विचार करायला लावणारी गोष्ट

विचार करायला लावणारी गोष्ट🌹
एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना सहज विचारले.
बाबा तुम्ही माझ्या १५ व्या वाढदिवशी कोणती भेटवस्तू देणार.?
वडिल म्हणाले त्याला खुप वेळ आहे बेटा. नंतर बघु
काही वर्षांनंतर १४ वर्षांची असताना ती मुलगी अचानक बेशुद्ध पडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या वडिलांना संगीतले की तुमच्या मुलीला हृदयाचा विकार आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे. मुलीने ने ऐकले आणि ती तिच्या वडिलांना 
म्हणाली बाबा डॉक्टर काका असे का म्हणाले की मी काही दिवसांनी मरण 
पावणार आहे ?
वडिल म्हणाले तस काही नाही गं
तु तर १०० वर्ष जगणार आहेस. मुलगी म्हणाली तुम्ही एवढ खात्रीशीर
कसं काय सांगू शकता.?
वडिलांनी संगितले मला माहित आहे.
उपचार चालु असताना ती काही महिन्यांनी १५वर्षांची झाली,आणि बरी होऊन जेव्हा ती आपल्या घरी आली तेव्हा तिच्या पलंगावर तीला
एक पत्र तिला सापडले, त्यात लिहीले होते,
माझी लाडकी सोनी, जर तु हे पत्र वाचत असशील तर माझ्या म्हटल्या प्रमाणे सर्व काही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस ना की बाबा तुम्ही माझ्या १५व्या वाढदिवशी काय भेटवस्तू द्याल ?तेव्हा मला माहित नव्हते परंतु आता मी तुला माझे हृदय भेट म्हणुन दिले आहे.पत्र वाचताना मुलीच्या डोळ्यातुन अश्रु ओघळु लागले पण ज्यांच्या खांद्याचा आधार घ्यावा ते वडील मात्र तीच्या जवळ नव्हते कारण आपल्या मुलीच्या सुखासाठी वडिलांनी आपले हृदय दान केले होते.
तात्पर्य -आपल्याला सुखी ठेवण्यासाठी आपल्या नकळत आई-वडीलांनी खुप त्याग केलेला असतो.
पण आपण खरच त्यांना समजुन घेतो का ?
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे व्यस्त होतो की आपले 
आपल्या आई-वडीलांकडे दुर्लक्ष होते 
काही जण त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात
त्यापेक्षा त्यांच्या सहवासात आपला पुरेसा वेळ घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने वागणूक द्या. मग बघा त्यांच्याही चेहऱ्यावर हा जन्म सार्थकी झाल्याचा आनंद नक्कीच दिसेल.

No comments:

Post a Comment