विचार करायला लावणारी गोष्ट

विचार करायला लावणारी गोष्ट🌹
एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना सहज विचारले.
बाबा तुम्ही माझ्या १५ व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू देणार.?
वडिल म्हणाले त्याला खुप वेळ आहे बेटा. नंतर बघु
काही वर्षांनंतर १४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध पडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या वडिलांना संगीतले की तुमच्या मुलीला हृदयाचा विकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. मुलीने ने ऐकले आणि ती तिच्या वडिलांना 
म्हणाली बाबा डॉक्टर काका असे का म्हणाले की मी काही दिवसांनी मरण 
पावणार आहे ?
वडिल म्हणाले तस काही नाही गं
तु तर १०० वर्ष जगणार आहेस. मुलगी म्हणाली तुम्ही एवढ खात्रीशीर
कसं काय सांगू शकता.?
वडिलांनी संगितले मला माहित आहे.
उपचार चालु असताना ती काही महिन्यांनी १५वर्षांची झाली,आणि बरी होऊन जेव्हा ती आपल्या घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर तीला
एक पत्र तिला सापडले, त्यात लिहीले होते,
माझी लाडकी सोनी, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्या प्रमाणे सर्व काही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस ना की बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी काय भेटवस्तू द्याल ?तेव्हा मला माहित नव्हते परंतु आता मी तुला माझे हृदय भेट म्हणुन दिले आहे.पत्र वाचताना मुलीच्या डोळ्यातुन अश्रु ओघळु लागले पण ज्यांच्या खांद्याचा आधार घ्यावा ते वडील मात्र तीच्या जवळ नव्हते कारण आपल्या मुलीच्या सुखासाठी वडिलांनी आपले हृदय दान केले होते.
तात्पर्य -आपल्याला सुखी ठेवण्यासाठी आपल्या नकळत आई-वडीलांनी खुप त्याग केलेला असतो.
पण आपण खरच त्यांना समजुन घेतो का ?
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की आपले 
आपल्या आई-वडीलांकडे दुर्लक्ष होते 
काही जण त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात
त्यापेक्षा त्यांच्या सहवासात आपला पुरेसा वेळ घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने वागणूक द्या. मग बघा त्यांच्याही चेहऱ्यावर हा जन्म सार्थकी झाल्याचा आनंद नक्कीच दिसेल.

"माका मालवणी बायको व्हयी "

आज काल मुंबईत एक नविन Craze आली आहे...
जो तो उठतो तो म्हणतोय "माका मालवणी बायको व्हयी "
पण यांका काय माहित..मालवणी बाईल म्हणजे काय असता....?
मेल्यानु...बोलुच्या अगोदर थोडोसो विचार करा....
मालवणी बाईल म्हणजे साक्षांत...तलवार...ती पण दुधारी..
तोंडाचो दुपट्टो...आणि मालवणी गाळीयोंचो भांडार...एकदा का
बत्ती दिली कि मुलुख मर्दानी तोफ...शत्रुचा सोडा पण तुमचा
रोज काय होतोलो हाल..तलवारीक म्यान असता...
पणया समशेरीक म्याना पेक्शा अभिमान जास्त प्रिय असता...
पिसाळली तर वाघिण..
आणी प्रेमाचो वर्षाव केलात तर...तुमच्या साठी काळिज पण
हातात काढुन देईल
असा आसा आमचा मालवणी चेडु..तेव्हा पुन्हा एकदा विचार करा..
वाघिणिशी लग्न करुक वाघाच काळीज
लागता...आणी तिका खुश करुक...
मोगरयाचो गजरो नाय तर आबोलीचो वळेसार लागता.

😘बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!
***************
न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....
****
शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....
***
दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....
***
जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......
***
चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......
***
मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......
***
बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......
***
पटकन मोठी झालेली ती,
लग्न करून जाताना
"बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
****

       शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू ? पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर "जीव" असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही "सैराट" प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.


आवडल्यास नक्की शेअर करा.
😔👏👌

थंडीला सुरूवात झाल्या पासून सकाळी कितीही "अलार्म" वाजला तरी जाग येत नाही.

एक शक्कल लढवली. अलार्म चा टोन बदलला. मोदींच्या आवाजातील "भाईयों और बहनों" ठेवला.

देवाशप्पथ सांगतो, अलार्म वाजल्या वाजल्या घरातील सर्व मंडळी खड्कन् जागे झाले.

- कधी कसली घोषणा होईल याचा नेम नाही.😃😃😃😃😃

👉पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
     जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
        जग पाहिलं नव्हतं तरी
 नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला ..👈
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
 "नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
 "विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही… !!!💐

सुंदर काय असतं ???
जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं...ते मन सुंदर...
चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...ते विचार सुंदर...!!
कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...ते नाते सुंदर...!

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका..
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच  मोठी असते...

देवापुढे निरांजन लावलं की मन शांत होतं.
  घरात दिवे असूनही,
 निरांजनातून मिळणारा सात्विक प्रकाश
  आपल्याला अधिक प्रकाश देणारा ठरतो.
    सहवासातील माणसांचं देखील तसंच…
 एखाद्या सौंदर्यानं, प्रकाशानं दिपून जाणं
           हा काही क्षणांचा खेळ असतो.
    पण खरं आत्मिक समाधान हे
        समईच्या इवल्याशा तेजातच मिळतं.

⁠⁠⁠मनात खुप काही असतं सागण्यांसारख
पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ...

" जन्म हा एका थेंबासारखा असतो,
              आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
              मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "
👌              आजचा चिमटा               👌

रमेश व सुरेश दोन मित्र खुप वर्षां नंतर भेटतात:

रमेश : काय कसं काय चाललयं ? मुलं काय करत आहेत ?

सुरेश : मोठा मुलगा SBI मध्ये
 मोठी सुन ICICI मध्ये
 छोटा मुलगा HDFC मध्ये
 छोटी सुन PNB मध्ये
 मुलीच लग्न व्हायचय,  ती AXIS मध्ये .....

रमेश : व्वा, व्वा, व्वा !!! म्हणजे सगळे वेल सेटल्ड आहेत तर ! छान छान !

सुरेश : नाही रे, रांगेत उभे आहेत सकाळ पासून !!!

😊Saglyani ha msg
nakki vacha😊

लेखक : चंद्रशेखर गोखले यांची..

एंक खूप छान कथा.....

कायद्याने दोघे वेगळे
झाल्यावर त्याने
राहतं घर विकायला काढलं.

ब्रोकरच्या थ्रू तिच्या
वडिलानीच ते घर
विकत घेतलं......

पून्हा घराची
एक किल्ली
त्याच्या हातात
देत म्हणाले...

'मी माझ्या लेकीला
ओळखतो .....

तसा तुलाही.. ...

सगळ्या गोष्टी
भावनेच्या भरात करतोस...

अगदी माझ्या
लेकीशी लग्न सुद्धा......

पून्हा भावनेच्या भरात
एकत्र यावसं
वाटलं तर?

तसं व्हायला नको...

म्हणून
ही रिकामी वास्तू
तुझ्या हवाली
करतो......

कधी वाटलं तर
येऊन बसत जा.....

"भरल्या घरा पेक्षा
रिकामं घर जास्त
बोलतं आपल्याशी......"

भावनेपेक्षा विचार
जास्त ठाम असतात......

विचारांवर ठाम झालास
तर ......
घेतल्या निर्णयाचा
पश्चाताप होणार नाही.. ...

निर्णय ठाम झाला की
माझी किल्ली
मला परत दे. .....

नाहीतर येऊन
माझी मुलगी
परत घेऊन जा......'

आणि खरच तो
ढळत्या दुपारी
रिकाम्या घरात
बसायला लागला......

कलंडणारी ऊन्ह
आपल्या घरात

अशी ऐसपैस पसरतात
त्याला माहीतच नव्हतं... ...

मावळतीचा वारा
अख्ख्या घराचा
ताबा घेतो ..   ..

याची त्याला
कल्पनाच नव्हती...

एक चूकून राहिलेलं
'कालनिर्णय' होतं
भिंतीवर वार्‍याने
फडफडत होतं ....

त्या फडफडण्याचा
आवाज सुद्धा त्याला
नवा होता... ...

त्याने जवळ जाऊन
बघितलं ......
कसल्या कसल्या नोंदी
त्यावर तिने करून
ठेवल्या होत्या...

कसली बीलं
देण्याची तारीख,
दूधाचा हिशोब,
कामवालीचे खाडे,
पेस्ट कंट्रोलची
तारीख...

सिलेंडर संपल्याची तारीख,
ग्राहकचं सामान
येण्याची तारीख...

इस्त्रीचे कपडे
त्याचा हिशोब
या कशातच
तो सहभागी नव्हता... ..

अगदी तिच्या
महिन्याच्या तारखा...

तारीख पुढे गेलीतर....

त्याला गलबलूनच आलं ....

या कशा कशातच
आपण सहभागी नव्हतो.. ...

ती एकटीचा डाव
खेळत राहीली आणि
आपण फक्त.......

तक्रार करत राहिलो.....

त्याला त्या 'कालनिर्णय'
समोर उभं राहणं
शक्य होईना. .....

तो बेडरूम मधे आला
त्याने
खिडकी उघडली .....

खिडकीत तिने
हौसेनं लावलेली
शेवंती होती ......

वाळून वाळून
झूरायला आलेली ....

तिला भिजवयला
तो आतूर झाला,......

कातर झाला...

पाणी घालायला
भांड नव्हतं .......

त्याने कूंडीच
सींक मधे नेली
यथेच्छ पाणी शिंपडलं.....

तहानलेली शेवंती

गटा गटा पाणी प्यायली.. ....
आणि तोच तृप्त झाला......

तेवढ्यात लँच कीने
दार उघडल्याचा
आवाज आला .......

ती आली होती......

शेवंतीसारखीच... .....

तिला समोर बघून
तो उनमळून गेला... ...

काय अवस्था
करून घेतली
आहे हिने... ....

हिच्या आयुष्यातलं
आपलं स्थान
आपल्या लक्षात
कसं आलं नाही?... ....

की आपण लक्षात
घेतलं नाही?
जिद्दीला पेटून
भांडते तेंव्हा
ती कुठल्याही
टोकाला पोहोचते
हे काय आपल्याला
लग्नाआधी माहीत नव्हतं?.....

दोघांची नजरा नजर झाली...

दोघे क्षणभरासाठी स्तब्ध.....

ती म्हणाली,

"मी ही शेवंतीच
न्यायला आले
होते... "

तो गलबलून म्हणाला,

"आत्ताच पाणी दिलय... ...

तिचं निथळणं
संपेपर्यंत थांब ना......"

आणि ती थांबली......

..अगदी...   कायमची...!!!

पाहताक्षणी एखादी
व्यक्ति आवडणं
हे 'आकर्षण'असतं.....

परत पहावसं वाटणं
हा 'मोह'असतो....

त्या व्यक्तिच्या
जवळून जाण्याची
इच्छा असणं
ही'ओढ'असते.....

त्या व्यक्तिला
जवळून जाणणं
हा 'अनुभव' असतो.....

आणि त्या व्यक्तिला
तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं .......

हेच खरं "प्रेम" असतं.....

हेच खरं "प्रेम" असतं.....

नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका
स्वीकारण्यात आहे.....

कारण एकही
दोष नसलेल्या
माणसाचा
शोध घेत बसलात.......

तर आयुष्यभर
एकटे राहाल......

विश्वास उडाला
की आशा संपते......

आणि काळजी घेण
सोडल की प्रेम......

म्हणुन, विश्वास ठेवा,....

आणि काळजी घ्या.......

आयुष्य खुप सुन्दर आहे.......

एटीएम बाहेर रांगा लावून उभा असणारा एक माणूस गैरसोईबद्दल तक्रार करत होता
बाजूचा मोदीभक्त त्याला म्हणाला सैनिक सीमेवर चोवीस तास उभे आहेत आणि तुम्ही देशासाठी एवढं पण नाही करू शकत ?

