक वेळेस मी मेलो असतो तर चाललं असतं पण स्वराज्याचा एकही मावळा मरता कामा नये.’
जागाच्या पाठीवर पहिला राजा आहे जो आपल्या एका साध्या अंगरक्षासाठी सुद्धा मरायला तयार आहे.
आपल्या प्रजेवर लेकरांसारखं प्रेम केलं आहे ह्या राजांनी…
‘बहुत जणासी आधारू’ म्हणुन म्हणतात शिवाजी महाराजांना…

No comments:
Post a Comment