Datta Jayanthi..

🍀 श्री दत्त जयंती उत्सव 🍀

थोडक्यात माहिती..🙏

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

पृथ्वीतलावर पतिव्रता अनुसयेची ख्याती वाढली होती. विष्णु, ब्रम्ह आणि शिवजी यांच्या अनुक्रमे लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या भार्यांना आसुया निर्माण झाली, तिचे हरण करून जेणे करून या देवींचे स्थान त्रिभुवनामध्ये अढळ करावे. याकरिता वरिल तिन्ही देवांना तिचे सत्वहरण करण्याकरिता अतिथी स्वरूपात भुतलावर पाठवले. अयोभार्या अनुसयेने अतिथींचे आदरातिथ्य केले, परंतू त्यांनी नग्न होवून भोजन वाढावे अशी अट घातल्याने पतिव्रता स्त्रीला ते कसे शक्य आहे? त्या महान तपस्वी अनुसयेने ओळखले हे कोणी सामान्य अतिथी नसून देव लोकीचे असामान्य विभुती असाव्यात. याचकाला अन्नदान केले नाही तर सत्व जाते आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे दान केले तर पतिव्रताचा भंग होतो. यास्तव तिने आपल्या पतीचे स्मरण करून त्यांच्या कमंडुलीतील पाणी या तिन्हीही अतिथींवर शिंपले. त्यामुळे तात्काळ नवजात बालकामध्ये यांचे रुपांतर झाले. अतिथीतींची मागणी तीने स्तनपान करुन पुर्ण केली. शेवटी लक्ष्मी, सावित्री, पार्वती यांना अनुसयेच्या चरणी यावे लागले. आपली चूक कबुल करावी लागली. या तिन्ही देवांनाही तिचे पतिव्रत्य श्रेष्ठ् आहे हे मानावे लागले आणि प्रसन्न होवून त्यांनी तिला वर दिला, तुझ्र्या पोटी आम्ही तिघेही एकरुपात जन्म घेवू. तोच हा दत्तावतार. मार्गशिष पौर्णिमा गोरस मुहूर्तावर ब्रम्ह, विष्णु, महेश यांनी स्वरुपाने जन्म घेतला. हे भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये नवनाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक होते.

 
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

         दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली. तसेच अग्नीला गुरु करून, हा देह क्षणभंगूर आहे, अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशाप्रकारे चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले.

         `श्रीपाद श्रीवल्लभ' हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती' हा दुसरा अवतार होय. तसेच `माणिकप्रभु' तिसरे आणि `श्री स्वामी समर्थ महाराज' हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैनपंथीय दत्तगुरूंकडे `नेमिनाथ' म्हणून पहातात आणि मुसलमान `फकिराच्या वेशात' पहातात.

         दत्त दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत आणि दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबुलभक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्यारण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूरगडावर जात आणि योग गिरनार येथे करीत.

         दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबरवृक्ष यांची पूजा करतात. पूर्वी मूर्ती बहुदा एकमुखी असायची. हल्ली त्रिमुखी मूर्ती जास्त प्रचलीत आहे. दत्त हा `गुरुदेव' आहे. दत्तात्रेयांना परमगुरु मानले आहे. त्यांची उपासना गुरुस्वरूपातच करावयाची असते. `श्री गुरुदेव दत्त', `श्री गुरुदत्त' असा त्यांचा जयघोष करतात. `दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' ही नामधून आहे.

         दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहय्य होते.

🍀 दत्ताच्या उपासनेतील सुलभता....

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

         आपल्या भावानुसार देवतांनी सगुणात येऊन कार्य करणे अवलंबून असते. दत्त हा ब्रह्माच्या इच्छाशक्तीशी निगडीत असल्याने इतर देवतांच्या तुलनेत तो कमी कालावधीत सगुणात येऊन कार्य करतो; म्हणून इतर देवतांच्या तुलनेत दत्ताची उपासना सुलभ आहे.

🍀 दत्ताच्या उपासनेतील काठिण्य....

         प्रत्येक देवतेच्या साधनेतील काठिण्य हे आपण साधना केल्यावर त्या देवतेची सूक्ष्म-ज्ञानेंद्रिये आणि सूक्ष्म-कर्मेंद्रिये लवकर अथवा उशिरा जागृत होण्यावर अवलंबून असते. याबाबतीतील फरक १० टक्के इतका असतो. दत्ताच्या उपासनेतील काठिण्य ७ टक्के आहे.

🙏 ॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ 🙏

No comments:

Post a Comment