माघ कृ. चतुर्दशीस महाशिवरात्रम्हणतात. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील कृ. चतुर्दशी ही शिवरात्र असते. पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकर यांच्या उपासनेचा मानतात. या दिवशी उपवास करतात. भगवान शंकर यांना अभिषेक लघुरुद्र, महारुद्राने करतात. बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. शिव हि ज्ञानाची देवता आहे.त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे. कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेलेभगवान शंकर आपल्याला समजवतात की, 'शिव' म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे. शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही. कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो. श्रेयाच्या मार्गावरून जातांना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवत्व प्राप्त होत नाही. जीवनाच्यारोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाशिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो |हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ||
No comments:
Post a Comment