गणेशगुळे श्रीगणेश....!!!
गणेशगुळे रनपार बंदरासमोरील डोंगर व मुसाकाझी बंदराकडे जाणारा डोंगर या दोन डोंगरांच्या मध्यभागी समुद्रकिनारी वसले आहे. हे गाव रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर आहे. श्रीगणेशाच्या वास्तव्यामुळेच या गावाला गणेशगुळे हे नाव पडले. गणपतीपुळेप्रमाणेच गणेशगुळे हे गणेशाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर डोंगरावर बांधलेले आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, ते आजही चांगल्या स्थितीत आहे. मंदिराचा चौथरा डोंगराच्या पाश्र्वभूमीवर बांधलेला असून, तो सुमारे ३५ फूट उंच आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. पुढील बाजूच्या उजव्या दालनालगतचे दार पूर्णपणे बंद आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजे श्रीगणेश असे मानले जाते. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते - पावसचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर दशग्रंथी ब्राह्मण होते. ते गणेशभक्त होते. त्यांना पोटशुळाचा विकार जडला. ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले; परंतु वाटेतच इतक्या असह्य वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे पाऊल टाकता येईना. त्यामुळे ते झुडपात पडून राहिले. त्यांनी गणेश अनुष्ठानाला सुरुवात केली. त्या ध्यानस्थ अवस्थेत २१व्या दिवशी श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला. ‘माझे जेथे अवशेषात्मक वास्तव्य आहे, तेथे तू माझे मंदिर बांध, तुला याकामी सातारचे शाहूमहाराज मदत करतील. तू व्याधिमुक्त होशील’, या दृष्टांताबरोबरच श्रीगणेशाने सातारच्या शाहूमहाराजांनांही दृष्टांत दिला. त्याप्रमाणे आर्थिक मदत घेऊन महाराजांकडून त्यांचा दूत आला. चिपळूणकरांचा पोटशूळ श्रीकृपेने बरा झाला, ही वार्ता वाऱ्यासारखी गावात व पंचक्रोशीत पसरली. त्यामुळे हा गणपती व्याधिग्रस्त व दु:खी पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्ध पावला. श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एकेदिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते. हे मंदिर एका बाजूला असून निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे प्रसन्न, शांत असल्याने येथे अनेक भाविक श्रीगणेशाच्या दर्शनासाठी येतात...!!!
गणपतीचे हे स्थान पावस या गावापासुन साधारण २-३ किमी अंतरावर एका डोंगरावर वसले आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिळा असल्याने हे द्वार बंद केले गेले आणि त्या शिळेलाच श्रीगणेश मानून तिची पूजा केली जाते. अलिकडेच या शिळेवर श्रीगणेशाकृती प्रकट झाली असल्याणे "गुळ्याचा गणपती पुळ्यास गेला आणि पुन्हा प्रकट झाला" असे मानले जाते. गणेशगुळे हे श्री गणेशाचे स्थान रत्नागिरी-पावस-पूर्णगड या मार्गावर असून पावसजवळून या गावाकडे जाण्याचा फाटा फुटतो. पावसपासून ४ कि.मी. तर स्वामी स्वरूपानंदांच्या गावातून ३ कि.मी अंतरावर असणारे हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने ते सहसा कोणाला माहीत नाही. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला या म्हणीवरून हे गाव प्रसिद्ध आहे. हे गाव मुसाकाजी बंदराकडे जाणारा डोंगर व बंदरासमोरील डोंगर असा दोन डोंगरांच्या मध्यभागी वसले आहे. जवळच समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनार्यावरील वाळू बांधकामाला उपयुक्त अशी विशिष्ट क्रिस्टल स्वरूपात आहे. हे मंदिर पुरातन काळातील आहे. मंदिराची बांधणी जांभ्या दगडाची असून, मंदिर आजपण चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते, ही मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
रत्नागिरी-पावस अंतर साधारण १८-२० किमी
पावस-गणेशगुळे अंतर साधारण २-३ किमी

No comments:
Post a Comment