त्या माणसाने मोदीभक्ताच्या कानाखाली जाळ काढला
मोदीभक्त : का मारलं मला? मी काय केलंय?

रांगेतला माणूस : तिथे जवान सीमेवर गोळ्या खात आहेत आणि

तुम्ही साधी एक झापड खाऊ शकत नाही ???

😀😁😀😁😀😁😀

खुळता कळी खुलेना

आणि,

मोदी काय करेल

कुणाला  कळेना....!!

आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला
जेव्हा ४ -५ तास लाईनमध्ये राहून एक बाई २००० ची नोट बघून म्हणाली
" भाऊ , याच्यात अजून कलर दाखवा ना "
😜

नोटसम्राट.....😝😜😜

To be change or not change ,
That is the Question..

एका बाजुला ज्यांना आम्ही दोन दिवसापुर्वी सुट्टे दिले ते आम्हाला विसरतात,,,
आणि दुसय्रा बाजुला आम्ही ज्यांच्या कडुन 500-1000 घेतले तेही आम्हाला विसरतात....
कुणी,सुट्टे देता का रे? सुट्टे....
एका तूफानाला कुणी सुट्टे देता का?

एक तूफान 500 घेऊन,
1000 घेऊन
घरा घरात हिंडत आहे.
कुणी सुट्टे देईल म्हणून,
अशी जागा ढूंढत आहे,
कुणी, सट्टे देता का रे?सुट्टे..
😜😜😜😝😝😂😂😂😆😆😆

च्याइला जेवढ्या नोटा नाहीत तेवढे मॅसेज आलेत😂😂

पोरि टेन्शन मध्ये
.
.
.

.
.
.
.
पोरांना लुटणार किती १०० रुपयात
😜🤕😬😂😂😂😂😝

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

*या योजनेची गरज का पडली?*

उ. काळा पैसा, बनावट नोटा आण दहशतवाद्यांना पुरवला जाणारा पैसा रोखण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची गरज पडली. बनावट नोटा चलनात मिसळल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. या नोटा हद्दपार करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं.

*काय आहे योजना?*

उ. चलनातून 500, 1000 च्या नोटा रद्दबातल करण्यात आल्या आहेत. कसल्याही व्यवहारासाठी या नोटांचा वापर करता येणार नाही. केवळ 11 नोव्हेंबरपर्यंत रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी या नोटांचा वापर करता येणार आहे. तुमच्याकडील 500, 1000 च्या नोटा आरबीआयचे देशातील 19 कार्यालये, कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करता येणार आहेत.

*नोटांच्या बदल्यात काय मिळणार?*

उ. जमा केलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात तुम्हाला सर्व रक्कम जशास तशी मिळणार आहे. यामध्ये कुणालाही तोटा होणार नाही.

*जुन्या नोटांच्या बदल्यात पैसे लगेच मिळणार का?*

उ. नाही, प्रति व्यक्ती केवळ 4 हजार रुपये मिळतील. बाकी रक्कम तुमच्या खात्यात जमा राहिल.

*सर्व नोटा जमा केल्या तरी तातडीने बदलून का मिळणार नाहीत?*

उ. या योजनेत अशी सुविधा देण्यात आलेली नाही. कारण 100 च्या नोटांचा तुटवडा निर्माण होईल म्हणून टप्प्याटप्प्याने नोटा बदलून मिळतील.

*4 हजार रुपये माझ्या गरजेसाठी कमी आहेत, मग काय करु?*

उ. इतर गरजांसाठी तुम्ही मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करु शकता.

*माझं कोणत्याही बँकेत खातं नसेल तर काय करायचं?*

उ. कागदपत्र जमा करुन कोणत्याही बँकेत खाते उघडू शकता.

*माझ्याकडे फक्त जनधन योजनेंतर्गत उघडलेलं खातं आहे, तर काय करावं?*

उ. जनधन योजनेंतर्गत खाते असणाऱ्या खातेधारकांना जुन्या नोटा जमा करुन त्याबदल्यात बदल्यात नव्या नोटा मिळतील.

*माझ्याकडील नोटा कुठे-कुठे बदलून मिळतील?*

उ. तुमच्याकडच्या 500, 1000 च्या नोटा रिझर्व्ह बँकेची सर्व कार्यालये, बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळतील.

*मला फक्त माझं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल का?*

उ. 4 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आवश्यक कागदपत्र घेऊन तुम्ही कुठल्याही बँकेत जाऊ शकता. मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम जमा करण्यासाठी तुमचं खातं असलेल्या बँकेतच जावं लागेल.

जर तुमचं कोणत्याच बँकेत खातं नसेल तर आरबीआयने जारी केलेला नोटा बदली फॉर्म भरुन सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड अशा आवश्यक कागदपत्रांसह बँकेत तुमची माहिती द्यावी लागेल. मग तिथे तुम्हाला नोटा बदलून मिळतील.

*मी माझ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊ शकतो का?*

उ. होय

*माझ्या बँकेशिवाय कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळतील का?*

उ. होय. आवश्यक कागदपत्रांसह 4000 रुपयांपर्यंतची रक्कम कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता.

*माझं बँकेत खातं नाही. मात्र माझ्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या खात्यामार्फत पैसे बदलून घेऊ शकतो का?*

उ. जर तुम्हाला तुमचे नातेवाईक किंवा मित्र लेखी परवानगी देत असतील तर तुम्ही त्यांच्या खात्यामार्फत नोटा बदलून घेऊ शकता.

*मला स्वतःलाच बँकेत जावं लागेल, की इतर कोणाला पाठवलं तर चालेल?*

उ. जर तुम्ही स्वतः बँकेत गेलात तर उत्तमच आहे. मात्र तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या प्रतिनिधीला परवानगी पत्र देऊन पाठवू शकता. प्रतिनिधीजवळ तुमचं एखादं ओळखपत्र असणंही गरजेचं आहे.

*मी एटीएममधून पैसे काढू शकतो का?*

उ. यासाठी काही वेळ लागणार आहे. बँकांनी एटीएममध्ये 100 च्या नोटा भरल्यानंतर तुम्हाला पैसे काढता येतील. 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज केवळ 2 हजार रुपये एटीएममधून काढता येतील. 19 नोव्हेंबर नंतर ही मर्यादा 4 हजार रुपयांपर्यंत वाढवली जाईल.

*मी चेकने पैसे काढू शकतो का?*

उ. चेकने पैसे काढता येतील. चेकने पैसे काढण्याची कमाल मर्यादा 10 हजार दररोज आणि आठवड्याला 20 हजार रुपये एवढीच आहे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून दोनदाच पैसे काढू शकता. 24 नोव्हेंबरपर्यंत ही मर्यादा लागू आहे.

*एटीएम, कॅश डिपॉझीट मशिन यांच्यामार्फत पैसे जमा करु शकतो का?*

उ. होय

*मी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन फंड ट्रान्सफर या सुविधांचा वापर करु शकतो का?*

उ. होय

*माझ्याकडच्या नोटा कधीपर्यंत बदलून घेऊ शकतो?*

उ. ही योजना 30 डिंसेबरला बंद होणार आहे. त्यामुळे दिलेल्या कालावधीतच नोटा जमा कराव्या लागतील. मात्र या कालावधीत ज्यांना नोटा जमा करणं शक्य नाही, त्यांनाही पुन्हा जुन्या नोटा बदलून घेण्याची संधी मिळणार आहे. आरबीआयच्या ठराविक कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासह या नोटा जमा करता येतील. या प्रतिज्ञापत्रात तुम्ही तुमच्याकडील पैशाचा स्रोत सांगणं गरजेचं आहे.

