एक बोधकथा :
एकदा एका मुलाने साप पाळला. तो त्या सापावर प्रेम करत होता आणि त्याच्यासमवेतच घरी रहात होता. एकदा साप आजारी पडला. त्याने खाणे-पिणे सोडून अनेक दिवस झाले. त्यामुळे मुलाला त्याची काळजी वाटली. मुलाने त्याला एका पशुवैद्याकडे नेले. पशुवैद्याने सापाला पडताळल्यानंतर पशुवैद्याचे त्या मुलाशी पुढील संभाषण झाले.
पशुवैद्य : साप तुझ्यासमवेतच झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : साप तुला अगदी चिकटून झोपतो का ?
मुलगा : हो.
पशुवैद्य : रात्री साप संपूर्ण शरीर ताणतो का ?
मुलगा (अतिशय आश्चयाने) : हो, वैद्यजी ! हा रात्री शरीर पूर्णपणे ताणतो; पण मला त्याची ही स्थिती पहावत नाही आणि मी कुठल्याही प्रकारे त्याचे हे दुःख दूर करण्यास असमर्थ आहे !
पशुवैद्य : या सापाला कोणताच आजार झालेला नाही. जेव्हा रात्री हा शरीर पूर्णपणे ताणतो, तेव्हा प्रत्यक्षात तो तुला गिळण्यासाठी त्याचे शरीर तुझ्या लांबीएवढे करण्याचा प्रयत्न करतो. तो सतत अनुमान घेत आहे, तुझे पूर्ण शरीर चांगल्या प्रकारे गिळता येईल कि नाही ....अन् गिळलेच, तर तो पचवू शकेल कि नाही ? ?...
या गोष्टीवरून हे शिकायला मिळते की, जे तुमच्यासमवेत सतत असतात, ज्यांच्यासमवेत तुम्ही खाता-पिता, बसता किंवा झोपता, ते सगळेच तुमच्यावर तेवढेच प्रेम करतात, असे नाही. त्यातील काही जण तुम्हाला गिळण्यासाठी स्वतःचा आकार हळूहळू मोठा करत असतात आणि तुम्ही भावनिक होऊन त्यांची स्थिती पाहून द्रवत असता ✒
🏿 जरा सांभाळून
एक बोधकथा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment