एक माणूस परीस (पारस) शोधायला निघाला.
त्यासाठी
रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा,
गळ्यातल्या साखळीला लावायचा ...
आणि
फेकून द्यायचा ....
असा त्याचा दिनक्रम सुरू झाला...
दिवस गेले,
महिने लोटले..
वर्षे सरली..
पण
त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही.
दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा
आणि
मग तो फेकून द्यायचा..
शेवटी तो माणूस म्हातारा झाला...
आणि
ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता ....
त्यावेळी अचानक त्याचे लक्ष
त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले,
ती साखळी सोन्याची झाली होती...
दगड घ्यायचा,
साखळीला लावायचा
आणि
फेकून द्यायचा...
या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले
नाही..
तात्पर्य :-
प्रत्येकाच्या जीवनात
एकदा तरी परीस येत असतो...
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तरकधी भाऊ-
बहीनीच्या नात्याने..
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ...
तर कधी प्रेयसीच्या नात्याने....
कोणत्या ना कोणत्यारूपात तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच
हातभार असतो ......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू
शकतात.....
"माझ्या आयुष्यातील त्या सर्व परिसानां, मित्रांना।
आणि
अनामिक नात्यांना
माझा नमस्कार
#Marathikhichadi

No comments:

Post a Comment