MARATHMOLE UKHANE

सागवानी पेटीला सोन्याची चूक ,
..रावांच्या हातात कायद्याचे बुक .

चांदीचा पात सोन्याचे ठसे ,
..राव बसले आंघोळीला सोन्यावाणी दिसे.

केले देते सोलून पेरू देते चोरून ,
…रावांच्या जीवावर कुंकू लावते कोरून .

नदी पलीकडे नदी
मधी पेरला लसून,
पतीदेव जाऊ नका रुसून
आपण दोघे जाऊ रिक्षात बसून .

आनंदाने भरला ,दिन हा लग्नाचा ,
..ल घास देते ,गोड जिलेबीचा .

मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती,
..चे नाव घेऊन समाधान चित्ती .

स्वाती नक्षत्रातील थेम्बाने
शिंपल्यात होते मोती ,
..चं संगतीत
उजळते जीवनज्योती .

चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला ,
..रावांच नाव घ्यायला आजच प्रारंभ केला .

मांडवाच्या दारी पुजला वारू,
कारभारी रोज घ्या दारू
पण मला नका मारू .

चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत ,
मालक निघाले पन्धरर्पुरला
मला नाही करमत .

जन्माची गाठ बांधली सर्वा समोर,
..नाव घेते ,परत मारू नका बर .

चांदीच्या ताटात फणसाचे गरे ,
..राव दिसतात बरे पिच्चारला
नेतील तेवाच खरे .

गिरजा शंकर सीता राम यांना गुरु करू ,
..राव आपण दोघे संसारसागर तारू .

रुपयाची डबी त्यात आताराचा बोळा
..रावांचे बोलणे शंभर रुपये तोळा.

उभी होते मळ्यात ,
नझर गेली ख्ळ्यात,
हजाराची कंठी
..रावांच्या गळ्यात .

मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला,
..रावांचे आयुष्य वाढो हीच प्रथना तुला.

कुरुंदाची सहन चंदनाचे खोड
..रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड .

महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू ,
..रावांचे नाव घेऊन हिंदमातेचा जयघोष करू .

चांदीची फटफटी सोन्याची सीट ,
नवरा म्हणे बायकोला जाऊ आपण डबलसीट .

रामाने राज्य दिले भारत ने नाकारले
..रावांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले .

तळ्यातल्या चिखलात लाल कमल उमलले,
..राव खड्यात पडले ,त्यांना दुसर्याने काढले .

वाकडी तिकडी बाबुळ,तिच्यावर बसलेला होला
सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला .

कॉम्पुटर ल असते फ्लोपी डिस्क ,
हिच्याशी लग्न करून घेतली मोठी रिस्क .