Marathi Ukhane or saying is one part of the rituals in Maharashtrian Tradition.There are different timing on which a specefic person can choose marathi ukhane for senario.There are different types of ukhane’s used in wedding time.So have a look at following marathi ukhane ,only unique and good ukhane are here. :-
लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
—रावांना घास देताना,मला येई गोड हसू .
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
—राव म्हाजे माझ्या जीवनसाथी .
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
–रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.
आकाशाच्या अंगणात ,ब्रह्मा ,विष्णू आणि महेश,
…..रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश .
गर्द आमराई त्यामाध्ये पोपटाचे थवे,
….चे नाव माझ्या ओठी यावे .
५+४=एक़ुअल तु नाइन,
….इज माइन.
गोव्यावरून आणले काजू ,
..रावांच्या थोबाडीत द्यायला मी का लाजू .
वड्यात वडा बटाटावडा,
….मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा .
सुंदर सुंदर हरिणाचे इवले इवले पाय ,
आमचे हे अजून कसे नाही आले .
गटारात पडले कि काय .
डाळीत डाळ तुरीची डाळ ,
हिच्या मांडीवर खेल्विन एका वर्षात बाळ .
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान ,
…रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान .
एक होती चिऊ एक होती काऊ ,
..रावांचे नाम घेते काय काय खाऊ .
शिडीवर शिडी बत्तीस शिडी ,
…राव ओढतात विडी अन मी लावते काडी .
तेलाच्या दिव्याला तुपाची वात ,
..रावांशी केले लग्न ,आता आयुष्याची वाट .
विडाच्या पानात पावशेर कात ,
…रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात .
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू ,
लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ .
साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
…नाव घ्यायला आग्रह कशाला .
हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम ,
रावांचे चरण हेच माझे चारधाम .
आला आला रुकवत त्यावर चहाची किटली ,
नवरा नवरी सिनेमा बघायला बसली तर मध्येच फिलिंम तुटली
For More Visit.......
Facebook Page:-https://www.facebook.com/marathikhichadi
Twitter :-https://twitter.com/MarathiKhichadi