Marathi Attitude Sms

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात🚪 उभे राहु नका.

"मान-सन्मान 🙏🏻त्यांचाच करा......, जे तुम्हाला बरोबरीने सोबत👫👬 घेऊन चालतील.......!😉

चांगल्या लोकांची सोबत

लोक म्हणतात, पैसे जवळ ठेवा, वाईट वेळेत कामाला येईल.

आम्ही म्हणतो चांगल्या लोकांच्या सोबतीत रहा, वाईट वेळच नाही येणार.

कुणी लिहिले माहित नाही पण छान लिहिले एकदा अवश्य वाचुन पहा

"शब्द" बदलला की "अर्थ"
 बदलतो...😂

गरिब माणुस *दारु* पितो.
मध्यमवर्गीय *मद्यपान* करतो..
तर, श्रीमंत लोक *Drink's* घेतात...

काम केल्यावर गरिबाला *मजुरी* मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीयाला *पगार* मिळतो..तर, काम केल्यावर आॅफिसरला *Salary* मिळते...

गरिब करतो ते *लफडं*.
मध्यमवर्गीय करतो ते *प्रेम*..
तर, श्रीमंत करतो ते *Affair*...

शब्दाबरोबर शब्द मांडला की *कविता* होते
शब्दाने शब्द वाढला की *भांडण* होते..
शब्दाने शब्द वाढत गेला की लेखकाची *Royalty* वाढते...

पैशाने गरिब असलात तरी चालेल पण , मनाने श्रीमंत रहा कारण गरिबाच्या घरावर लिहीलेलं असतं *" सुस्वागतम् " !*
आणि, श्रीमंताच्या घराबाहेर लिहीलेलं असतं *" कुत्र्यापासून सावधान " !!*

आयुष्य आईसक्रीम सारखं आहे, *"Test"* केलं तरी वितळतं आणि, *"West"* केलं तरी वितळतं..

*काही राहिलं तर नाही ना !!!*

🌀*जीवनामध्ये तुम्ही खूप काही मिळवलं असलं तरी आयुष्याच्या प्रत्येक *टप्प्यावर पुढे जात असताना नेहमी हा प्रश्न सर्वांनाच पडतो...*
*"काही राहिलं तर नाही ना?”*

🌀*वर्षभराच्या पोराला बाईच्या हवाली टाकून जॉबसाठी जाण्याऱ्या आईला ती बाई जेव्हा विचारते*
*"पर्स, चावी घेतली ना, काही राहिलं तर नाही ना?”*
*ती आई कशी सांगेल कि ज्याच्या भविष्यासाठी एवढा आटापिटा चालू आहे तोच तर राहिला !!!*

🌀*खूप आशेने आईबापाने पोराला शिकविले. पोरगा परदेशात सेटल झाला. नातू जन्मला म्हणून आजी आजोबा टूरिस्ट विसावर गेले. ३ महिने झाल्यावर निघताना पोरगा सहजच बोलून गेला*
*"सगळ चेक करून घ्या, काही राहिलं तर नाही ना?”*
*काय उत्तर द्यावे त्या म्हातार्यांना कळेना कारण “आता मागे राहायला शिल्लक तरी काय आहे”*

🌀*लग्न होऊन पोरगी वरातीसोबत निघून गेली तेव्हा बापाला आत्या विचारते*
*“दादा, पोरगी काही विसरली नाही ना रे, काही राहिलं तर नाही ना?”*
*भूतकाळात गेलेल्या त्या बापाला पोरीच्या रूम मध्ये सुकलेली फुले दिसतात.*
*अश्रू लपवत लपवत बाप बोलला “ती गेली पण आठवणी इथेच राहिल्या, दुसरे काय राहणार”*

🌀*६० वर्षे वय झाल्यावर आज साहेबाचा ऑफिसमध्ये शेवटचा दिवस होता. चपरासी बोलला* 
*"साहेब, काही राहिलं तर नाही ना?”*
*साहेबानी डोळे बंद केले तर लक्षात* *आले कि पूर्ण आयुष्य या* *जागी काम करण्यात केले. सगळ्च* *इथे आहे मग “मागे काय राहणार”* 

🌀*स्मशानात आईच्या चितेला अग्नी देऊन बाहेर पडलेल्या पोराला मित्र विचारतो*
*“मित्रा, काही राहिलं तर नाही ना?”*
*तो धावत धावत परत अग्नीजवळ गेला. आईचा चेहरा पाहण्यासाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला.* 
*त्याला उमजेना कि काय राहून गेले. डोळे पुसत पुसत तो म्हणाला “काही नाही रे, जे राहिले ते आता सदा स्मरणात राहील”*

🌀*एकदा तरी वेळ काढून मागे बघा. जुन्या आठवणी ताज्या करा. डोळे भरून येईल. मन प्रफुल्लित होईल आणि आत्ताचा हा क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. .....  

👏👏👏

चिमणी आणि कावळा

. 👇 *लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट पुर्णपणे वाचा*👇
*(खरोखर सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण आहे)*

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. 

झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाच, ते गेले पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवलं, 

चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' 

चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. 

पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

👉 *गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध -* 

      चिमणीचे सगळे काम आटोपले
ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

'गेला असेल कुठेतरी... येईल परत' 

…. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं... 

अनेक दिवस उलटले ...

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... 

तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. 

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय! 

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?' 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा? 

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. 

तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती 

माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का?

 आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का?

 म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. 

जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

*- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.*

चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे... 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

- म्हणजे ?

- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानिच नसतं अगं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात...

