सावित्रीबाईचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य

1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात
बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात
पहिली शाळा सुरु केली. या शाळेत
एकूण सहा मुली होत्या, 4 ब्राम्हण, 1
धनगर आणि 1 मराठा.
15 मे 1848 रोजी शुद्रती शूद्रांच्या
मुलामुलींची पहिली शाळा पुणे येथे
सुरु केली. त्यानंतर पुणे परिसरात
सुमारे 20 शाळा सुरु केल्या.
28 जानेवारी 1853 रोजी महात्मा
फुलेंच्या साथीने बाल हत्या
प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
तारुण्यात चुकून पाय घसरल्यामुळे,
किंवा समाजातील इतर लोकांच्या
अत्याचाराला बळी पडल्यामुळे ज्या
स्त्रिया गर्भवती राहिल्या आहेत
त्यांनी आपल्या इथे येवून मुलांना जन्म द्यावा अशी भूमिका फुले
दाम्पत्याने घेतली. त्यामुळे शेकडो
निरपराध मुलांचा जीव वाचला.
1854 रोजी 41 कवितांचा काव्य
संग्रह प्रकाशित केला.
1873 ला काशीबाई या विधवा
ब्राम्हण महिलेला आत्महत्येपासून
परावृत्त करून तिच्या मुलास दत्तक
घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.
यशवंताचा स्वत:च्या मुलाप्रमाणे
सांभाळ करून त्याला डॉक्टर बनवले.
1873 ला सत्यशोधक समाजाच्या
स्थापनेत सक्रीय सहभाग.
1876-77 ला महाराष्ट्रात खूप मोठा
दुष्काळ पडला होता. त्या काळात
त्यांनी ठिकठिकाणी सुमारे 2000
मोफत अन्नक्षेत्र केंद्र सुरु केली.
आजच्या नाकर्त्या सरकारलाही हे
कधी जमले नाही.
7 नोव्हेंबर 1892 ला बावन्नकशी
सुबोध रत्नाकर आणि 1892 लाच
मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे ही
पुस्तके प्रकाशित केली.
1893 ला सासवड येथे भरलेल्या
सत्यशोधक परिषदेच्या सावित्रीमाई
अध्यक्षा होत्या.

Tag : Saviytibai Phule, Savitribai fule, Jyotiba Fule, History of India, 

No comments:

Post a Comment