मी प्रथमत: आणि अतिंम: भारतीय आहे

काही तासातच आपण "गणतंत्र दिवस" साजरा करतो. आपल्याला एवढच माहित आहे की 26 जानेवारी ला प्रजासत्ताक दिन शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत,पंचायत समिती,सरकारी कार्यालये आणि इतर ठिकाणी साजरा केला जातो.
        पण हे संविधान कुठल्या तरी व्यक्तिने अहोरात्र मेहनत घेऊन लिहले आहे. याची माहिती हि बऱ्याज जनांना नाही आहे. कारण शाळा, महाविद्यालये आणि इतर ठिकाणी 26 जानेवारी ला हि बाकी नेत्यांच्या नावनेच घोषणा देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 17 दिवस आणि 02:30 तास त्याकाळी टाइप रायटर वर लिहले. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीचे अध्यक्ष "राजेंद्र प्रसाद" यांना सुपूर्त केली. 26 जानेवारी 1950 ला हे संविधान खऱ्या अर्थाने लागू झाले.न्याय,समता,स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि बंधुत्वाची शिकवण त्याच बरोबर सर्व जाती धर्मातील लोकांना एकसंघ ह्या संविधानात बांधून ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली. आज आम्हाला लोकशाही रूपी घटना दिलात. बाबा तुमचे उपकार भारत देशावर अनंत आहेत आणि त्याची परत फेड कोन्हि करु शकला नाही आणि करु हि शकत नाही.
    "मी प्रथमत: आणि अतिंम: भारतीय आहे."
   -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment