अमेय चा फोन सहाव्यांदा खणखणला..
......... तसा थोडासा वैतागत फोन उचलत "हेलो ...बोल लवकर...ऑफिस मध्ये खूप काम आहे...शिवाय एका मिटिंग मध्ये आहे.."
" अरे मी सुयश बोलतोय. अरे आई ला हॉस्पिटल ला नेलंय ...घरात चक्कर येउन पडली आणि डोक्याला जखम झाली...आत्ता बेशुद्ध अवस्थेत आहे .पण डॉक्टर म्हणाले काळजी करायचं काही कारण नाही...तू येतोस का हॉस्पिटल ला ? "
" ओह्ह सो सोरी सुयश..अरे आता एक महत्वाची मिटिंग आहे...ती झाल्यावर एका क्लायंट कडे जायचंय ...तिथून निघालो कि संध्याकाळी येतोच तुझ्या आई ला बघायला हॉस्पिटल ला.."
तसा काहीसा गोंधळत सुयश म्हणाला "मित्रा....आई माझी नाही...तुझी आहे हॉस्पिटल मध्ये...तुला शेजारच्यांनी ५ वेळा फोन केला पण तू उचलला नाहीस...म्हणून त्यांनी मला फोन केला..मी पण एका मिटिंग मधेच होतो..पण ती तशीच सोडून थेट हॉस्पिटलला गेलो...सर्व formalities पूर्ण करून आईला Admit केलं.."
तसा काहीसा किंचाळत अमेय म्हणाला " अरे बापरे....थांब मी निघालोच लगेच...मिटिंग वगैरे सगळ्या पुढे ढकलतो...लगेच येतो, तू तिथेच थांब.."
अमेय आल्यावर सुयश च्या अक्षरशः पायाच पडला..." I am very sorry सुयश....." सुयश च्या नजरेला नजर मिळवायची हिम्मत राहिली नसल्यामुळे खाली मान घालून अमेय भावनेच्या भरात रडू लागला..
त्यावर सुयश त्याला धीर देत म्हणाला " अमेय...अरे त्यात तुझी चूक नाही...तुला जेव्हा हे कळलं कि आई माझी नाही ,तर तुझी हॉस्पिटल ला आहे...लगेच आलास न धावत..ह्यात मी तुला दोष देत नाही...पण मी एक वाक्य कुठेतरी वाचलं आहे...
No one is really very busy..Its all about priorities..
आपण सगळे तसेच आहोत...अमेय..आई कुणाचीही असो..आई शेवटी आई असते.."
" चल ...काहीही लागलं तरी सांग..मी आता जातो ऑफिस ला ..रात्री येतो जेवणाचा डबा घेऊन तुझ्यासाठी..तो पर्यंत 'आपल्या ' आईची काळजी घे..."
अमेय चे हात मात्र नकळत सुयश च्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत जोडले गेले होते.
आणि त्याच्या मनात तेच वाक्य घोळत राहिलं ......
No one is really very busy..Its all about priorities..
No comments:
Post a Comment