बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती

"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..

पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??

तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.

आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो

आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,

ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻

या मेसेज़ला शेयर करायला कोणतीच शपथ नाहिये.
आवडला तर नक्कीच शेयर करा..🤗

माननीय सुप्रीम कोर्ट.
सप्रेम नमस्कार

पत्र लिहिण्यास कारण की..

गणपती रमी खेळायला 7 जण बसायचे कि 5?
😂😂😂😂😂😂

माननीय सुप्रीम कोर्ट.
सप्रेम नमस्कार
पत्र लिहिण्यास कारण की..गणपतीला आरती ला कितीजण बोलवू.??😂😂😂😂

नमस्कार,
आपणांस विनंती करतो की जे चाकरमानी गावाकडे येत आहे त्यांना गावी आल्यावर  घ्यावयाची काळजी.
१. लोकांच्या भेटा घरच्या उंदराकडून खाण्याआधी पोहोच करा.
२. गणपतीची मूर्ती उचलून घ्यायला शक्य असेल तरच घ्या  अन्यथा उगाच गावच्या पोरांकडे शायनिंग मारू नका.
३. आरत्या व्यवस्थीत पाठांतर करून जा.
४.  आरती करताना बाहेर काढलेल्या चप्पलांकडे लक्ष ठेऊ नका.
५. आरती चालू असताना एखादी पाहूणी मला पाहत तर नसेल ना हे मनातून काढून टाका.
६. शंका असल्यास शेजारच्या भल्या माणसाकडे पहा.
७. विनाकारण कोणाकडे पाहून हसु नका.
८. आरतीला / भजनाला जाताना सामान, पेटी, टाळ पखवाज ढोलकी, ईत्यादी घ्यायची स्वताला सवय लावा, त्या साठी कोणतीही व्यक्ती नेमली नाही हे स्वताला सांगा.
९. प्रसाद घेताना तो प्रसाद म्हणूनच घ्या हे मनाला समजवा.
१०. आरती ही सामुदायीक करावयाची आहे.
११. ज्याच्या हातात टाळ नसेल त्यानी टाळी वाजवली तरी चालेल.
१२. आरती एकाच सुरात असावी, मोठ्याने बोलण्याचा अतीरेक टाळा, मुकेपणामुळे पानसुपारी,गुटखा खाल्याचा संशय टाळा.
१३. पुढची घरे टाळण्यासाठी लहान मुलांना घेउन येवू नका.
१४. आरती जातो सांगुन वाडीतील ईतरांची काकडी, तोवशी  तोडू नका, कारण रात्रीस (खेळ )चाळे  लक्षात ठेवा.
१५. भजनाला बसल्यावर मीसकाँल मारू नका, तेने वातावरण दुषित होते.
१६. खाण्यासाठी ठेवलेला अल्पोपहार हा अल्पच समजावा.  🎹🎹🎹🎤  चला तर मगं,  याहां सगळे जण, वाट पाहतोय श्री गणपती......'👏🏼😊

विसरलोय मी....

विसरलोय मी....
.
विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

विसरलोय मी....
सरळ मनावर वार करणारा तिचा एक कटाक्ष
विसरलोय मी....
तेव्हाची रिमझिम पावसाची साक्ष

विसरलोय मी....
तिच चिडून मला खडूस म्हणन
विसरलोय मी....
लटक्या रागात सुद्धा प्रेमान काळजी घेण

विसरलोय मी....
दोघांनी घेतलेला वाफाळलेला चहाचा कप
विसरलोय मी....
तिने दिलेलं चाफ्याचं रोप

विसरलोय मी....
मला सतवण्यासाठी तिच मुद्दाम अबोल राहण
विसरलोय मी....
मला बोलता बोलता निशब्द करण

विसरलोय मी....
आमच्यात भांडणाच, मैत्रीच, आणि .....प्रेमाचं बोलण झालेलं
.
.
.
आणि
विसरलोय मी....
तिने मला " मला विसर " म्हटलेलं....

अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा  
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life ...

