📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे
जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची
जिद्द असावी...!!
🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩
Nice SMS on Life
Good morning Sms
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन
जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा....
किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....
पर्याय आपणच निवडायचा असतो....
सुप्रभात......
Birth and death
माणसाच्या बाबतीत परमेश्वर कमालीचा दयाळूपणाने वागलाय...
जन्माची चाहूल तो नऊ महिने अगोदर देतो.. पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं...कारण त्याला माहितीय,
माणूस सुखाची वाट पाहू शकतो, दु:ख येणार हे मात्र पचवू शकत नाही...
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं !
विश्वास उडाला की आशा संपते !
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं !
म्हणुन स्वप्न पहा, विश्वास ठेवा, आणि काळजी घ्या !
तडजोड
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड"....
कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही...!!!
Wine shop 🏪 jewellers
अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत..
वेळ प्रत्येकlची येतेच...😂😂
Nice lines ever
जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
======
🌹देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
शकत नाही म्हणून त्याने
निर्माण केली
👉 'आई'👌
🌹देव प्रत्येकाशी बोलु शकत
नाही म्हणून निर्माण केले
संत
🌹देव प्रत्यक्ष मदत करू शकत
नाही म्हणून निर्माण केले
👉 'मित्र'👌
👍👍👍शुभ सकाळ👍👍👍
Breaking News of India loss
आरोप सिद्ध झाल्यास सामना उद्या पुन्हा खेळवण्याचे ICC चे आश्वासन !!!
आयुष्याचा चित्रपट
💖आयुष्याच्या चित्रपटाला
Once more नाही. .
हव्या-हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
Download करता येत नाही.
नको-नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
Delete ही करता येत नाही .
कारण हा रोजचा तोच-तो असणारा
Reality show नाही. .
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
Life हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. .💖 .....👍
💐 ।। सुप्रभात ।। 💐
Nice SMS Thoughts in Marathi
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी
फक्त "शक्ती" असून चालत नाही .
तर त्याला " सहनशक्ती "चीही
जोड आसावी लागते .
माणुस "कसा दिसतो" ह्यापेक्षा,
"कसा आहे" ह्याला महत्व असतं...
कारण शेवटी,
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं...
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा".....
Samashya Nivaran
ग्राहक : मी एका घोर अडचणीत सापडलो आहे.
समस्या निवारण : सर मी तुमची कशी सहायता करु शकतो?
ग्राहक : मी माझ्या जिवनातली पहली मेल लिहित आहे.
समस्या निवारण : ठिक आहे, पण तुमची समस्या काय आहे?
ग्राहक : इमेल ऍड्रेसमधे लेटर ''a'' आहे. तो मी टाईप केला आहे. पण त्याच्याभोवती गोल (@ ) कसं करायचं ते मला समजत नाही आहे.
😜😜😜😜😜😜
Sms of the day...
प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी.
आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना..
माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!!!
जगण्यासाठी लागतात फक्त
"प्रेमाची माणसं"
🙏🏻शुभ सकाळ🙏🏻
Shivaji maharaj Punyatithi
रयतेपायी तो जन्मभर झिजला
रक्षणार्थ तयाच्या गडकोटी वसला
मानवतेच्या त्या झर्यापुढे काळही थिजला
असा एक शिवसुर्य रायगडी निजला....
_/\_
# ३_एप्रिल#पुण्यतिथी#मुजरा _राजे_मुजरा_.....
Dheere Dheere se mere Zindagi me aana
मुलगा १ मुलीँवर खुपप्रेम करत असतो,
परंतु ते सांगायला तो घाबरतअसतो..
१ दिवस
तो तिला i luv uबोलायचठरवतो ,
आणि देवाला प्रार्थना करुनसांगतो कि,
मी तिला एकदाचआणि शेवटचा प्रप्रोजकरेल,
प्लिझ तिच उत्तरहो असु दे....
त्या राञी तिला तो'ILUVU'मॅसेज टायप करुन. तीचा नंबर वरपाठवतो आणि झोपतो.
काहि वेळानेत्याचा मोबाईल वर मॅसेजटोन वाजत
पण तो
मॅसेजउद्या सकाळी उठून अंघोळकरुनदेवाच दर्शन घेउनझाल्यावरच वाचेल असठरवितो
आणि झोपुनजातो.
.राञभर तो त्या मुलीचेस्वप्न बघतो ..