*त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही*

…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो 

*…'थांब मला जरा करिअर करु दे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे ... थांब मला विश्रांती घ्यायची आहे ... थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.*

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. 

आपण फार एकटे झालेले असतो.... !!

- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

🌸मला कोणाचीच गरज नाही हा अहंपणा बाळगु नका 🌸

- वेळीच *'टकटक'* ऐकायला शिका.
वेळ प्रत्येकाची येते।।.

छत्रपती शिवाजी महाराज - सर्व पुस्तके

1. मृत्युंजय
2. छावा
3. बुधभूषण
4. राधेय
5. शिवरायांचे खरे शत्रू कोण
6. श्रीमान योगी
7. म्हणे लढाई संपली
8. शंभूराजे
9. शिवचरित्रातून उद्योगमंत्र
10. शंभूचरित्र
11. राजमाता जिजाऊ
12. छत्रपती शिवाजी महाराज
13. छत्रपती संभाजी महाराज
14. संभाजीराजे सांक्षिप्त जीवनपट
15. झुंज
16. मावळा
17. पावनखिंड
18. युगंधर
19. बजिंद
20. ययाती
21. किल्ले रायगड
22. छत्रपती शिवरायांची अस्सल छायाचित्रे
23. रायगडाची जीवन कथा
24.  तेरा पोवाडे
25. तोरणा
26. दुर्गरत्न
27. पुरंदर
28. प्रतापगड
29. प्रवास गडकोटांचा
30. महाराष्ट्र दर्शन
31. माझा राजा शिवाजी राजा
32. मुरुड जिंजीरा
33. राजगड
34. रायगड
35.  लोहगड
36. विजयदुर्ग
37. विशाळगड
38.  शिवनेरी
39. शिवाजी
40. सिंधुदूर्ग..

तुम्हाला पाहिजे असणारी सर्व पुस्तके खालील लिंक वर आहेत कधीही बघा, वाचा, download करा. महत्वाचे म्हणजे हा message share करा जेणेकरून सर्वाना याचा लाभ घेता येईल

https://drive.google.com/drive/mobile/folders/1-8PYwGN2D8rTHWNBjgBmVI9vCfrC8Unr

छत्रपती शिवाजी महाराज Status

"जर  शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
           -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.

"भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेन तर एकच पर्याय आहे,  शिवाजी महाराजा न प्रमाणे लढा !
                -- नेताजी सुभाषचंद्र बोस.

"नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या  शिवाजी महाराजा च्या इतिहासाची गरज आहे !"
                   -- अॅडॉल्फ हिटलर.

"शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर  शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
                 -- स्वामी विवेकानंद.

"जर  शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
              -- बराक ओबामा, अमेरिका.

"जर  शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
                  -- इंग्रज गव्हर्नर.

"काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला  शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? * सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
              -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)

"उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
               -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.

"क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
               -- बडी बेगम अलि आदिलशाह.

१७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकि एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳⛳⛳ 

अभिमान असेल तरच शेअर करा.......

पाच मूर्ख 😂

*बिरबलाने शोधलेले*
*पाच मूर्ख*

अकबराने एकदा बिरबलाला फर्मावले-
"आपल्या राज्यातले ५ सर्वात मूर्ख लोक शोधून माझ्यासमोर आणून उभे कर."

"हां खाविंद, पण मला एक महिन्याची मुदत द्यावी."

एक महिन्यानंतर बिरबल दोनच व्यक्तींना घेऊन दरबारात आला.

बादशहाने विचारले "अरे मी तुला ५ मूर्ख आणायला सांगितले होते."

बिरबल म्हणाला "खाविंद, एकेक मूर्खाला सादर करण्याची इजाजत मिळावी."

बिरबलाने पहिला मूर्ख सादर केला.

"महाराज, हा माणूस बैलगाडी चालवताना एक मोठे ओझे डोक्यावर घेऊन बसला होता. का तर म्हणे बैलाला जास्त ओझे पेलायला नको म्हणून!"

"आणि महाराज, हा दुसरा मूर्ख. ह्याच्या घराच्या छपरावर उगवलेले गवत गायीने खावे म्हणून तो तिला शिडीवरून छपरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत होता."

बादशहा म्हणाला "ठीक आहे. आता तिसरा मूर्ख दाखव."

"महाराज, मी ह्या राज्याचा प्रधान आहे. माझ्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. त्या सोडून मी ५ मूर्खांच्या शोधात फिरतोय म्हणून मी तिसरा मूर्ख."

"ठीक आहे. आता लवकरच चवथा आणि पाचवा मूर्ख मला दाखव."

"महाराज, आपली क्षमा मागतो; पण आपण ह्या राज्याचे राजे असून प्रजेकडे दुर्लक्ष करून मला नको ती कामे करायला सांगता हा मूर्खपणाच नाही का? म्हणून चवथा नंबर आपला!"

"असूदे असूदे. आता लवकर पाचवा कोण ते सांग

"महाराज, पाचवा  आपल्यासारख्या  मूर्खाच्या कोड्याचं उत्तर  जाणून घेण्यासाठी,  दैनंदिन कामकाज आणि जबाबदाऱ्या सोडून  हातात मोबाईल घेऊन चिकटून बसलेत ते

"शाबास बिरबल शाबास! ताबडतोब आपल्या सगळ्या ग्रुपवर फाॅरवर्ड कर. पाचवे कोण ह्या प्रश्नाच्या उत्तराची लोकं वाट पहाताहेत!"
😅😂😝😜😊😀😍😂😅
📲📲📲