Showing posts with label अकबर बिरबल Akbar Birbal. Show all posts
Showing posts with label अकबर बिरबल Akbar Birbal. Show all posts

पाच मूर्ख 😂

*बिरबलाने शोधलेले*
*पाच मूर्ख*

अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."

"हां खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."

एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात आला.

बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ मूर्ख आणायला सांगितले होते."

बिरबल म्हणाला "खाविंद, एकेक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी."

बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला.

"महाराज, हा माणूस बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"

"आणि महाराज, हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."

बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव."

"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख."

"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव."

"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का? म्हणून चवथा नंबर आपला!"

"असूदे असूदे. आता लवकर पाचवा कोण ते सांग

"महाराज, पाचवा  आपल्यासारख्या  मूर्खाच्या कोड्याचं उत्तर  जाणून घेण्यासाठी,  दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून  हातात मोबाईल घेऊन चिकटून बसलेत ते

"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवे कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"
😅😂😝😜😊😀😍😂😅
📲📲📲