Tu nahi boli tar....

तु नाही बोललीस तर ...!!
--------------------
तु ठरव , तुला मी हवा नको
माझे जीवन तुझ्याच हाती
तुझ्या अबोल्यानं माझं आयुष्य
घटत
तुझ्या बोलण्यानं माझं आयुष्य
वाढतं ...!!
तु नाही बोललीस तर
सिगरेटचे आणखी दोन झुरके जास्त
घेतो
स्वताःलाच आणखी जाळून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दारूचे आणखी दोन पेग जास्त घेतो
स्वताःलाच आणखी नासवून घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
भाकरीचे आणखी दोन घास कमी
खातो
स्वताःलाच आणखी ऊपाशी ठेवून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दुःखाचे आणखी दोन भार ऊराशी
घेतो
स्वताःलाच आणखी मी कैद करून
घेतो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!
तु नाही बोललीस तर
दररोज आणखी थोडा थोडा मरत
जातो
स्वताःलाच आणखी मी मारत जातो
आयुष्य माझे मी कमी करून घेतो ...!!

No comments:

Post a Comment