सकाळी देवाचं दर्शनझाल्यावर तो मॅसेजवाचतो तर त्यात लिहलअसत
..........
.........
.........
......Your A/c Balance isinsufficient.....Bal is Rs. 0.08 msg can not send
😂😂😂😂😂😂
याला म्हनतात,,,
खिशात नाही दाना..
आण
धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना,,
😝😝😝😝😝
I love you Funny SMS
पक्या-I Love u...
.
पोरीने पक्याच्या खाडकन
कानाखाली दिली...
.
.
पोरगी - काय बोललास .??
.
.
पक्या पण त्या पोरीच्या दोन कानाखाली देतो
आणि म्हणतो..
.
.
.
ऐकुच नाही आलं तर मग
मला का मारलं..???
😃😄😃😄😃😃😃😃😃😃
असेच होते एक गाव
घर होते मातीचे शेणाने लिपलेले..
अंगणात तुलसी वृंदावन मांगल्य वसलेले..
अमृताची बोली माणुसकी जपलेले..!!
पशु पक्षी, गो धन विपुल बहरलेले..
पाखरांनी किलबिल दुकान थाटलेले..
स्वयंसिद्ध सुख समृद्धिने डवरलेले..!!
कोंबड्याच्या बांगेवर जागे झालेले..
भल्या पहाटे शेतात राबलेले ..
मातीच्या कुशीत सोन पिकलेले..
संयमी समाधानात सुख लाभलेले..!!
कुणा दृष्टाच्या नजरेत भरले..
डोंगर माथे क्षणात झुकले..
निर्जीव नद्या, जलस्त्रोत आटले.
वणव्यात कुणी गाव फुंकले..!!
शहरी वारे कसे गावात शिरले..
जंगल तोडीचे पेव फुटले..
हव्यासी विद्रूप बकाल झाले..
पैश्याला आता पाय फुटले..!!
स्वार्थ मतलबाने पुरते घेरले..
विष बिज हे कुणी पेरले..
स्वप्नातले गाव माझे हरवले..
आता कवन मात्र उरले..!!
आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !!
प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता
तुम्हां रसिक वाचकांसाठी..........
("चांदणझुला" मधून... )
"बायको"
तिचं आपल्या आयुष्यात येणं,
किती किती सुखद असतं..!
या नात्याला श्वासांशिवाय,
दुसरं कुठलंच नाव नसतं...!!
एका सुंदर क्षणी आपल्या,
घरामध्ये येते "ती"...!
तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला,
भेट म्हणून देते "ती"...!!
किती सहज बनवत जाते,
ती प्रत्येकाशी नातं....!
बघता बघता अनोळखी घर,
तिचंच बनून जातं....!!
सुखामध्ये दुःखामध्ये,
'ती'च सोबत असते ना..!
सगळं सहन करून ती,
तुमच्यासाठीच हसते ना.?..!!
सकाळपासून रात्रीपर्यंत,
राबत असतात तिचे हात...!
सासू-सासरे, मुलं, घर..
सतत असतं तिच्या मनात...!!
चहा, दूध, नाष्टा, डबे,
आंघोळीला गरम पाणी...!
प्रत्येकाची करून कामे,
तिची मात्र मधाळ वाणी....!!
सगळ्यांत शेवटी झोपते ती,
सगळ्यांच्याही आधी उठून...!
दिवसभर राबण्यासाठी,
ताकद एवढी आणते कुठून.?..!!
घरामधलं सगळं आवरून,
कामांसाठी बाहेर पळते....!
घरामध्ये नसते तेंव्हाच,
तिची खरी किंमत कळते...!!
घर होतं अस्ताव्यस्त,
घरामध्ये नसते जेंव्हा....!
तिच्याशिवाय व्हायचं कसं...?
मनात आपसूक येतं तेंव्हा...!!
म्हणूनच ती परत येते,
घरामध्ये पदर खोचून....!
बोलून दाखवते मलाच ती,
वरती हे टोचून टोचून...!
की, "मी म्हणून टिकले..., दुसरी
केव्हाच गेली असती पळून....!
माझे महत्त्व येत नाही,
अजून कसे तुम्हांला कळून.?"..!!
राग-लोभ, रुसवे-फुगवे,
उणी-दुणी, मानपान...!
प्रत्येकाला घेते समजून,
जुळवून घेते कित्ती छान...!!
थकूनभागून आल्यावर ती,
हसून, चहा देते आणून...!
दिवसभराचे आपले कष्ट,
अलगदपणे घेते जाणून..!!
आयुष्यभर उपयोगी पडतं,
नेहमी तिचंच संसारी धोरण....!
म्हणून प्रत्येक घरात सजतं,
"बायको" नावाचं मखमली तोरण....!!
ती आहे म्हणून आहे,
आपल्या घरादाराला किंमत....!
तिला विरोध करण्याची इथं....
कुणात आहे हिंमत.?..!!
कुठून येतात आयुष्यात आपल्या,
इतक्या समजूतदार मुली.?..!
उगाच नाही म्हणत...
" घरोघरी मातीच्याच चुली...!!"
क्षणांचीही साथ नव्हे,
साताजन्मांची ही सोबत असते....!
"नवरा" आयुष्यभर "नवरा"च राहतो,
"नवरी मुलगी" मात्र "बायको" बनते....!!
👣👣👣👣👣👣👣👣
Dedicated to all Ladies
५ रु चा मिराज तंबाखु /गुटखा ....आणि ४ -५ लाखाचा चुना ...
मळताना मजा येते ...पण नंतर आपल्याच 4-५ लाखाचा जो चुना लागतो ....त्याचे काय ? शिवाय त्याच बरोबर येणारे अन्य रोग जे शरीरावर आपल्या जे प्रेंम करतात मग ते आपल्याल्या सोडतही नाही . प्रसिद्ध विनोदी लेखक मार्क ट्वेनचा एक मार्मिक विनोद. तो म्हणाला, ‘सिगारेट सोडणं खूप सोपं आहे. कारण यापूर्वी कित्येकदा मी ती सोडली आहे!’
आज काल निकोटिन हे एवढे व्यसनासक्त करणारे द्रव्य आहे की, धूम्रपान थांबविणे फार कठीण असते. जगभरातील देशांतून शेकडो वर्षांपासून तंबाखू वापरात आहे. आणि यांपैकी प्रत्येक देशातील लोकंना निकोटिनचे व्यसन लागलेले आहे. जेव्हा धूम्रपान करणारे, ते सोडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते पुन्हा सुरू होण्याचे प्रमाण फार असते,
अनेकजण निरस जीवनात आनंद शोधण्यासाठी, न पेलवणारा ताण सैल करण्यासाठी तंबाखूसारख्या गोष्टींकडे वळतात आणि त्याचे गुलाम होतात. खरं तर आपल्या जीवनशैलीतच आनंद, निवांतपणा, विरंगुळा असावा, ताण असल्यास त्याचा निचरा व्हावा म्हणजे अशा गोष्टींकडे वळण्याची अपरिहार्यता निदान कमी होईल. निकोटिन सोडविणे सुखद नसते. ते सोडणाऱ्यांपैकी ८० टक्के लोकांना त्याची उणीव जाणवत राहते आणि धूम्रपानाची तीव्र ओढ असते.
सिगारेटची पाकीटं आणि एकूणच तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरची किती टक्के जागा ‘धोक्याचा इशारा’ छापण्यासाठी वापरावी याची चर्चा चालू आहे. तंबाखूच्या व्यसनाविरोधातल्या मोहिमांसमोर खरं आव्हान आहे आपल्याच महाराष्ट्रातले दोन नेते. आर. आर. आबा पाटील आणि शरद पवार...आर. आर. पाटील यांनी मृत्युशय्येवरूनही अतिशय कळकळीनं आणि तळमळीनं सांगितलं, ‘‘गुटखा आणि तंबाखूचं व्यसन मी सोडू शकलो नाही. त्यामुळेच माझी ही अवस्था झाली. कृपा करून या व्यसनाला बळी पडू नका.’दहा वर्षापूर्वी अजित पवारांनी आबांना तंबाखू खाण्याबद्दल जाहीरपणो फटकारलं होतं. त्यांनीही तंबाखू सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी मानसोपचारतज्ज्ञाचीही मदत घेतली, पण आर. आर. पाटील हे व्यसन सोडू शकले नाहीत आणि महाराष्ट्र एका चांगल्या आणि गुणी नेत्याला मुकला.
दुसरीकडे शरद पवार यांनी नुकतंच, पहिल्यांदाच जाहीरपणो सांगितलं, गुटख्याच्या सवयीमुळेच मला तोंडाचा कॅन्सर झाला, माङो सगळे दात काढून टाकावे लागले.महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा नेत्यांच्या प्रत्यक्ष अनुभवानंतर ‘तंबाखूमुळे कॅन्सर होत नाही’ असा मुद्दा कोणी उपस्थित करू नये.तंबाखूमुळे तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस तसेच स्त्रियांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. एवढंच नव्हे, हृदयरोग, लकवा, दमा, टीबीचं प्रमाण खूपच मोठय़ा प्रमाणावर वाढतं. भारतात दरवर्षी तब्बल आठ लक्ष मृत्यू एकटय़ा तंबाखूमुळे होतात.
तंबाखू लॉबीनं अशा प्रकारच्या प्रतिमा जगभर निर्माण केल्या आणि लोकांमधलं सिगारेटच्या वापराचं प्रमाण वाढवलं.स्त्रियांच्या धूम्रपानाचं आणि स्त्रियांच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचं तेव्हापासून वाढलेलं प्रमाण अजूनही आटोक्यात आलेलं नाही. तरुण वयात जवळजवळ प्रत्येकालाच वाटत असतं, आपण भारी, आकर्षक दिसावं, मर्द, तगडा, डॅशिंग म्हणून आपल्याला इतरांनी ओळखावं, स्त्रियांना आपलं आकर्षण वाटावं. सिंहाला जशी आयाळ असते तसं धूम्रवलय म्हणजे जणू काही तेजोवलय आपल्याभोवती लहरत असावं..जाणीवपूर्वक तयार केलेल्या अशा प्रतिमांचा विशेषत: किशोरांवर, तरुणांवर मोठा परिणाम होतो. नंतर हळूहळू समाजजीवनाचा तो एक अविभाज्य भाग बनून जातो.
तंबाखूमधलं निकोटीन हे लवकर व्यसन निर्माण करणारं अत्यंत घातक असं रसायन आहे. हेरॉइनपेक्षाही घातक आहे. सलग तीन दिवस जर निकोटीन घेतलं तर चौथ्या दिवशी आपलं शरीर आणि मनच ते मागायला लागतं. म्हणजे चौथ्या दिवशी व्यसनाला सुरुवात होऊन जाते! संस्कृती आणि समाजजीवनाचा तो भाग बनला की आपोआपच हे व्यसन सर्वव्यापी होतं.
व्यक्तिगत स्तरावर या व्यसनापासून दूर राहणं अगर त्याच्या तावडीतून सुटणं हे दोन्हीही टोकाच्या आत्मसंयमनाची आणि दृढ निश्चयाची मागणी करणारं आहे. या व्यसनाच्या उच्चाटनासाठी, निदान त्याला आळा घालण्यासाठी सार्वजनिक धोरणात्मक निर्णयाची आणि कार्यवाहीची गरज आहे, ती म्हणूनच!
मित्रानो जीवन हे सुंदर आहे ........खूप अशा गोष्टी आहेत त्यात आपण आपले मन वळवू शकतो ....त्या साठी तंबाखु .मळयाची काहीच गरज नाही.
शेवटी निणर्य आपला आहे ........
माणसाचं मन
जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.
प्रसंगच तसा होता.
भिक्षा मागण्यासाठी आला होता.
राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला.
काय हवं ते माग. मिळेल.
भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे.
त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.
पण, वचन देण्याआधी विचार कर.
जमेल का?
भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला,
अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,
माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.
राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले
आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं...
...संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं...
...राजाचा सगळा खजिना रिता झाला होता,
आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,
म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.
रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,
महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.
भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.
सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो.
पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.
राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं,
भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात
माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही.
असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य?
भिकारी म्हणाला,
ते मलाही माहिती नाही.
हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.
त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात.
आणि
ते
कशानेही भरत नाही.
Give Respect to Take Respect
👍: लाईक नाही केले तरी चालेल, पण जरूर वाचा
एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे
कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार
होते
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला
म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला
त्याला काम करण्यात खुप उशीर लागला. तोपर्यंत प्लांट बंद
झाला
लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे
निश्चित होते
त्या माणसाला काही सुचेनासं झालं
पण तासा भरात एक चमत्कार झाला
आणि कोणी तरी दरवाजा उघडला
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन
उभा होता
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला
प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले
की तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय
सुरक्षा रक्षक म्हणाला
या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे
आहात की
जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता
आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण
संध्याकाळी गेला नाहीत
म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे
एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे
एक दिवस त्याचा जिव वाचवेल
म्हणून नेहमी लक्षात ठेवा
जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.
माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल...
म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा...
Give Respect Take Respect 💐💐💐