कुणाचेच नसतात हक्ककुणावर पण तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करुनये अशापण तरीही आस लागतेच ना ?
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी,
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल मनाचा दगड,तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनात वेदना होतातच ना ?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य, पण तरीही जीव जडतातचना?

No comments:

Post a Comment