*मी सध्या भारताबाहेर आहे, तर काय करावं?*

उ. तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईकामार्फत पैसे जमा करु शकता. त्यासाठी नातेवाईकाकडे तुमचा अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी कोणतेही अधिकृत ओळखपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

*मी अनिवासी भारतीय आहे, माझं बँक खातंही एनआरओ असेल तर काय पर्याय आहे?*

उ. तुम्ही तुमच्या याच खात्यात पैसे जमा करु शकता

*मी परदेशी पर्यटक आहे, माझ्याकडच्या नोटांचं काय करावं?*

उ. एअरपोर्ट एक्स्चेंज काऊंटवर जाऊन तुम्ही तुमच्या नोटा बदलून घेऊ शकता.

    *23. मला (रुग्णालय, औषध खरेदी, प्रवास) यांसाठी पैशांची गरज असेल तर काय करावं?*

उ. रेल्वे स्थानक, रुग्णालये, बस स्थानक, एअरपोर्ट अशा ठिकाणी 11 नोव्हेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र औषध खरेदीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी गरजेची आहे.

    *24. यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?*

उ. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, मतदान कार्ड अशी कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.

    *25. या योजनेविषयी अधिक माहिती मला कुठे मिळेल?*

उ. तुम्ही www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

    *26. मला काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर मी काय करावं?*

उ. तुम्ही कधीही आरबीआयच्या publicquery@rbi.org.inया ईमेल वर तुमची समस्या पाठवू शकता. किंवा 022 22602201/022 22602944 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

एका घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...

आज न राहवून
थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,

"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...

"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...

"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

*आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...*
*तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.*

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर व् मित्रांवर  रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
*तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.*
*आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.*

तर चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

*Be positive and be happy...!*

का असा माझा अचानक कोरडा श्वास झाला,
माझ्याच सावलीचा मजलाच भास झाला....

बंध बांधतो विश्वासाचे माणुस जोडण्या,
स्वार्थ संपला अन् पोरका विश्वास झाला....

माणसेही नेक होती मिळून सर्व एक होती,
वाटत आता ते स्वप्न होते की आभास झाला.....

असो काही झालं गेलं न्यात्यांची त्यात होती ओल,
क्षणीक क्षणभंगुर पण नष्ट तो गोड सहवास झाला.....

असे सहज झाले आता श्वासांचे होणे ओले कोरडे,
माणसांच्या माणुसकीचा मजला अभ्यास झाला.....

श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी जि. वर्धा
7875031852

एक माणूस परीस (पारस) शोधायला निघाला.
त्यासाठी
रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा ...
आणि
फेकून द्यायचा ....
असा त्याचा दिनक्रम सुरू झाला...
दिवस गेले,
महिने लोटले..
वर्षे सरली..
पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.
दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा
आणि
मग तो फेकून द्यायचा..
शेवटी तो माणूस म्हातारा झाला...
आणि
ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता ....
त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले,
ती साखळी सोन्याची झाली होती...
दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा
आणि
फेकून द्यायचा...
या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले
नाही..
तात्पर्य :-
प्रत्येकाच्या जीवनात
एकदा तरी परीस येत असतो...
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तरकधी भाऊ-
बहीनीच्या नात्याने..
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ...
तर कधी प्रेयसीच्या नात्याने....
कोणत्या ना कोणत्यारूपात तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच
हातभार असतो ......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू
शकतात.....
"माझ्या आयुष्यातील त्या सर्व परिसानां, मित्रांना।
आणि
अनामिक नात्यांना
माझा नमस्कार
#Marathikhichadi

बरोबर ना मित्रहो? ???????

😊😊😊
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
.
.

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺
.
.
खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺

.
.
गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे☺
.
.
.
सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई☺

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले☺

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ☺

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!☺

आजच्या फोर व्हीलर long drive .
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!☺
.
.
गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |☺
.🍁life is very critical.🍁🌷🌷😌😌

?😝धम्माल विनोद😝?
एकदा गुरूजींनी फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले -
72, 82, 80, 89, 99
व गणूला वाचायला सांगितले. गणू बोबडा होता. त्याने ते वाचले अशाप्रकारे 👇
72     शेवंती तु ?🙎
82     येती तु ?
80     येती ?
89     येती नाय ?
99     नाय त नाय ...
😝😝😝😝😄😄😄😂😂😂

गुरूजी नोकरी सोडून गेले....