नमस्कार . मी शिवाजीराजे भोसले बोलतोय . सर्वात प्रथम खूप सारे धन्यवाद birthday wishes बद्दल . हाहा !! अहो दचकू नका . मी सुद्धा आता modern झालोय . तुम्हीच सारखे म्हणता शिवाजी महाराज जन्माला यावे यावे....अहो कित्येक जन्म घेतले मी पण तुम्ही मला ओळखलेच नाही . डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या
रुपाने मीच जन्म घेतला होता . अंधश्रद्धा निर्मूलन करायला गेलो पण तुम्हीच मला मारून टाकले . आमटे कुटुंब हे माझेच अवतार . दचकू नका , कारण शिवाजी म्हणजे केवळ युद्ध करणारा राजा नाही . प्रजेच्या कल्याणासाठी जो झगडतो तो शिवाजी . नीरजा भानोत च्या रुपाने जन्म घेऊन अनेक लोकांचे प्राण वाचविले . कर्तव्यदक्ष पोलीस आणि भारतीय सेना हे माझेच अवतार . तुम्ही मला किल्ल्यांवर शोधत बसलात म्हणून कदाचित मी तुम्हाला सापडलो नसेन . परवा सहज म्हणून किल्ल्यांवर फिरायला गेलो तर तिथे मला गौरवशाली इतिहासापेक्षा तिथल्या भिंतीवर , दगडांवर रमेश , प्रिया , रोहन , शीला , करण , पूजा वगैरे मंडळीच जास्त दिसली . गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दगड खूप तक्रार करत होते तुमच्याबद्दल . वाईट वाटले फार . राजा म्हणून जर मी तुमची सेवा करतोय तर प्रजा म्हणून तुमचे काही कर्तव्य आहे की नाही ? नका माझ्या नावाचा जयजयकार करू , नका माझे पुतळे उभारू पण किमान माझा एक तरी गुण तरी अंगी बाळगा . आणि नसेल बाळगायचा तर please मला तुमचा राजा , तुमचा देव नका म्हणवून घेऊ . तुमच्या Facebook आणि whats app ने तर माझ्या नावाचा बाजार उठवलाय . मी आयुष्यात कधीच मुसलमानांशी नाही लढलो , कायम शत्रूशी लढलो मग त्याची जात , धर्म काही का असेना . इथे सरळ सरळ हिंदू -मुसलमान भेदभाव चालतो . मग ते मलाच शिव्या घालणे नाही का झाले कारण डॉ.अब्दुल कलाम हे देखील माझाच अवतार . माझ्या काळात स्त्रियांकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहिले नाही असे नाही पण ज्यांनी पाहिले त्यांना आम्ही तोफेच्या तोंडी दिले होते . आज बलात्कार करून उजळ माथ्याने फिरणारे अनेक पाहिलेत . बघा तिकडे motorcycle rally चालली आहे जय भवानी , जय शिवानी करत . दिखाऊ प्रेम आहे अहो हे . विचार करा जरा आणि कृती करा .
मला निघायला पाहिजे आता . जाता जाता अजून एक खंत व्यक्त करतो की मला तुम्ही देव मानता , पण मला अजून ओळखलेच नाहीत तुम्ही , माझ्या विचारांवर विचार करा , किल्ल्यांवर मला शोधू नका , मी आज अनेक रूपांनी वावरतोय , माणसातला शिवाजी शोधून त्याची मदत करा किंवा स्वतः शिवाजी बनून लोकांची सेवा करा . शुभेच्छांबद्दल धन्यवाद .
मित्रानो वेळ काढून नक्की वाचा।।।।🙏🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment