मैत्रिणी*********
💃💃💃💃💃💃
खुप सा-या मैत्रीणी असाव्या त.....
थोडं हसवणा-या थोडं रागवणा-या
पण अचूक मार्ग दाखविणा-या
खुप मैत्रीणी असाव्यात…
थोडं समजाविणा-या थोडं समजून घेणा-या
पण गोड शब्दात आपली चूक सांगणा-या
खुप मैत्रीणी असाव्यात…
थोडी काळजी घेणा-या थोडे अश्रू पुसणा-या
अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणा-या
खुप सा-या मैत्रीणी असाव्यात…
मनातील भावना जाणणा-या
नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणा-या
खुप मैत्रीणी असाव्यात…
साद घातल्यावर धावत येणा-या
त्यांचा प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणा-या.😊
Dedicated to all Maitrinis
No comments:
Post a Comment