Satya Narayan

आपल्या घरच्या बायाला हे
वाचून दाखवा 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
भटांचा सत्यनारायण कोठुन आला
👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

🌞कथा ही सत्य नारायणाची 🌞
    🌞आधुनिक सत्य कथा 🌞

ऐका सत्य नारायणाची कथा...
दूर होतील आता तुमच्या व्यथा,
21व्या शतकात सुरू होईल नवीन प्रथा।।
हा! हा!! हा!!!

पुण्यात एक प्रतिष्ठीत ब्राम्हण पंडित होते, त्यांची एक विधवा मुलगी होती.नाव तिचं सत्या  ती विधवा असल्यामुळं फारशी चारचौघात मिसळत नसे.तिचे ब्राह्मणाने मुंडण केलेले होते.

तरीही ती खूप सुंदर दिसत  होती ,आणि मुख्य म्हणजे तरुण होती .सदर ब्राह्मणाच्या घरी एक माळी होता ,बागकाम करायला.फावल्या वेळेत इतर कामात मदत करायचा. त्याच नाव होतं नारायण.त्याची ये जा घरात चांगलीच होती.या कामाच्या येण्याजाण्यात त्याची अपघातानं या कन्येशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं. आगीजवळ लोणी आलं अन ते वितळलं. तिला दिवस गेले ,पण ही गोष्ट लक्षात यायला खूप उशीर झाला होता.कारण विधवेकडे लक्ष कोण देतो ? हे दुर्लक्ष महाग पडलं . ब्राम्हणाचा नाईलाज झाला .त्यानं मुलीला अडगळीच्या खोलीत कोंडलं, आणि नारायणाला मारुन टाकलं .

इकडे गरोदर मुलीचे नऊ महिने पूर्ण झाले ,एका रात्री या विधवेनं पहाटे चार वाजता एका गोंडस बाळाला जन्म दिला .ब्राम्हणानं ते बाळ उचललं आणि परसदारी  नेऊन केळीच्या बनात केळीच्या बुंध्याशी ठेवलं .ते रक्तानं माखलेलं बाळ ठेवताना ती केळही रक्तानं माखली . ब्राम्हणाला वाटल,ं कुणी श्वापद येऊन ते बाळ खाऊन टाकील आणि आणखी पाप
होण्यापासून आपली सुटका होईल .पण झालं उलटच!

ते बाळ थंडीमुळं आणि चिलटं चावल्यामुळं  व्याकुळ होऊन टाहो फोडून रडायला लागलं . त्या चिमण्या आवाजानं आसमंत जागं झालं . काही लोकांना आवाज आला .कुणाचं बाळ इतक रडतयं हे पाहाण्यासाठी लोक जमू लागले .पहाट झाली .सगळा गाव गोळा झाला . इकडे ब्राम्हणाला कुणकुण लागली.काहीच घडलं नाही अशा अविर्भावात ब्राम्हण केळीच्या बागेत आला आणि जोर जोरात ओरडू लागला केळ व्यायली, केळ व्यायली!केळीनं दिव्य बाळाला जन्म दिला!! चमत्कार झाला!!! भाबड्या लोकांचा या चमत्कारावर लगेच विश्वास बसला. कारण केळीवर रक्ताचे डाग होतेच. लोकांनी बाळाला उचललं. कपड्यात गुंडाळलं .पण बाळ रडायचं काही थांबेना . कारण बाळ भुकेजलेल होतं .

आता बाळाला दुध कोण पाजणार  ? मग ब्राम्हणानेच युक्ती सुचवली .म्हणे गावात दवंडी पिटवा ,जी महिला बाळाला गप्प करील तिला हे दिव्य बालक दिलं जाईल. दिव्य बालक मिळेल या लालसेनं महिलांची रांग लागली . पण असा कसा कुठल्याही बाईला पान्हा फुटेल ? गावातल्या सगळ्या बाया येऊन गेल्या . बाळ काही रडायचं थांबत नव्हतं .शेवटी शोध सुरु झाला कुणी बाई राहिली आहे का ? कुणीतरी सुचवलं की ब्राम्हण पंडिताचीच विधवा मुलगी आता शिल्लक राहिली आहे. तिला तरी आणून बघा .मग तिला बोलावण्यात आलं.तिनं बाळाला जवळ घेताच बाळ गप्प झालं.झालं!!! उध्दार झाला ब्राम्हणाच्या पोरीचा! मग त्या अनौरस दिव्य बालकाचं नाव ठेवले गेलं,
सत्या + नारायण =सत्यनारायण! केळीच्या पोटी जन्म झाला म्हणून सत्यनारायण चार केळीच्या खांबामध्ये ठेऊन पुजला जातो . अशी हि साठाउत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मित्रांनो ही कथा वाचल्यावर पुराणकथा कशा रचल्या गेल्या असतील ह्याची कल्पना यावी. हा पगडा एवढा जबरदस्त आहे की, अशी व्रते करण्यात स्त्रियाच आघाडीवर असतात.कारण पुरूषाने धार्मिकतेच्या आडून स्त्रियांना मानसिक गुलाम बनवले आहे. अशा कथांतून स्त्रीचा आणि पर्यायाने पूर्ण कुटूंबाचा उद्धार होतो असे भासवले जाते.

शिवरायांच्या काळात सत्यनाराणाचा मागमूस नव्हता, म्हणूनच शिवाजी राजांनी कधी सत्यनारायण पूजल्याचा दाखला इतिहासात सापडत नाही.त्याचा जन्म उत्तर पेशवाईत झाला. कारण ब्राह्मणांना पेशव्यांकडून मिळणारा रमणा म्हणजे दक्षिणा मिळणे बंद झाले.सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सत्येन पीर हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत.नंतर ब्राह्मणही जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले. पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या ‘ सत्ये’ चा ‘ सत्य’ केला आणि ‘ न’ चा ‘ नारायण’ झाला आणि ‘सत्य- नारायण’ अस्तित्त्वात आला.ब्राह्मण पुरोहित वर्गाने हा नवा धंदा तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला. त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या.स्कंद पुराणात सत्यनारायणाची कथा घुसडली आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा टच दिला.

गाडगे बाबांनी तर या देवाला चुलीत घाला म्हणून सांगितलंय .जर सत्यनारायण साधूवाण्याची बुडालेली  बोट वर  काढू शकतो तर दुस-या महायुध्दात बुडालेल्या बोटी सत्यनारायण घालून वर काढून दाखवा , आव्हानही त्यांनी धर्म मार्तंडांना केलं होतं. आजवर ते शक्य झालेल नाही.

म्हणून मित्रांनो, आतातरी डोळे उघडा.आख्खा हिंदू धर्म भटांच्या थोतांडांनी ,खोट्या भंपक कथांनी विकृत झालाय, हे समजून घ्या. आणि कर्मकांड टाळा. नशीबापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. वैज्ञानिक सृष्टी जशी आपलीशी केलीत तशीच वैज्ञानिक दृष्टीही स्वीकारा म्हणजे आत्मविश्वासाने संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल.

No comments:

Post a Comment