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात...
👌👌👌👌👌👌

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगा ‘प्ले झोन’ मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नांवाला.
माणसं वाचत बसलो होतो.
विविध चेहऱ्यांची, आकारांची
माणसं जणू ‘आज जगाचा शेवटचा दिवस असावा’ असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)

माझं ‘माणसं-वाचन’ चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
न राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’

‘प्रचंड. रीडिंग इज माय ‘फर्स्ट लव्ह’.
’आजूबाजूला ‘सौ’ नाही हे बघत मी म्हटलं.

‘किती वाचता रोज?’
‘रोज असं नाही…अं.. अं…काही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

‘खायला आवडतं?’
कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

‘प्रचंड. इटिंग इज माय ‘सेकंड लव्ह’.’

‘हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा….?’

‘नाही नाही…रोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
’हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

‘बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

‘वेळ मिळत नाही. मी काढतो.
‘वेळ’ ही जगातली सगळ्यात ‘टेकन फॉर ग्रान्टेड’ गोष्ट आहे असं मी मानतो..

फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना !
फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
‘मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तो ‘यम’ त्याला हंसत असेल !’

मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो. ‘आय ऍम प्रीटी सिरीयस.. तुम्ही पाहिलंय यमाला ?

हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मला ‘मृत्यूने’ दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..

हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
मी ‘देव’ पाहिला नव्हता पण ‘मृत्यू’ पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो. 

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही ‘मी’ अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

‘अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

‘साफ चूक' !  माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतर ‘उद्या’ नसतो !’

‘मी समजलो नाही.’

‘प्रत्येक काम आपल्याला ‘उद्यावर’ टाकायची संवय असते..
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे…
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपण ‘आज’ उपभोगत नाही..
ते कुठेतरी गुंतवतो.....  भविष्यात ‘डबल’ होऊन येतील म्हणून ! 

या ‘उद्या’ वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हा ‘उद्या’ बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजे – आहोत तिथे,
आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील या ‘अन्याया’ विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडका ‘उद्या’ पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

इतके दिवस जेवण नुसतंच ‘गिळलं’.
या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची..
आयुष्याची ‘चव’ घेत जगायचं. ’

‘म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

‘माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

‘कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचा ‘सीईओ’ वगैरे… जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

‘वेल… तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी ‘माझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
‘मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

‘म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
‘मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत..
स्वामी विवेकानंद
फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादि इत्यादि’....

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

‘या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

मी काय करतो… अं…उदाहरण देतो…
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. 

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’

मी त्या तरुणाला नांव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

तुम्ही…प्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’ मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’

परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा  
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life .

बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात.

ज्याने रचना केली त्याला 100000 सलाम
👍👍👍🙏👌👌👌
घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? 🐜🕊
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही 🐅
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?🎭
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?🕴
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
🐕
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?🐂
कष्टकर्याची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे🤕
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत🐧
🐝मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग😎
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?🌊💦
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय🎑
निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
फक्त हिमतीने लढ👊
🌺🌷!! आवडली तर इतरांनाही Share करा !!🌹🌹🙏🏻

कैलासावर सुरु झाली सामानाची तयारी🎒👜
लहानग्या गणपतीची निघणार होती स्वारी👶😊

पार्वती आली करुन हरितालिकेची पूजा🍃🌸
दूध आणून म्हणाली गणपतीला,"ऊठ माझ्या राजा"☀🍼

शंकराने गणपतीला गंगेत घातले न्हाऊ🚿💧
म्हणाले, "गणोबा, तिकडे मोदक खूप नका खाऊ"🌝🌝

कार्तिकेयाने दिले त्याला नवे पिवळे पीतांबर🌟
म्हणाला, "गणू, दहा दिवस संपवून खेळायला ये लवकर"👬🎾

पार्वतीने दिले प्रवासासाठी लाडू🍪☺
म्हणाली, "उंदराला ही दे, वाटेत नका रे भांडू"🐭

या सगळ्यातंच गणपतीला आलं जरा भरुन😢
पण भक्तांच्या प्रेमापोटी रडू घेतलं आवरुन😌

शेवटी शंकराला मिठी दिली पार्वतीला पापा😘
आणि माझ्या घरी येतोय माझा गणपती बाप्पा🏡

।। बोला गणपती बाप्पा ।।

मी *"बाबासाहेबांवर"* कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
*"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"*🙁
मी *"छत्रपतींवर"* कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
*"तुम्ही मराठा आहे का?"*

मी *"फुल्यांवर"* कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
*"तुम्ही माळी आहे का?"*😟
मी *"अहिल्या देवींवर"* कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
*"तुम्ही धनगर अहात का?"*😠
मी *"माणसावर"* कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....🤔
वाट पाहतोय.......🙄
“ती"माणसे गेली कुठे...😕
माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त जात जिवंत ठेवली आहे..

मसाला पाव


साहित्य : अर्धी वाटी अमूलचे बटर , अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा ,अर्धी वाटीबारीक चिरलेला टोमॅटो , एक बारीक चिरलेली सिमला मिरची (ढोबली) अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , दोन टेबलस्पून पाव भाजी मसाला,एक टेबलस्पून ब्याडगी मिरचीची पावडर ,चवीनुसार मीठ ,एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा हळद,एक टेबलस्पून आले-लसूण- हिरवी मिरची यांची पेस्ट ,चवीनुसार मीठ.
सजावटीसाठी एक कांदा-बारीक चिरून,एक लिंबू – आठ तुकडे करून,अर्धी वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : गॅसवर तवा ठेऊन त्यावर अमूलचे बटर गरम करून त्यात जिरे घालून ते तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंगावर मऊ होईपर्यंत परतून घ्या,त्यात आले-मिरची- लसणाची पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या, आता त्यात पाव भाजीचा मसाला घालून पुन्हा दोन मिनिटे परता,आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो,बारीक चिरलेली सिमला मिरची व ब्याडगी मिरचीची पावडर घालून चांगले मिक्स करून घेऊन आणखी दोन मिनिटे परता. चवीनुसार मीठ घालू मिक्स करून घ्या.
आता ब्रेडला आतील बाजूंना बटर लावून ब्रेड भाजून घ्या,नंतर ब्रेडवर मसाला पसरून घ्या व ब्रेड तव्यावरच्या मसाल्यावर दाबून परता. आता मसाल्यावर एक चमचा बटर घाला व मसाला ब्रेडला लावून मसाल्यावर ब्रेड दाबून पुन्हा एक मिनिट परता.
बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर यांनी सजावट करून गरम मसाला ब्रेडवर लिंबू पिळून भाजीबरोबर सर्व्ह करा.

"महाडच्या महापूरात" वाहून गेलेल्या एका तरुणाचीआत्मकविता...
*कवि - "राहुल पठारे*
यांच्या शब्दरचनेला सलाम...!!

इच्छा सगळ्या भिजल्या स्वप्नं गेली वाहून,
आई घर बांधायचं, अगं गेल ना आता राहून...😔

आई म्हटली नको जाऊ पाऊस जरा थांबू दे,
मन माझं मानत नाही रात्र तेवढी जाऊदे...😔

माफी मागतो आई तुझी मी हाथ माझे जोडूनी,
ऐकलं नाही काही तुझं मी गेलो तुला सोडूनी...😔

भाऊ माझा भोळा, बॅग माझी देऊन
म्हणला दादा येताना जीन्स ये घेऊन...😔

बहीण माझी छोटी करायचं होतं लगीन,
बोलली रक्षाबंधना ला वाट तुझी बघीन...😔

बायको सर्व बघत होती डोळे आले भरून
निघालो घरा बाहेर पोरांना टाटा करून...😭

काळोख होता भयाण, पाऊस होता बेफाट,
बेल वाजली एस.टि. ची निघाली मुंबई ची वाट...😌

काय झालं काय जुनू, मन नव्हतं लागत,
पुसले माझे डोळे मी खिडकी बाहेर बघत...😭

तेवढ्यात भेटला दणका हाहाकार झाला,
बस झाली पलटी पाणी आत
आला...😔

काय करू कुठे जाऊ? क्षणात संपलं सारं,
जीव घुटमटला डोळे फिरले पाणीच पाणी सारं...😔

बाहेर पडणं मुश्किल होतं, तडफडलो मी आतच,
बंद पडले शरीर माझे चालले तेवढे हातच...😌

जमलं तेवढी दिली झुंज मृत्यु च्या
देवा शी,
हसत होता बघत होता खेळत होता जीवाशी...😌

प्रयत्न माझे संपले सारे पाण्यातच मी रडलो,
श्वास कोंडला जीव तडफडला, मृत्यूशी मी हरलो...😞

कोणाचं मी काय बिघडवलं असा कसा मी मेलो,
माफ कर मला प्रिये तुला मी अर्ध्यात सोडून गेलो...😭

आई तुझी आठवण आली गं गेलो जेंव्हा मी वाहून,
किती मोठं केलंस मला तू स्वतः उपाशी राहून...😭

बाबा म्हणजे सावली घराची जसा बहरदार झाड,
ऐकलो नाही मस्ती केली तरी पुरवले लाड...😭

बायको ने हि रडून रडून अर्धा जीव केला असेल,
पोरं माझी कशी झोपतील जेंव्हा पप्पा नसेल ???😭

मित्रांच्या हि पार्ट्या आता जरा थांबल्या असतील,
आठवण काढतील माझी कदाचित नाक्यावरती बसतील...😔

संपली सगळी नाती क्षणार्धात संपली स्वप्न सारी,
इच्छा राहिल्या अपूर्ण माझ्या संपली दुनियादारी...😭

रडू नको ना आई, का गं अशी तू करती,
तूच म्हणायचीस मोठा होशील नाव कमावशील येशील टीव्ही वरती...😭

बघ किती ह्या होड्या अनं हेलिकॉप्टर पण आला,
शोधायला तुझ्या लेकराला मुख्यमंत्री हजर झाला...😭

आमदार हि धावून आले पोलिसांची घाई,
आता काय उपयोग तुमचा, करुनी कारवाई...😔

लवकर शोधा "रमेशला"आठवण घरची येते,
कधी भेटते आई मला अनं कधी छाती शी घेते...😭
कधी छाती शी घेते...😭
कधी छाती शी घेते....😭
😭😭😭😭😭😭😭😭😭
कविता आवडल्यास कविच्या नावासहीत पुढे पाठवा...!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!
ते अविचल कधीच नसतं...!
साबण बनवायला तेल जरूरी आहे आणि तेल काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!
जगात दोनच प्रकारची माणसे आनंदात असतात...!
वेडे आणि लहान मुले.. !
ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...! जगण्याचा आनंद घ्या...!
तुम्ही स्वत:च्या खांद्यावर डोके टेकुन रडू शकत नाही आणि स्वत:च स्वत:ला आनंदाने मिठीही मारू शकत नाही...! आयुष्य म्हणजे दुस-यांसाठी जगायची बाब आहे...! जे तुमच्यावर सर्वाधिक प्रेम करतात त्यांना साथ द्या आणि त्यांची सोबत घ्या...!!
" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं..."

किती सुंदर होते ते लहानपनाचे दिवस,
फक्त दोन  बोटे  जोडले कि......

*दोस्तीला पुन्हा सुरूवात
व्हायची*

आता क्वार्टर पाजल्या शिवाय परत दोस्ती होतच नाही.....😘😘😘☺☺☺😍😍

पुराण काळातील कथा आहे

एक वनस्पती होती , ,
ती शापीत होती ,,
कुणिही त्या वनस्पती ला स्पर्श सुद्धा करत नसायचे,,
ती वनस्पती एकटीच नाराज असायची ,, मग तीने देवाची प्रचंड भक्ती केली ,, तपश्चर्या केली आणि देव तिला प्रसन्न झाला.मग देवाने तिला आशिर्वाद दिला कि आजपासुन तुला जो कोणी एकदा हातात घेईल ,तो तुझी कधीच साथ सोडणार नाही...तथास्तु ✋✋✋
आणि देवाची वाणी खरी ठरली...🙂

   आज ती वनस्पती ""तंबाखू "" म्हणुन कलियुगात वावरत आहे...😉😆😂
😂😂😂😂😂